Wednesday, June 14, 2023

मेनोपौज आणि ती

आज सकाळ पासूनच स्मिताला कसे तरी वाटत होतेखूप बैचेन अस्वस्थ काही ही काम करू नये नुसतं बसून राहावे वाटत होते

 पण इशा आणि अनय चे कॉलेज आहे विक्रांत चे ऑफिस आहे मग काय इच्छा नसताना ही स्मिता उठली. एक एक काम आवरू लागली. दूध गॅसवर तापवायला ठेवले आणि लक्ष; तिचेदुसरीकडे गेले दूध उतू सगळी गॅस शेगडी खराब झाली. चरफडत तीने; दुधाचे पातेले खाली ठेवले.  

आई नाष्टा झाला का ग मला लवकर जायचे आहे इशा रूम मधूनच बोलली. स्मिता माझा टिफिन पण लवकरकर जरा मला अर्जेन्ट मीटिंग आहे. विक्रांत हीबोलला. अरे मी एकटीच काम करते मला दोनच हात आहेत जरा तुम्ही पण येऊन मदत करा.

 स्मिता चिडून बोलली. विक्रांत किचनमध्ये आला. स्मिता काय झाले आहे का सकाळ सकाळ चिडचीड करते आहेस. रोजच तर करतेस ना सगळं मग आज काय झाले. 

 का मला कंटाळा नाही येऊ शकत का? किती करायचे रे मी काम ? 

 स्मिता तुला बर वाटत नाही का काही होतय का प्रेमाने विक्रांत ने विचारले. नाही काही होत नाही मला. ओके आज नको काही बनवू तू मी बाहेर खाईन.  

इशा आणि अनय ही आले आवरून आई तू आराम कर आम्ही खातो कँटीन ला . अरे नको थांबा मी बनवते पटकन काही.उगाच बाहेर नका खाऊ . नको आई उशीर झाला आहे आता. मग सगळेच जण नुसता चहा घेऊन बाहेर पडले. 

 स्मिता खिन्न मनाने बसून राहिली. मी असे का वागले कोणीच काही खाल्ले नाही.विक्रांत ने ही टिफिन नाही नेला मला काय झाले असे अचानक स्वहताच स्वहता स्मिता विचार करू लागली.

 विक्रांत ने दुपारी तिला फोन केला.तिची विचारपूस करायला. स्मिताला मग आपल्या सकाळच्या वागण्याचे गिल्ट वाटू लागले. संध्याकाळी मग स्मिताने सर्वां साठी छान नाष्टा बनवून ठेवला .
 मुल विक्रांत घरी आली सगळ्यानी एकत्र चहा नाष्टा केला. आता कुठे स्मिताला बरे वाटले. परत आपण अस वेड्या सारख नाही वागायचे असे तिने ठरवले. 

 रात्री सगळं आवरून स्मिता बेडरूममध्ये आली . विक्रांत काही वाचत बसला होता. स्मिताला पाहून त्याने पुस्तक बाजूला ठेवले. स्मिता त्याच्या बाजूला  पडली तसे विक्रांत ने तिलाआपल्या जवळ ओढले 

 अहो मला खूप कंटाळा आला आहे. माझा मूड पण नाही आहे. स्मिता गेली आठ दिवस तू हेच बोलत आहेस? माझा विचार करत जा ना जरा अस बोलून रागातच तो तिच्या कडे पाठ करून झोपला. 

 अहो मी मुद्दाम नाही करत आहे खरच मला इच्छा होत नाही आहे. 
स्मिता झोप आता मला झोपू दे चिडून तो बोलला. 

 स्मिताला वाईट वाटले पण तिला अलीकडे सेक्स नकोच वाटत होता . कशातच मन लागत नवहते तिचे. खूप उदास वाटायचे. सकाळी उठून विक्रांत च्या आवडीचे तिने सगळं बनवले. 

 मुल  खाऊन आपले आवरून कॉलेजला गेली. विक्रांत ही नाष्टा करत होता पण स्मिता शी एक शब्द ही तो बोलला नाही.  

ती त्याच्या शी बोलत होती पण तो उत्तर देत नवहता. काल रात्रीचा त्याचा राग अजून होता. न बोलता तो ही ऑफिस ला गेला. स्मिता आता एकटी होती. तिला अचानक उदास वाटू लागले आणि रडू ही यायला लागले.  

मी एकटी आहे माझी कोणाला काही फिकिरच नाही. माझ्या मनाचा कोणी विचारच करत नाही असं तिला वाटू लागले. पण माझं ही चुकलेच ना ! विक्रांत पुरुष आहे त्याला त्या भावना जास्त असणार आपल्या पेक्षा ही तीव्र मग त्याने माझ्या कडे ती अपेक्षा केली तर त्याच काय चुकले मी त्याला सतत टाळते अशा ने त्याचे बाहेर लक्ष गेले तर ? नाही मला नाही सहन होणार. 

 मग तू ते सुख त्याला द्यायला का टाळतेस? स्मिता स्वहताच विचार करत राहिली. आज त्याला आपण नाही म्हणायचे नाही असं तिने मनोमन ठरवले.  

संध्याकाळी विक्रांत घरी आला पण गप्पच होता स्मिताशी बोललाच नाही. रात्री छान तयार होऊन स्मिता बेडरूममध्ये आली.
 स्वहता हून विक्रांत च्या जवळ गेली. त्याच्या केसां मधून हात फिरवत राहिली. सुरवातीला त्याने दुर्लक्ष केले मग स्मिता म्हणाली अहो सॉरी सोडा ना राग आता 
. मग विक्रांत ला ही राहवले नाही. त्याने तिला आपल्या जवळ ओढले तिच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेतले . तो अधाशा सारखा तिच्या वर तुटून पडला पण स्मिता काही फुलली नाही. तिला काहीच फील होत नवहते. 

स्वहता शान्त होऊन विक्रांत तिच्या पासून बाजूला झाला. तुला मूड नवहता तर कशाला जवळ आलीस रागात तो स्मिताला बोलला. सो कोल्ड यु आर! 


अहो मी मनाची तयारी केली होती पण नाही माहीत असे का झाले. पण काहिच न बोलता विक्रांत झोपी गेला .

. स्मिता ला समजेना अस का होतय. पुन्हा सकाळ पासून तिला उगाचच उदास निराश वाटू लागले. उगाचच डोळे भरून यायचे.

 दुपारी तिने तीची मैत्रीण मीनल ला कॉल केला आणि तिला; जे वाटते ते सगळ सांगितले तसे मीनल म्हणाली अग स्मिता तुझे वय आता 45 ना मग ही सगळी लक्षणे मेनोपॉज ची असु शकतात .
 कोणाला 3/4 वर्ष आधी ही लक्षणे दिसू लागतात तर कोणाला उशीरा . तू तुमच्या फॅमिली डॉक्टर कड़े जावून ये विक्रांत ला सोबत ने. ओके मी जावून येते म्हणत स्मिता ने फोन ठेवला.  

रात्री ती विक्रांत शी या विषयावर बोलली . दोन दिवसांनी जावू डॉक्टर कड़े तो म्हणाला. डॉक्टरांची वेळ घेवून दोघे क्लिनिक ला आले. डॉक्टरांनी स्मिता चे बोलने ऐकुन घेतले . 

 ते म्हणाले ही सगळी लक्षणे मेनोपॉज ची च आहेत जसे की उगाचच उदास वाटणे,चिडचिड होने, सेक्स ची इच्छा नसने , रडु येणे, अंग ख़ुप गरम होने,अचानक रात्री भरपूर घाम येणे;पण हा काही मोठा आजार नाही आहे.  

जसे तरूण वयात मासिक पाळी सुरु होते तसेच वयाच्या 45 किंवा अगदी 51 वया पर्यन्त कधी ही स्त्रीची मासिक पाळी बंद होऊ शकते. अशा वेळी पतीने पत्नी ला समजून घेण जास्त गरजेचे असते. स्त्रीला आपण एकटे पडलो आहोत कोणाला आपली काळजीच नाही अस वाटत राहते. घरातले इतर सदस्य आप आपल्या व्यापात मग्न असतात आणि घरी मात्र स्त्री एकटी पड़ते. 

 अशा वेळी तिने आपले आवडते छंद जोपासने गरजेचे असते. सकाळी किंवा संध्याकाळी वॉक ला जाणे, योगा करने आणि पौष्टिक चौरस आहार घेणे महत्वाचे असते. सव्हता कड़े लक्ष देणे. आपली तब्येत सांभाळणे आणि आवडत्या गोष्टीत मन रमवने या गोष्टी केल्या पाहिजेत. 

 या काळात सेक्स नको वाटतो तीची इच्छा होत नाही त्या वेळेस पती ने तिच्या कलाने घेणे,तिला मानसिक आधार देने,समजून घेणे गरजेचे असते. 

 मग डॉक्टरांनी स्मिताला काही मेडिसिन दिले आणि फूल बॉडी चेक अप जसे हिमोग्लोबिन,आयर्न,कैल्शियम ,ब्रेस्ट ची तपासणी, सोनोग्राफी करून घ्यायला सांगितली जेणे करून भविष्यात काही आजार होणार असतील त्याची लक्षणे लवकर समजतील. विक्रांत आणि स्मिता घरी आले. 

 स्मिता आय एम सॉरी . अहो तुम्ही का सॉरी म्हणता. मला समजायला हवे होते ग. मी उलट तुझा राग राग करत राहिला. अहो तुम्हाला माहित होते का की माझी ही मेनोपॉज ची फेज असेल म्हणून नका वाईट वाटून घेवू. स्मिता आता मी तुझ्या सोबत आहे कायम अस म्हणत विक्रांतने स्मिताला आपल्या कुशीत घेतले. स्मिता तुला आवडते ते तू करायला सुरु कर.मी तुला मदत करेन. 

हो विक्रांत म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली.


समाप्त. 
Photo credit Google.

©® Sangieta Devkar 2017

No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...