Monday, February 24, 2020

शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात


 1 ) स्थळ --- आमदार दादासाहेब यांचे घर   
आज दादा साहेबांच्या घरी सकाळ पासूनच लगबग सुरू होती,त्यांचा एकुलता एक मुलगा हरीश अमेरिके हुन एम एस करून  भारतात परत येणार हॊता. त्याच्या स्वागता ची जोरदार तयारी सुरू होती. आई साहेब मुलाच्या येण्याने खूप खुश होत्या. थोड्या वेळात हरीश आला. त्याचे जंगी स्वागत झाले. आमदार साहेबांचे मित्र ,मोठं मोठे उद्योगपती,हरीश चे मित्र सगळेच आले होते. गप्पा मारत मजेत सगळे मेजवानी चा आनंद घेत होते. दादा साहेब प्रत्येकाला आपला मुलगा किती हुशार आहे आणि आज तो इतका मोठा सर्जन झाला आता मोठे हॉस्पिटल त्याला काढून देणार असेच सांगत होते,मुलाचे कौतुक करत होते . मुलगा कायम आपल्या आज्ञेत असल्या मुळे आज तो या उंची वर आहे हेच ज्याला त्याला सांगत होते. हरीश ने ही गोष्ट नोटीस केली. त्याने मनातच ठरवले एकदा बाबांशी बोलायला हवे. रात्र फार झाली होती. दादा साहेब हरीश ला म्हणाले हरीश आता तू आराम कर जा. दमला असशील . नाही बाबा पण मला थोडे बोलायचे होते. अरे आता खूप उशीर झाला आहे उद्या बोलू म्हणत ,त्यांनी हरीश ला गुड नाईट केले. सकाळी नाष्टा च्या वेळी हरीश ने विषय काढला म्हणाला,आई बाबा मला माझ्या करियर विषयी बोलायचे आहे. दादा साहेब म्हणाले,बोल कुठे आणि किती मोठे हॉस्पिटल काढायचे आहे तुला? बाबा हॉस्पिटल तर मला काढायचे आहे पन ते पूर्ण चॅरिटेबल हॉस्पिटल असेल. मी नाम मात्र शुल्क घेऊन गोर गरिबांना माझी सेवा देणार आहे. ज्यांची परिस्थिती नसेल अशा लोकांना मी अगदी मोफत सेवा देणार आहे. तसे दादा साहेब म्हणाले,तुला समजते का हरीश तू काय बोलतोस? अरे तुझ्या शिक्षणा साठी इतका खर्च केला,फॉरेन ला तुला एम एस साठी पाठवले ते काय असे फुकटात लोकांना सेवा देण्या साठी नाही.  बाबा पण मला पैशाचा सोस नाही मला माझ्या कामाचे चीज करायचे आहे.आज किती तरी गरीब असह्य लोक पैशा अभावी वैद्यकीय सेवा मिळवू शकत नाहीत,खेडो पाड्यातील लोक,गरोदर स्त्रिया या योग्य ट्रीटमेंट न मिळाल्या मूळे मृत्युमुखी पडत आहेत. चॅरिटेबल हॉस्पिटल काढणे हे माझे स्वप्न आहे बाबा. नाही हरीश तू चुकतो आहेस. अशा तुझ्या वागण्याने तू कंगाल होशील. मी तुला या साठी शिक्षण दिले नाही.पण बाबा तुम्ही पण राजकारणात आहात,तुम्ही गरजूनां आपल्या फ़ंडा तुन मदत करता ना.?गरिबांना चे प्रश्न समस्या सोडवता  तसेच माझे ही काम मला विना मोबदला करायचे आहे. हरीश आम्ही लोकांना मदत करतो पण सरकारच्या पैशा तुन,स्वहताचा खिसा रिकामा करून नाही. फक्त खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात हे ज्याला जमलं तोच आयुष्यात पुढे निघून जातो. तुझ्या सारखा विचार मी केला असता ना तर तू इतका शिकला नसतास,तेव्हा हा विचार डोक्यातुन काढून टाक आणि भरपूर पैसा कमव. हरीश म्हणाला,बाबा मला तुमचे म्हणणे पटत नाही. माझी तत्व खूप वेगळी आहेत. तसे मध्येच आई म्हणाल्या,हरीश अरे बाबा बरोबर बोलत आहेत.तू म्हणतोस तसे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत आपल्या शहरात,तिथे जातील लोक,तू का असा हट्ट करतो आहेस? आई मी खूप वेगळा विचार करतो आहे मी स्वार्थी नाही आहे आणि माझ्या कलेच्या जोरावर मला पैसा कमवायचा नाही. दादासाहेब रागात म्हणाले,ठीक आहे हरीश तुला जर भिकेचेच  डोहाळे लागले असतील तर आमचा नाईलाज आहे. तेव्हा तुझा मार्ग वेगळा आणि आमचा वेगळा. तुझ्या शिक्षणचा खर्च वाया गेला असे समजेन मी. हरीश आई वडीलआणि त्याचे ध्येय याचा कात्रीत सापडला!!
 2)  स्थळ --  प्रतिष्ठित समाज सेविका शमा ताई यांचे घर
     आई तुझा इंटरव्ह्यू कसा झाला? अमेय ने विचारले. अरे छानच झाला,माझ्या कामाचं कौतुक करत होते सगळे.गरजू आणि असह्या महिलांना मदत करणाऱ्या समाजात नावलौकिक मिळवणार्या शमा ताई यांचा आज इंटरव्ह्यू होता. समाजकार्यात स्वहताला त्यांनी अगदी झोकून दिले होते. आई एक गोष्ट बोलायची होती अमेय म्हणाला,बोल काय काम आहे का ? तसा अमेय म्हणाला, हा आई माझे एका मुली वर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचे आहे. कोण आहे ती काय करते? आई तिचे नाव शर्मिला आहे आई वडील आहेत तिला माझ्याच ऑफिस मध्ये काम करते. बर मग तिला घरी घेऊन ये मी भेटेन  शमा ताई म्हणाल्या. तसा अमेय म्हणाला,पण आई तिचा डिओर्स झाला आहे आणि एक मुलगा आहे तिला 3 वर्षाचा. काय म्हणालास अमेय शमा ताई जोरात ओरडल्या. अरे जगातल्या सगळ्या मुली संपल्यात का ? तुला काय म्हणून ही घटस्फोट झालेली मुलगी आवडली? वेड लागलंय का तुला,? आई अग प्रेम आहे माझं तिच्यावर मग ती डिओर्सी आहे का विधवा आहे याचा मला फरक पडत नाही. प्रेमात जात पात धर्म ,डिओर्सी,असे काही बघितले जात नाही कारण प्रेम प्रेम असत नाहीतर तो स्वार्थ झाला असता. अमेय बुद्धी भ्रष्ट झालीय का तुजी? अरे तू अजून सिंगल आहेस तुला मुलगी ही तशीच हवी समजते का?  पण आई मी तिला शब्द दिला आहे गेली 2 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि तू पण एक सोशल वर्कर आहेस ना तू तुझ्या भाषणात सांगतेस की विधवांचा पुनर्विवाह,घटस्फोटी महिलेचा स्वीकार आज च्या तरुण मुलांनी ही करायला हवा,तर समाज परिवर्तन होईल . यात त्या महिलांचा दोष काय त्यांची चूक काय ? मग आता कुठे गेले तुझे तत्वज्ञान? अमेय समाज सेवा मी करते म्हणून बाहेरची घाण मी माझ्या घरात नाही आणणार. समाजसेवा बाहेर च्या बाहेर करायची ती घरा पर्यंत आणायची नसते. आपण जे बोलतो तसेच वागले पाहिजे असा काही नियम नाही समजले. आई तू हे बोलतेस मग समाजसेवीका म्हणून समाजात मिरवतेस मान सन्मान घेतेस त्याच काय? अमेय काही ही झाले तरी मी हे लग्न नाही होऊ देणार तुला आई हवी असेल तर त्या शर्मिलेला कायमच विसर नाहीतर आई ला विसरून जा. अमेय ला हे समजेना की समाजसेविका म्हणून सन्मानाने जगणारी आपली आई ,तिचे खरे रूप कोणते ? 
3) स्थळ --- एक मध्यमवर्गीय कुटुंब
   विराज कॉलेज मधून घरी आला. आई ने विचारले काय रे विराज ती मुलगी कशी आहे आता. आई ठीक आहे ती पण खूप घाबरली  आहे .पण त्या गुंड मवाली मुलांना शिक्षा व्हायलाच हवी .काही सांगता येत नाही कोणावर काय प्रसंग येईल आई म्हणाली. हु पण आई आम्ही  सगळे उद्या पोलीस चौकित जाणार आहोत आणि त्या मुलां विरुध्द साक्ष देणार आहोत. विराज असे काही ही करू नकोस बाकी चे मुलं जाऊ दे पण तू मात्र नको या फ़ंदात पडू नको तो पोलीसांचा ससेमिरा.आई अग भर कॉलेज मध्ये एका मुलीचा विनयभंग होतो आणि आम्हीं सगळ बघून पण काहीच करायचे नाही का ? त्या मुली ची चूक काय त्यात?कोणीतरी गुंड येतो आणि मुलीची छेड काढतो तिला लज्जास्पद वागणूक देतो आणि आपण फक्त बघ्याची भूमिका करायची का? पण विराज तू काही पाहिलेच नाही असे सांग मग झालं तर!आई असे कसे बोलतेस त्या मुलीच्या जागी आपली वैशु पण असू शकते ना ? नाही ना आपली मुलगी मग नको इतका विचार करुस . बाबा आले  तेव्हा घरात म्हणाले काय वाद चाललाय इतका? विराज ने सगळं बाबा ना सांगितले बाबा आता तुम्हीच सांगा आईला ती मला साक्ष द्यायला जाऊ नको म्हणते. बाबा म्हणाले सुचित्रा जाऊ दे विराज ला ,अस गप्प बसून राहिलो तर अजून किती मुली या अत्याचाराला बळी पडतील. ते काही नाही विराज तुला माझी शपथ आहे जायचे ना तुला पोलिस चौकित खुशाल जा पण आई ची शपथ मोडून जा.  विराज असहाय हताश पणे गप्प बसला !!! 
  
    वरील उदाहरणे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत,कोणाच्या ही भावना दुखवण्याचा अजिबात हेतू नाही.या उदाहरणांना काही अपवाद ही असू शकतात . समाजात बदल सगळयाना हवा आहे मग ती कचऱ्याची समस्या असो,प्रदुषण भ्रष्टाचार,किंवा स्त्रियांना वरील अत्याचार, पण सुरवात कोण करणार इथे गाडी अडते. "शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात" या मनोवृत्तीतून आपल्यातून कुणी पुढे येत नाही. आपण प्रश्नच विचारत नाही. कारण प्रश्न करायला आपल्याच संकल्पना अजून स्पष्ट नाहीत. आपण कोणत्या बदलाची आशा करतोय? कोणत्या उद्याच्या भारताची स्वप्न पाहतोय?आज एखादा सहज म्हणतो की "मी देशासाठी अमुक अमुक कार्य केले असते पण देशाने मला काय दिले?" आपल्याला देशाने काय दिले त्यापेक्षा आपण देशाला काय दिले याचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण शेजारच्या घरात. एखादा चांगला काम करायला नको पण त्याचा फायदा मात्र मिळायला हवा. खरच महाराजांनी असाच विचार केला असता. तर आज आपण कोणत्या अवस्थेत जगत असतो याचा विचार करायला हवा!! 

 संगीता देवकर प्रिंट / मीडिया रायटर
 
  






Saturday, February 8, 2020

प्रेम म्हणजे प्रेम असत



प्रेम म्हणजे प्रेम असत,,,,,



"प्रेम म्हणजे प्रेम असत,तुमच आणि आमच अगदी सेम अस्त.या कविते मधून मंगेश पाड़गांवकरांनी प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. आपण कोणावर तरी प्रेम करतो हे सांगण्यासाठी एखाद्या विशिष्ठ दिवस असावा असे नाही.प्रेम ही भावना उपजत असते. ती एकमेकांच्या हृदया पर्यन्त नकळत् पोहचत् असते. परंतु आजच्या धकाधकी च्या जीवनात आपण एकमेकांना पुरेसा वेळ नाही देवू शकत. तेव्हा आपल्या प्रिय व्यक्ति वरील प्रेम सेलिब्रेट करण्या साठी "वेलेंनटाइन डे" सारखा एखाद्या दिवस असला तर काय बिघडले? पण आपल्या सेलिब्रेशन मुळे इतरांना त्रास होऊ नये याची जरूर काळजी घ्यावी. आपले सेलिब्रेशन आपल्या पुरतेच मर्यादित असावे..
     प्रेम ही एक सुंदर भावना आहे. मग ते प्रेम आई मुले,भाऊ,बहिन ,मित्र मैत्रिण,पति पत्नी यांच्या पैकी कोणाचे ही असू दे,प्रेम हे प्रेमच असते. याची ठराविक व्याख्या नाही करता येत. एखाद्या व्यक्ति बद्दल वाटणारी ओढ़,आपुलकी,माया,ममता,काळजी याला प्रेम म्हणतात. पण आज आजुबाजुला पाहिले की असे  आढळते की यालाच प्रेम म्हणतात का,असा प्रश्न पडतो!! कॉलेज,शाळेला जाणाऱ्या मुलिंना वाटेत् आडवणे,तू मला आवडतेस ,माझे तुझ्यावर प्रेम आहे,अशी फ़िल्मी वाक्य ऐकवणे,येता जाता मुलींची छेड़ काढ़ने आणि तिने नकार दिला तर त्या मुलीला जीवे मारणे,भररसत्यात तिच्या वर अतिप्रसंग करने,खरच याला प्रेम म्हणता येईल?.ही निव्वळ विकृती आहे. सिनेमा,इंटरनेट,टीव्ही, या माध्यमा तुन जे प्रेमाचे अव्यावहारिक,विकृत ,असभ्य चित्रण दाखवले जाते त्याचेच अनुकरण आजची पीढ़ी करते आहे. लाडात् वाढलेल्या मुलांना जे हवे ते लहान पणा पासूनच देत रहाणे,नकार पचवन्याची सोशिकता नसणे ,याचाच हा परिणाम दिसून येतो. प्रेम करण्या बद्दल कोणाचीच आडकाठी नसते,प्रेमाच्या विरोधात ही कोणी नसते पण ते प्रेम समजस,विचारी आणि प्रामाणिक पणे केलेले असावे. प्रेम ही एक नितांत सूंदर भावना आहे. एकमेकां बद्दल वाटणारा विश्वास आहे. प्रसंगी दुसऱ्याचा ही होउंन जाणारा एक सुंदर अविष्कार आहे. प्रेम म्हणजे शब्दा मध्ये व् मनामध्ये गुंफलेला मोती आहे. या प्रेमाला कधी ही विकृत बनवू  नका. जबरदस्तीने कोणाचे प्रेम मिळवता येत नाही,ती हृदयातुन येणारी उत्स्फूर्त भावना आहे. 
   " वेलेंटाइन डे" म्हणजे निव्वळ प्रियकर आणि प्रेयसी  यांच्या मधले प्रेम व्यक्त करण्या चा दिवस ही संकल्पना आता बदलली आहे. आपल्या प्रिय व्यक्ति बद्दलच्या भावना व्यक्त करण्या साठी हा दिवस साजरा केला जातो. मग ती व्यक्ति आई,बाबा,भाऊ,बहिन,असो किवा जवळ चा मित्र किवा मैत्रिण!! शेवटी प्रेम म्हणजे नेमके काय ? तर किती ही जवळ जाणार असाल तरी गाड़ी सावकाश  चालव आणि पोहचल्या वर फोन कर ,असे आई चे काळजीचे बोल म्हणजे प्रेम! दिवाळी ला स्व्:ता साठी साधे कपड़े न् घेता मुलांच्या पसंतीचे महागातले कपड़े  घेणारे वडील ,,म्हणजे प्रेम,,! किती ही मस्ती केली,व् रात्री उशीर झाला तरी,आई बाबांना न् सांगता दार उघड़णारे आजी आजोबा म्हणजे प्रेम,,,कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का ? अशी विचारणारी बहिन म्हणजे प्रेम,,,,! पगार कितीही कमी असला तरी भाऊबीजेला बहिनी च्या पसंती चे घडयाळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम,,,आणि या सर्वांची काळजी घेऊन स्व:ताची काळजी न् करता सकाळी लवकर उठून जेवनाचा डबा बनवणारी बायको म्हणजेच प्रेम,,!!!
शब्दातुन जे व्यक्त होत नाही ते प्रेम असते. प्रेम ही एक गोड भावना आहे. एकमेकांवरील विश्वास जपन्याचा ,वाढवन्याचा एखाद्या दिवस "वेलेंटाइन डे" म्हणून साजरा करूया. दुसऱ्या चे मन न् दुखवता एकमेकांना जपुया. हाच तर वेलेंटाइन चा संदेश आहे. एकमेकातील नाती प्रेमाच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवुयात आणि ओठांवर येऊ दया,,""हा यही प्यार है,!!!  


,,संगीता देवकर,प्रिंट &मीडिया रायटर,पिम्परी पुणे 17,


Monday, February 3, 2020

आरवी..


आरवी..

मिलिंद आणि रेवती आरवी ला घेवून डॉ,शैलेश माने सुप्रसिद्ध मानसोपचार स्पेशालिस्ट यांच्या कड़े आले होते. आरवी आता ही त्या क्लिनिक मध्ये असून नसल्या सारखीच शून्यात नजर लावून बसली होती. डॉ कड़े आता एक पेशंट बसले होते. त्या पेशंट नन्तर आरवी चा नंम्बर होता. रेवती आपल्या लाडक्या मुलीं कड़े केविलवान्या नजरेने पहात होती . लहान पणा पासून प्रत्येक गोष्टीत् हुशार,चौकस,हसमुख अशी आरवी आता अवघ्या सोळा वर्षातच आयुष्य संपून गेल्या सारखी भकास झाली होती. याला कुठे ना कुठे रेवती आणि मिलिंद जबाबदार होते. फक्त काम आणि पैसा याच्या मागे लागुन् त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीं चे आयुष्य वेगळ्याच वळणावर आणून ठेवले होते. पाच मिनिटात आतील पेशंट बाहेर आला. तसे ते तिघे आत गेले. डॉ नी आपल्या समोरच्या खुर्ची वर त्यांना बसायला सांगितले आणि म्हणाले बोला मि. मिलिंद काय प्रॉब्लेम आहे. तसे रेवती म्हणाली,डॉ ही आरवी आमची मुलगी ,एकदम ब्रिलियंट स्टुडेन्ट आठवी इयत्ते पर्यन्त खुप छान अभ्यास करायची . बडमिंटन् खेळायला ग्राउंड ला जायची . पन गेल्या वर्षा पासून ती खूपच स्वभावाने हायपर बनली आहे. अभ्यासात अजिबात लक्ष नाही सतत मोबाईल वर अपडेट राहते. सोशल मीडिया चा अतिरिक्त वापर करते तिचे फ्रेंड सर्कल ही खुप आहे .वारंवार पार्टी करणे फिरायला बाहेर जाणे  आणि आम्ही अड़वले तीला तर उद्दट पणे उत्तर देते आमचे काहिही ऐकत नाही. डॉ शांत पणे सर्व ऐकत होते. रेवती पुन्हा म्हणाली मागच्या वीक मध्ये तर अति झाले डॉ हिचे वागणे.  रात्री ही उशिरा घरी आली तीला एका कार मधून तिच्या मित्रांनी सोडले ती अजिबात शुद्धित नव्हती. सकाळी उठल्या वर तीला उलटी झाली चक्कर येऊ लागली तेव्हा आम्ही आमच्या फॅमिली डॉ ना आरवी ला दाखवले. डॉ नी तीला चेक केले आणि म्हणाले आरवी ने ड्रिंक घेतली होती आणि त्याच सोबत तीने ड्रग्स ही घेतले होते. आणि आता आठवडा झाला ती स्कुल ला जात नाही रुम मध्येच बसून असते काही विचारले तर काही बोलत नाही.  इतके सांगून रेवती गप्प झाली तिचे डोळे भरून आले होते. आरवी आता ही हरवल्या सारखी बसली होती. डॉ म्हणाले तुम्ही नका काळजी करु मी नक्की आरवी च्या अशा वागन्याचे कारण शोधून काढेन् आणि तीला पूर्ण बरी ही करेन. डॉ आरवी कड़े पहात म्हणाले आरवी तू कशी आहेस आणि तु आता 10 std ला आहेस ना. कसा चाललाय अभ्यास.?पण आरवी गप्प च होती. रेवती तीला खांद्याला हलवून बोल बेटा म्हणत होती. पण आरवी ने रेवती कड़े पाहिले देखिल नाही. डॉ म्हणाले मला वाटत तुम्हा दोघांसमोर ती कदाचित नाही बोलणार तुम्ही बाहेर बसा मी एकटा आरवी शी बोलतो . ओके म्हणत मिलिंद आणि रेवती बाहेर आले. डॉ नी पुन्हा आरवी शी बोलायला सुरवात केली हे बघ आरवी तू तुझ्या मनातल जे काही आहे ते माझ्या जवळ बोलु शकतेस मी तुला मदतच करनार आहे. तू हुशार आहेस   आता तुला दहावी ला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत तू खुप चांगली मुलगी आहेस मग तुझे वागणे असे का आहे तू नेहमी ड्रिंक करतेस का ? का तुला कोणी जबरदस्ती प्यायला भाग पाडली. मी डॉ आहे बेटा तु मला सगळ सांगितलेस तरच मी तुझी मदत करु शकतो तू तुझ्याच हाताने तुझे     आयुष्य का अंधारात लोटते आहेस? जरा तुझ्या आई वडिलां कड़े बघ किती काळजी करत आहेत तुझी त्यांना तुला असे बघून नक्कीच वाईट वाटत् असेल . आरवी त्यांचा तरी विचार कर. तसे आरवी चिडून् बोलली हे असले आई वडील डॉक्टर, यांना ना माझी काळजी आहे ना माझी चिंता यांना फक्त स्वहताच आयुष्य पडलेले आहे काही नाही डॉक्टर यांना नाही काही वाटत माझ्या बद्दल इतके बोलून आरवी रडु लागली डॉ नी तिला मनसोक्त रडु दिले खुप दिवसाच साचले होते ते अश्रु आज ते बाहेर पडले. थोड्या वेळाने ती शांत झाली . डॉ नी तीला पाणी दिले पाणी पिऊन ती शांत बसली . डॉ म्हणाले आता सांगशील का मला काय झाले नेमके की तू अशी वागतेस . आरवी म्हणाली,डॉक्टर मी पहिल्या पासून अशी अग्रेसिव्ह नव्हते खुप छान अभ्यास खेळ यात रमायचे . पण गेली  दोन वर्ष आई बाबांची सतत वाद भांडने होतात घरात . बाबाचा बिज़नेस आहे तरी आई हट्टाने नोकरी करते कारण वेळ जायला हवा म्हणून मी कायम घरी कामाला येणाऱ्या मावशी सोबत राहिले मोठी झाले मला जे जे हवे ते लगेचच मिळत असे. बाबा आई वर संशय घेतात त्यामुळे खुप भांडण होतात . आई सुद्धा बाबा वर डाउट घेते घरात अजिबात शांतता नाही . माझ्या कड़े लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही. आईचे मित्र आहेत तसे बाबांच्या पण मैत्रिणी आहेत.मला खुप वैताग यायचा घरात् थाबुंच नये असे मला वाटायचे मग मी माझे मन मित्र मैत्रिणी मध्ये आणि सोशल साईट वर जास्त रमवु लागले वास्तव जगापेक्षा ते आभासी जग मला जवळ चे वाटू लागले. खुप मित्र झाले एका मुलाच्या प्रेमात पण पडले त्यानेच मला ड्रिंक ची सवय लावली त्याला माहित होते मी मोठ्या घरातली पैसे वाली मुलगी आहे तो माझ्या कडूनच पैसे घ्यायचा आणि स्वहताची मौजमजा करायचा आणि मि ही आंधळा विश्वास ठेवून त्याला पैसे देत असे. पण तो माझा फक्त वापर करत होता त्याच प्रेम वैगरे काही नव्हते माझ्यावर .त्या दिवशी आमची फेरवेल पार्टी होती संध्याकाळी ,पार्टी झाल्यावर आमचा सगळा ग्रुप मिळून आम्ही एका पब मध्ये गेलो खुप धुन्द आणि रोमैंटिक असे ते वातावरण होते मी पहिल्यांदाच पब मध्ये आले होते मला ते खुप भारी वाटले सगळ्या जगाला विसरून मस्त एन्जॉय करणारी मूल मुलीं पाहून मी भारावून गेले. माझ्या मित्राने मला ड्रिंक मधून किवा सिगरेट मधून ड्रग्स दिले असतील मला काहीच माहित नाही. मला ड्रिंक ची सवय होती त्यामुळे खुप प्यायले तेव्हा माझ्या मित्राने माझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मला नशेत सुद्धा समजत होते की तो काय करतो आहे. त्या पार्टी मध्ये आमचे एक फॅमिली फ्रेंड त्यांचा मुलगा ही होता त्याने मला ओळखले आणि माझी सुटका केली मला स्व्हताच्या कार मधून त्याने सुखरूप घरी सोडले. पण माझ्या मित्रानेच माझा विश्वास घात करावा ही गोष्ट माझ्या साठी खुप शॉकिंग होती. दुसऱ्या दिवशी ज्याने मला घरी सोडले त्याने फोन करून मला सर्व काही सांगितले त्यामुळे मी वाईट संगतीत राहून कोणत्या थराला गेले याचा विचार करु लागले माझ्या मित्राने माझ्यावर जबरदस्ती केली असती आणि माझे काही बरेवाइट झाले असते तर या विचाराने मी घाबरून गेले. पण डॉ या सगळ्याला जबाबदार फक्त माझे आई वडील आहेत त्यांना माझ्याशी बोलायला देखील वेळ नाही बस्स मी मागेल तेवढे पैसे द्यायचे आणि सतत एकमेकांशी वाद घालत बसायच. माझा त्या दोघांना पूर्णपणे विसर पडला आहे.इतक बोलून आरवी ने टेबल वरील पाण्याचा ग्लास घेतला आणि पाणी संपवले. ती मनात साचलेले सगळ डॉक्टरांशी बोलली. डॉ ना समजून चूकले की पालकांच्या बेपरवाई मुळे मुलांचे आयुष्य किती धोक्याचे बनत चालले आहे. डॉ नी मिलिंद आणि रेवती ला आत बोलावले आरवी साठी काही औषधे दिली ते म्हणाले आरवी हे मेडिसिन घे यामुळे तुला रिलैक्स वाटेल आता तुला रेस्ट ची गरज आहे . आरवी ने फक्त मान हलवली. डॉक्टर म्हणाले उद्या तुम्ही दोघेच या आरवी ला नका आणू मला बोलायचे आहे तुमच्याशी. ओके म्हणत मिलिंद आणि रेवती आरवीला घेऊन तिथुन निघाले.घरी आल्यावर आरवी ने मेडिसिन घेतले आणि  ती झोपुन गेली खुप स्ट्रेस मुळे तीला विश्रांतिची गरज होती. रात्री आरवी तिच्या रूम मध्ये बसून झालेल्या घटनांचा विचार करु लागली. तीला ही समजत होते की तिचे वागणे चुकीचे आहे पण आई वडील असून ही ती ऐकटी पडली होती त्यामुळे ती प्रेमाला आपलेपनाला मायेला  बाहेरच्या लोकां मध्ये शोधत  राहिली. पण बाहेरचे जग स्वार्थी आणि फसवे असते हे त्या सोळा वर्षाच्या मुलीच्या गावीही नव्हते. अचानक परत तिच्या आई वडिलांच्या भांडनाचा आवाज तिला येऊ लागला ती दोघ एकमेकांना दोष देत होती की तुझ्या मुळेच आरवी बिघडली आहे. आरवी ने त्रासुन उशी काना वर दाबुन ठेवून झोपन्याचा प्रयत्न करु लागली तिचे डोळे भरून आले कसले हे माझे आई वडील यांना माझ्या बद्दल काहीच वाटत नाही का? तुमच्या अशा वागन्या मुळेच मी अशी बनली आहे हे का नाही समजत यांना असा विचार तिच्या मनात आला. दुसऱ्या दिवशी मिलिंद रेवती डॉक्टरां कड़े आले. डॉक्टरांनी त्यांना आरवी बद्दल विचारले ती आहे ठीक असे रेवती बोलली. डॉक्टर म्हणाले आता मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आणि डॉक्टरांनी काल आरवी जे बोलली ते सगळ त्या दोघांना सांगितले. ते ऐकून दोघ ही शॉक झाले. रेवती म्हणाली डॉक्टर रेवती अस काही करेल किवा वागेल याची जरा पण आम्हाला कल्पना नव्हती. मिलिंद म्हणाला डॉक्टर यासाठी आई ने मूली कड़े लक्ष देणे गरजेचे असते पन हिला स्वहताचे च पडलेले असते कायम म्हणूनच आरवी अशी बिघडली. तसे डॉक्टर म्हणाले,वेट वेट मि. मिलिंद यात कोणा एकाचा दोष नाही. तुम्ही दोघ ही आरवी ची जबाबदारी नीट सांभाळु शकला नाहीत. तुम्ही तिचे सर्व हट्ट पुरवत होता,मागेल तितका पैसा देत राहिलात पण आरवी ला काय हवे आहे हे कधी तुम्ही विचारले का? मुलांना नवनवीन गँझेट्स आणून देणे पैसा पुरवने म्हणजे पालकत्व पूर्ण झाले असे नसते. मूल काय करतात ,मोबाईल वर काय काय पाहतात किवा कोणते गेम खेळतात,त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत त्यांचा अभ्यास कसा चालला आहे याची कधी चौकशी केलित का तुम्ही? तुम्ही फक्त आणि फक्त भांडण करत राहिलात तुमची वयात आलेली मुलगी आहे याचा तुम्हाला पूर्ण पणे विसर पडला. पालक होण म्हणजे नुसते मुलांना जन्माला घालने नसते,तर त्या मुलाला एक जबाबदार संस्कारक्षम व्यक्ति बनवने असते. त्यांच्या कोवळया वयात त्याचे मित्र बनून त्यांचे प्रोब्लेम सॉल्व करने हे महत्वाचे असते. पन तुम्ही फक्त तुमचा ईगो जपत राहिलात. तुमच्या दोघांच्या दुर्लक्षपणा मुळे आरवी वहावत गेली तीला तुमचे प्रेम माया हवी आहे तीला तिची काळजी घेणारे आई बाबा हवे आहेत. ती ऐकटी पडली आहे तीला तुमच्या प्रेमळ आधाराची नितांत गरज आहे अजुन ही वेळ गेली नाही तुम्ही दोघांनी ठरवले तर तुमची आरवी तुम्हाला पूर्वी सारखी परत मिळेल. आता तुम्हीच ठरवा तुमचा ईगो जास्त महत्वाचा आहे की तुमची मुलगी! डॉक्टर इतक बोलून गप्प झाले . मिलिंद आणि रेवती सुन्न मनाने क्लिनिक च्या बाहेर आले. आता त्यांच्या पालकत्वाची खरी परीक्षा होती .!!!
              
 
पालक होने ही थोड्या दिवसाची जबाबदारी नसते ती आयुष्यभर निभवून नेण्याची कसोटी असते जबाबदार आणि कुशल पालक होने हे जास्त गरजेचे मुलांचे भवितव्य त्यांचे शिक्षण हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून असते. योग्य वयात योग्य वळण मुलाना लावणे ही पालकांचीच जबाबदारी असते


समाप्त ---------


हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...