Saturday, October 17, 2020

आम्ही आजच्या दुर्गा

सर्व मंगल मांगल्ये,शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते,!!
      नवरात्री हा नऊ दिवस आणि नऊ रात्रींचा उत्सव आहे,जो आश्विन शुद्ध प्रतिपदे पासून सुरु होतो.दुर्गा देवी ची नऊ रुपे आणि या नऊ रूपांची पूजा म्हणजे नवरात्र होय,हिन्दू धर्मात् साडे तीन मुहूर्ताला खुप महत्त्व आहे,त्याच प्रमाणे साडे तीन पीठे ही महत्वाची आहेत,त्यातील पहिले तूळजापुर ची अम्बाभवानी माता,दूसरे कोल्हापुर ची अंबाबाई,आणि तीसरे माहुरगड ची माता रेणुका,व अर्धे शक्तिपीठ म्हणजे वणी गडाची सप्तश्रृंगी माता होय.नवरात्री च्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते,जेथे घटाची स्थापना करायची ती जागा स्वच्छ करुन् त्यावर रांगोळी काढली जाते,एक दुरडी घेऊन त्यात काळी माती भरली जाते,त्या मातीत सात प्रकार चे धान्य पेरले जाते,त्यावर माती च्या किवा धातु च्या कलशा ची स्थापना केली जाते,त्यातील पाणया मध्ये चंदन,गंध,अक्षता,दूर्वा,दक्षिणा टाकतात.तसेच विडयाची पाने आम्बयाची पाने खोचली जातात,त्यावर नारळ ठेवला जातो,कलशा च्या बाजूला देवी च्या मूर्ति ची स्थापना केली जाते,यालाच "घट बसने" असे म्हणतात,नऊ दिवस घटावर फुलांची माळ सोडतात.अखंड नंदा दीप तेवत ठेवला जातो.देवीला सुगंधी तेल,चंदन,उटने,रेशमी दोरा,साड़ी,खण,आरसा,सिंदूर,बांगड्या,फुलाची वेणी इ,वस्तु अर्पण केल्या जातात.नऊ दिवस नऊ रुपात देवी ची पूजा मांडली जाते,दान दक्षिणा दिला जातो.नऊ दिवस उपवास केला जातो.
      प्रत्येक देवी पुढे आपण आई किवा माता हे पवित्र विशेषण लावतो,हा आपल्या भारतीय संस्कृती चा संस्कार आहे,म्हणून स्वामी विवेकानंदानी सुद्धा म्हन्टले  आहे," मी समाजाच्या  सर्व बाजूनी निरिक्षण केले आहे,समाजाची स्त्रिया बद्दलची जी आदराची ,श्रद्हेची,भावना आहे तीला या जगात अन्यत्र कुठे हि तोड़ नाही,"मग एवढे सर्व असताना आज ही स्त्रियां वरील अत्याचार कमी झाले नाहीत,सवेदना,माणुसकी,कुठे तरी हरवत चालली आहे,मुलीं चा जन्म आज ही नाकारला जातो,सगळी कड़े स्वैराचार माजला आहे,,स्त्री चा अनादर केला जातो आहे,हूंडया नववधु ला जाळले जात आहे,खेड्या पाडयात स्त्रियांना आर्थिक,वैचारिक,स्वातंत्र्य नाही,शिक्षणाच्या सुविधा नाहीत,असा हा तिच्या अस्तित्वा चा लढा ती अजुन ही देतच आहे, आजच्या स्त्रीला चंद्रघटा हे रूप खुप च समरूप आहे,स्त्रीला अबला कमजोर व भित्री संमजणाऱ्याना हे चोख उत्तर आहे,दहा हात् म्हणजेच दशवधान ,तिला सतत् तत्तपर राहिले पाहिजे,किती ही संकटे आली तरी ती खंबीर पने त्यांना तोंड देन्यासाठी तयार असली पाहिजे, धाडस,निर्धार,निग्रह,संयम,अचूकता,व सावधानता.ही आयुधे तुच्या कड़े असतील तर आज ची स्त्री कोणत्या ही संकटाला समोरी जावू शकते,,
    कुष्मांडा देवी म्हणजे सृष्टि निर्मिति चे मूळ,हिचे रूप तेजस्वी आहे ती अष्टभुजाधारी आहे,अष्टावधनी आहे.म्हणून स्त्री ने ही असेच सावध,अत्यंत सतर्क,सक्षम असले पाहिजे,धनुष्यषबाण,चक्र,गदा ही शस्त्रे म्हणजे तीक्ष्ण नजर,चौफेर नजर,गंभीर भाव.कमळा ची फुले,अमृत कलश,आणि जापमाळ म्हणजेच शीतलता,सत्यआणि आत्मसंतुष्टि .स्त्री ही सुजनाची शक्ति आहे म्हणून तिचा योग्य तो  मानसन्मान व्हायलाच हवा.स्कन्द माता हे आज च्या स्त्रीला शोभेल असेचअभिमाना चे रुप आहे, शुभ्र रूप हे सात्विकता आणि त्यागा चे प्रतिक आहे,ती सिंहारूढ़ी आहे,म्हणजे पराक्रमी आहे,आजची स्त्री माता म्हणून अभिमानास पात्र आहे,तसेच वेगवेगळया क्षेत्रात उच्च स्थाना वर कार्यरत महिलांना प्रेरणा देणारे हे रूप आहे. तिच्या मांडीवर आपला भविष्यकाळ बसला आहे.असेच हे रूप सूचवते.
   कात्यायनी देवी च्या उपासने ने धर्म ,अर्थ,काम व मोक्ष यांची प्राप्ती होते,स्त्रीचा सन्मान केल्यास हे चार ही गुण प्राप्त होऊ शकतात.स्त्री विना जीवन अपूर्ण आहे,ती तेजा चे प्रतिक आहे,देवीची दैत्यांचा नाश  करणारी म्हणून ओळख आहे.महिलांवर अन्याय,अत्याचार करणारे दानव च .या दानव रूपी प्रवृतीचा नाश करण्या साठी स्त्रियांनी सक्षम पणे उभे राहाण्याची गरज आहे.देवी च्या हातात कमळ आणि तलवार आहे,याचा अर्थ आपल्यातील चांगुलपणा जपताना प्रसंगी कठोर भूमिका घेता आली पाहिजे,विचार रूपी तलवारीने काही गोष्टी रोखता आल्या पाहिजेत.महिलांनी होणाऱ्या अत्याचाराचा विरोध करण्याची प्रेरणा कालरात्री देवी देते.रुद्रावतार ही महिलांची आत्मशक्ति आहे.ही शक्ति अन्यायाचा विरोध करण्यासाठी वापरावी,असे हे रूप सूचवते.
समाजाच्या जडणघड़णा मध्ये महत्वाची भूमिका ही स्त्रीची च,तसेच उल्लेखनीय देखील आहे,नव्या नेतृत्वाची संकल्पना साकारणाऱ्या इंदिरा गांधी,किरण बेदी,मीरा बोरवणकर,अंतराळ वीरांगना कल्पना चावला,सुनीता विलयम्स ,सुधा मुर्ती, यांचे कार्य नेत्रदीपकच आहे,समाजातील दुष्ट प्रवृती चा बिमोड करायला हवा तर पुन्हा एकदा स्त्रीला महिषासुरमर्दिनी
बनावे लागेल,घराघरातील जिजावु च्या प्रेरणेने शिवाजी सारखा युगपुरुष निर्माण केला पाहिजे,पुरुषी मानसिकता बदलायला हवी तर घरोघरी "दुर्गा"च जन्माला यायला हवी,स्त्री ही सृजनाचे ,निसर्गाचे रूप आहे,तिचा सन्मान ,आदर केला गेला तरच नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने "नवरात्र" साजरी होईल,,,
,,,,,,संगीता देवकर,,,,   

  

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...