Monday, February 24, 2020

शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात


 1 ) स्थळ --- आमदार दादासाहेब यांचे घर   
आज दादा साहेबांच्या घरी सकाळ पासूनच लगबग सुरू होती,त्यांचा एकुलता एक मुलगा हरीश अमेरिके हुन एम एस करून  भारतात परत येणार हॊता. त्याच्या स्वागता ची जोरदार तयारी सुरू होती. आई साहेब मुलाच्या येण्याने खूप खुश होत्या. थोड्या वेळात हरीश आला. त्याचे जंगी स्वागत झाले. आमदार साहेबांचे मित्र ,मोठं मोठे उद्योगपती,हरीश चे मित्र सगळेच आले होते. गप्पा मारत मजेत सगळे मेजवानी चा आनंद घेत होते. दादा साहेब प्रत्येकाला आपला मुलगा किती हुशार आहे आणि आज तो इतका मोठा सर्जन झाला आता मोठे हॉस्पिटल त्याला काढून देणार असेच सांगत होते,मुलाचे कौतुक करत होते . मुलगा कायम आपल्या आज्ञेत असल्या मुळे आज तो या उंची वर आहे हेच ज्याला त्याला सांगत होते. हरीश ने ही गोष्ट नोटीस केली. त्याने मनातच ठरवले एकदा बाबांशी बोलायला हवे. रात्र फार झाली होती. दादा साहेब हरीश ला म्हणाले हरीश आता तू आराम कर जा. दमला असशील . नाही बाबा पण मला थोडे बोलायचे होते. अरे आता खूप उशीर झाला आहे उद्या बोलू म्हणत ,त्यांनी हरीश ला गुड नाईट केले. सकाळी नाष्टा च्या वेळी हरीश ने विषय काढला म्हणाला,आई बाबा मला माझ्या करियर विषयी बोलायचे आहे. दादा साहेब म्हणाले,बोल कुठे आणि किती मोठे हॉस्पिटल काढायचे आहे तुला? बाबा हॉस्पिटल तर मला काढायचे आहे पन ते पूर्ण चॅरिटेबल हॉस्पिटल असेल. मी नाम मात्र शुल्क घेऊन गोर गरिबांना माझी सेवा देणार आहे. ज्यांची परिस्थिती नसेल अशा लोकांना मी अगदी मोफत सेवा देणार आहे. तसे दादा साहेब म्हणाले,तुला समजते का हरीश तू काय बोलतोस? अरे तुझ्या शिक्षणा साठी इतका खर्च केला,फॉरेन ला तुला एम एस साठी पाठवले ते काय असे फुकटात लोकांना सेवा देण्या साठी नाही.  बाबा पण मला पैशाचा सोस नाही मला माझ्या कामाचे चीज करायचे आहे.आज किती तरी गरीब असह्य लोक पैशा अभावी वैद्यकीय सेवा मिळवू शकत नाहीत,खेडो पाड्यातील लोक,गरोदर स्त्रिया या योग्य ट्रीटमेंट न मिळाल्या मूळे मृत्युमुखी पडत आहेत. चॅरिटेबल हॉस्पिटल काढणे हे माझे स्वप्न आहे बाबा. नाही हरीश तू चुकतो आहेस. अशा तुझ्या वागण्याने तू कंगाल होशील. मी तुला या साठी शिक्षण दिले नाही.पण बाबा तुम्ही पण राजकारणात आहात,तुम्ही गरजूनां आपल्या फ़ंडा तुन मदत करता ना.?गरिबांना चे प्रश्न समस्या सोडवता  तसेच माझे ही काम मला विना मोबदला करायचे आहे. हरीश आम्ही लोकांना मदत करतो पण सरकारच्या पैशा तुन,स्वहताचा खिसा रिकामा करून नाही. फक्त खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात हे ज्याला जमलं तोच आयुष्यात पुढे निघून जातो. तुझ्या सारखा विचार मी केला असता ना तर तू इतका शिकला नसतास,तेव्हा हा विचार डोक्यातुन काढून टाक आणि भरपूर पैसा कमव. हरीश म्हणाला,बाबा मला तुमचे म्हणणे पटत नाही. माझी तत्व खूप वेगळी आहेत. तसे मध्येच आई म्हणाल्या,हरीश अरे बाबा बरोबर बोलत आहेत.तू म्हणतोस तसे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत आपल्या शहरात,तिथे जातील लोक,तू का असा हट्ट करतो आहेस? आई मी खूप वेगळा विचार करतो आहे मी स्वार्थी नाही आहे आणि माझ्या कलेच्या जोरावर मला पैसा कमवायचा नाही. दादासाहेब रागात म्हणाले,ठीक आहे हरीश तुला जर भिकेचेच  डोहाळे लागले असतील तर आमचा नाईलाज आहे. तेव्हा तुझा मार्ग वेगळा आणि आमचा वेगळा. तुझ्या शिक्षणचा खर्च वाया गेला असे समजेन मी. हरीश आई वडीलआणि त्याचे ध्येय याचा कात्रीत सापडला!!
 2)  स्थळ --  प्रतिष्ठित समाज सेविका शमा ताई यांचे घर
     आई तुझा इंटरव्ह्यू कसा झाला? अमेय ने विचारले. अरे छानच झाला,माझ्या कामाचं कौतुक करत होते सगळे.गरजू आणि असह्या महिलांना मदत करणाऱ्या समाजात नावलौकिक मिळवणार्या शमा ताई यांचा आज इंटरव्ह्यू होता. समाजकार्यात स्वहताला त्यांनी अगदी झोकून दिले होते. आई एक गोष्ट बोलायची होती अमेय म्हणाला,बोल काय काम आहे का ? तसा अमेय म्हणाला, हा आई माझे एका मुली वर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचे आहे. कोण आहे ती काय करते? आई तिचे नाव शर्मिला आहे आई वडील आहेत तिला माझ्याच ऑफिस मध्ये काम करते. बर मग तिला घरी घेऊन ये मी भेटेन  शमा ताई म्हणाल्या. तसा अमेय म्हणाला,पण आई तिचा डिओर्स झाला आहे आणि एक मुलगा आहे तिला 3 वर्षाचा. काय म्हणालास अमेय शमा ताई जोरात ओरडल्या. अरे जगातल्या सगळ्या मुली संपल्यात का ? तुला काय म्हणून ही घटस्फोट झालेली मुलगी आवडली? वेड लागलंय का तुला,? आई अग प्रेम आहे माझं तिच्यावर मग ती डिओर्सी आहे का विधवा आहे याचा मला फरक पडत नाही. प्रेमात जात पात धर्म ,डिओर्सी,असे काही बघितले जात नाही कारण प्रेम प्रेम असत नाहीतर तो स्वार्थ झाला असता. अमेय बुद्धी भ्रष्ट झालीय का तुजी? अरे तू अजून सिंगल आहेस तुला मुलगी ही तशीच हवी समजते का?  पण आई मी तिला शब्द दिला आहे गेली 2 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि तू पण एक सोशल वर्कर आहेस ना तू तुझ्या भाषणात सांगतेस की विधवांचा पुनर्विवाह,घटस्फोटी महिलेचा स्वीकार आज च्या तरुण मुलांनी ही करायला हवा,तर समाज परिवर्तन होईल . यात त्या महिलांचा दोष काय त्यांची चूक काय ? मग आता कुठे गेले तुझे तत्वज्ञान? अमेय समाज सेवा मी करते म्हणून बाहेरची घाण मी माझ्या घरात नाही आणणार. समाजसेवा बाहेर च्या बाहेर करायची ती घरा पर्यंत आणायची नसते. आपण जे बोलतो तसेच वागले पाहिजे असा काही नियम नाही समजले. आई तू हे बोलतेस मग समाजसेवीका म्हणून समाजात मिरवतेस मान सन्मान घेतेस त्याच काय? अमेय काही ही झाले तरी मी हे लग्न नाही होऊ देणार तुला आई हवी असेल तर त्या शर्मिलेला कायमच विसर नाहीतर आई ला विसरून जा. अमेय ला हे समजेना की समाजसेविका म्हणून सन्मानाने जगणारी आपली आई ,तिचे खरे रूप कोणते ? 
3) स्थळ --- एक मध्यमवर्गीय कुटुंब
   विराज कॉलेज मधून घरी आला. आई ने विचारले काय रे विराज ती मुलगी कशी आहे आता. आई ठीक आहे ती पण खूप घाबरली  आहे .पण त्या गुंड मवाली मुलांना शिक्षा व्हायलाच हवी .काही सांगता येत नाही कोणावर काय प्रसंग येईल आई म्हणाली. हु पण आई आम्ही  सगळे उद्या पोलीस चौकित जाणार आहोत आणि त्या मुलां विरुध्द साक्ष देणार आहोत. विराज असे काही ही करू नकोस बाकी चे मुलं जाऊ दे पण तू मात्र नको या फ़ंदात पडू नको तो पोलीसांचा ससेमिरा.आई अग भर कॉलेज मध्ये एका मुलीचा विनयभंग होतो आणि आम्हीं सगळ बघून पण काहीच करायचे नाही का ? त्या मुली ची चूक काय त्यात?कोणीतरी गुंड येतो आणि मुलीची छेड काढतो तिला लज्जास्पद वागणूक देतो आणि आपण फक्त बघ्याची भूमिका करायची का? पण विराज तू काही पाहिलेच नाही असे सांग मग झालं तर!आई असे कसे बोलतेस त्या मुलीच्या जागी आपली वैशु पण असू शकते ना ? नाही ना आपली मुलगी मग नको इतका विचार करुस . बाबा आले  तेव्हा घरात म्हणाले काय वाद चाललाय इतका? विराज ने सगळं बाबा ना सांगितले बाबा आता तुम्हीच सांगा आईला ती मला साक्ष द्यायला जाऊ नको म्हणते. बाबा म्हणाले सुचित्रा जाऊ दे विराज ला ,अस गप्प बसून राहिलो तर अजून किती मुली या अत्याचाराला बळी पडतील. ते काही नाही विराज तुला माझी शपथ आहे जायचे ना तुला पोलिस चौकित खुशाल जा पण आई ची शपथ मोडून जा.  विराज असहाय हताश पणे गप्प बसला !!! 
  
    वरील उदाहरणे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत,कोणाच्या ही भावना दुखवण्याचा अजिबात हेतू नाही.या उदाहरणांना काही अपवाद ही असू शकतात . समाजात बदल सगळयाना हवा आहे मग ती कचऱ्याची समस्या असो,प्रदुषण भ्रष्टाचार,किंवा स्त्रियांना वरील अत्याचार, पण सुरवात कोण करणार इथे गाडी अडते. "शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात" या मनोवृत्तीतून आपल्यातून कुणी पुढे येत नाही. आपण प्रश्नच विचारत नाही. कारण प्रश्न करायला आपल्याच संकल्पना अजून स्पष्ट नाहीत. आपण कोणत्या बदलाची आशा करतोय? कोणत्या उद्याच्या भारताची स्वप्न पाहतोय?आज एखादा सहज म्हणतो की "मी देशासाठी अमुक अमुक कार्य केले असते पण देशाने मला काय दिले?" आपल्याला देशाने काय दिले त्यापेक्षा आपण देशाला काय दिले याचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण शेजारच्या घरात. एखादा चांगला काम करायला नको पण त्याचा फायदा मात्र मिळायला हवा. खरच महाराजांनी असाच विचार केला असता. तर आज आपण कोणत्या अवस्थेत जगत असतो याचा विचार करायला हवा!! 

 संगीता देवकर प्रिंट / मीडिया रायटर
 
  






No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...