Monday, July 3, 2023

सर्व्हायविंग मेन (शोभा डे)




अगदी दिलखुलास,मोकळं आणि भाषेची भीड न ठेवता लेखन करणारी एक माझी आवडती लेखिका म्हणजे" शोभा डे"!  स्पष्टवक्तेपणा,निर्भीड अस वास्तव या लेखिकेच्या लिखाणात पाहायला मिळते. आपली पुस्तके वाचून लोक काय प्रतिक्रिया देतील याची पर्वा तिला अजिबात नसते. एक दर्जेदार साहित्य निर्मिती कशी करायची याचे उदाहरण म्हणजे शोभा डे!" शोभा डे"या भारतीय लेखिका आणि स्तंभलेखिका आहेत. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते. स्टारडस्ट, सोसायटी आणि सेलेब्रिटी या संपन्न वाचकांवर्गाच्या मासिकांचे संपादन त्यांनी केले. उद्योग मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने लिहीले. १९८० पासून त्या विविध भारतीय नियतकालिकांतून सातत्याने स्तंभलेखनही करीत आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पाउस - द ट्रूथ अबाऊट मॅरेज आणि सुपरस्टार इंडिया- फ्रॉम इनक्रेडिबल टू अनस्टॉपेबल या पुस्तकांचा समावेश आहे.मी त्यांचं सर्व्हायविंग मेन, हे पुस्तक वाचले आणि मला आश्चर्य वाटले की कस कोणी इतकं बेमालूमपणे पुरुषा बद्दल त्याच्या सवयी आणि गुण दोषा बद्दल लिहू शकत? मुळात बायकांना "पुरुष" कसा आहे हेच माहीत नसते. पुरुषाची संपूर्ण ओळख , त्याची प्रत्येक क्रिया आणि त्या बद्दलची प्रतिक्रिया या बाबत लेखिकेने सविस्तर लेखन या पुस्तकात केले आहे. यात पुरुष हा नेमका कसा त्याच आयुष्य,बायको सोबत चे त्याचे संबंध,त्याच कामजीवन या बाबतीत सडेतोड लेखन केले आहे. काही पुरुषाची सिक्रेटस ही पुस्तकातुन उघडकीस येतात. पुरुषा सोबत बायकांनी कस डील करावे किंवा कस वागावं याच मार्गदर्शन या पुस्तकातून होत. असा ही किती तरी बायकांना 10/ 12 वर्ष संसार करून ही  त्यांचा "नवरा"  नीट समजलेला नसतो.




भारतीय पुरुषा विषयी प्रत्येक स्त्रीला काय माहित असायला हवे हे या पुस्तकात वाचायला मिळते. जसे की  बायका पुरुषां साठी जो वेळ खर्च करतात त्या साठी तो पुरुष खरच पात्र असतो का?पुरुषावर खरच प्रेम करणं शक्य आहे का?पुरुषांना खऱ्या भावना असतात का?बाई पुरुषाला वळण कसे लावते?पुरुषांना जास्त चिंता कोणत्या गोष्टीची असते  या आणि अशा अनेक प्रश्नांचा थेट वेध घेणार हे अत्यंत धारदार,हलक्या फुलक्या शैलीतील लेखन खरच वाचनीय आणि परखड आहे.जे प्रत्येक स्त्रीने वाचायलाच हवे.

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...