Thursday, January 30, 2020

सौन्दती ची रेणुका आई

मार्गशीर्ष महिन्यात सौंदत्ती यात्रे नंतर कोल्हापूरकरांना वेध लागतात ते ओढ्यावरच्या आंबिल यात्रेचे.
ओढ्यावरची यल्लम्मा अर्थात सौंदत्ती रेणुकेचे कोल्हापूर आणि पंचक्रोशीतले जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान. जयंती नंदी च्या तीरावर रेणुका परशूराम मातंगी आणि मंदिरा पासून दूरवर वसलेलं जमदग्नी अशा मंदिरांचा हा समूह कायमच भक्तांनी गजबजून जातो. या मंदिराशी निगडीत उपासना आहे ती जोगती संप्रदायाची . स्वत:चे जीवन रेणुका चरणी अर्पण करून तीच्या जोगव्यावर जीवन चालवणाऱ्या या वर्गाची सगळी सुखदुःख देवी बरोबर जोडलेली असतात.
गेली कित्येक दशके कोल्हापूरातील मानाचे तीन जग म्हणजे देवीचा मुखवटा सजवलेली वेताची परडी घेऊन जोगती मंडळी सौंदत्तीला जातात. ओढ्यावरच्या मंदिरातला सोनाबाई(माई) जाधव रवीवार पेठ टेंबे रोड येथील बायाक्काबाई चव्हाण कसबागेट गंगावेश येथील लक्ष्मीबाई जाधव अशा तीन जगाबरोबर गेलेल्या काही वर्षांपासून बेलबाग येथील आळवेकरांचा जग चंपाषष्ठी दिवशी सौंदत्तीला प्रस्थान करतात. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी निघून गोकुळ शिरगाव येथे मुक्कामी येतात. तिथे जीच्या परवानगी ने यात्रेला गेले त्या त्र्यंबुली देवीची कृतज्ञता म्हणून जत्रा करतात.आंबिल यात्रेच्या पूर्व संध्येला ओढ्यावर मंदिरात येतात रेणुका परशुराम मातंगी ची आरती करतात सासनकाठी सह मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून आपल्या नियत जागी विराजमान होतात. आंबिल यात्रे दिवशी पहाटे देवांना अभिषेक घालून अलंकार महापूजा केली जाते. मग भाविकांची गर्दी होते ती नैवेद्य अर्पण करण्यासाठी. हा नैवेद्य म्हणजे अस्सल मराठमोळ्या पाककृतींचा नमुना आहे. भाकरी वरणं म्हणजे पावटा आणि वांग्याची एकत्र भाजी मेथीची भाजी पाटवड्या बेसन लावून केलेली ताकाची कढी म्हणजे आंबिल भात दही कांद्याची पात गाजर केळ लिंबू असं ताट सजवून भक्त देवळात गर्दी करतात. देवीला नैवेद्य अर्पण करून आपण आपल्या नातेवाईकांसह सहभोजन करतात.जत्रेतल्या खेळांचा खरेदी चा आनंद लुटतात. या नैवेद्य अर्पण करण्यात एक अनोखा रिवाज आहे एका भक्ताने दिलेला नैवेद्य दुसऱ्या भक्ताला प्रसाद म्हणून दिला जातो.
दुपारी आरती पालखी सोहळा होतो. आता जत्रेला रंग चढतो .रात्री जगांची आरती होते आणि सुती चौंडक्याच्या तालावर जग आपापल्या घरी मार्गस्थ होतात.आणि यात्रेचा सोहळा संपन्न होतो.
या सगळ्या सोहळ्याला खरं तर एक भावनिक कांगोरा आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी विधवा होते त्या दिवसापासून देवी आणि तिचे जोगती यांनी कुंकू आणि पर्यायाने सर्व सौभाग्य अलंकाराचा त्याग करतात ही आंबिल भाकरी म्हणजे त्यांना म्हणजे अगदी देवीला देखील सांत्वनाचा घास भरवायचा तिला आणि जोगती मंडळीना पुन्हा कुंकू आणि सौभाग्य अलंकार अर्पण करून पुन्हा पूर्ववत शृंगार सुरू करण्यात येतो. असा हा आंबिल यात्रेचा सोहळा जणू सुखदुःखाच्या सिमारेषेची जाणीव च म्हणावी लागेल.
ॲड.प्रसन्न विश्वंभर मालेकर कोल्हापूर

Monday, January 27, 2020

यु अँड मी ( you & me)


यु अँड मि

मितेश एक वर्षांनी आलो असु आपण सिंहगडावर ,,हो ना? संयुक्ताने विचारले,,हो संयु मितेश म्हणाला.
कॉलेज मध्ये असताना किती वेळा यायचो आपण ,आता तू आणि तुझे काम ,टेन्शन बस्स,,माझ्या साठी पण तुला वेळ नसतो मितु,
मितेश ने तिला आपल्या जवळ बसवले ,तिचा हात हातात घेत म्हणाला,काय करू ग कामाचा इतका ताण असतो की बाकी काही सुचत नाही.आपल्या लग्नाला 2 वर्ष कशी झाली हे ही समजले नाही. हवेत गारवा पसरला होता,आभाळ ही भरुन आलेलं होत,पाऊस कोणत्या ही क्षणी बरसणार होता, संयुक्ता त्याला म्हणाली,मितेश कामात इतका पण बिझी राहू नकोस की मला ही विसरून जाशील.
नाही ग,तुला कसा विसरेन,,बस थोडं कामातून वेळ मिळत नाही इतकंच.
मितु तुला आठवत का रे,,याच गडावर बेधुंद पावसात तू मला प्रपोज केलं होतंस,
हो संयु तुला पाऊस प्रिय आणि मला तितकासा नाही आवडत पाऊस,पण तुझा हट्ट होता ना की भर पावसात मी तुला प्रपोज करावं,
हो,किती मस्त मजा करायचो आपण त्या दिवसात,एकमेकांच्या प्रेमात आंकंठ बुडालेलो आपण,,जगाची, लोकांची पर्वा न करता मनसोक्त फिरायचो ,तू आणि मी इतकं छोटं जग होत ना आपलं. आणि आता मी सोडून बाकी सार जग तुझं आहे मितेश ,,संयुक्ता लटक्या रागाने म्हणाली.
आता पावसाचे मोठे मोठे थेंब अंगावर बरसू लागले ,,तसा मितेश म्हणाला चल संयु त्या झाडाखाली जाऊ पाऊस सुरु झाला,ती म्हणाली,,नाही तू जा मी आज पावसात भिजणार,,अस म्हणत संयुक्ता दोन्ही हात पसरून पावसाचे थेंब अंगावर झेलू लागली,आणि मितेश झाडा खाली उभं राहून संयु कडे पहात होता,,अगदी लहान मुला सारखं ती पावसात भिजत होती,पाण्याचे तुषार पुनःपुन्हा उंच उंच उडवत होती,,पाण्याचे थेंब तिच्या केसांमधून अलगद ओघळून तिच्या गालावर येत होते,पर्पल येल्लो चुडीदार मध्ये संयु खूपच छान दिसत होती,,एका हाताने ओढणी सावरत दुसऱ्या हाताने कपाळा वर येणारी चुकार बट काना मागे सरकवत होती,गालावरून येणारा पाण्याचा थेंब अवखळ पणे एखाद्या अल्लड प्रियकरा सारखा संयु च्या ओठाचे हलकेच चुंबन घेत ,पुन्हा पावसात लुप्त होत होता,,हे तिचे मोहक रूप मितेश दुरुन च पाहत होता आणि गालातल्या गालात हसत होता,,किती अजून अवखळ लहान मुलीसारखी निरागस आहे माझी संयु,,किती बिनधास्त पणे प्रत्येक क्षणाचा आनंद घेते,आणि तसंच निरपेक्ष निस्वार्थी प्रेम माझ्यावर करते,मला समजून घेते,कधी कधी रुसते पण लगेचच माझ्या जवळ पण येते,आणि मी मात्र कामाच्या स्ट्रेस मुळे कायम तिला हर्ट करतो,कधी कधी ओरडतो सुद्धा ,पण ती कायम मला समजून घेते,काय मागते ती माझ्या कडून फक्त माझा थोडा वेळ आणि थोडा सहवास,,असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. संयु त्याच्या जवळ आली,ती पूर्ण भिजली होती,त्याला हाताला धरून ओढत म्हणाली चल ना मितु किती मस्त वाटत बघ पावसात भिजून,,सगळं टेन्शन विसरून रिलॅक्स वाटत,,ये ना,,मितेश हॉऊ अनरोमँटिक यू आर,,,तिने त्याला चिडवले,,तसा मितेश तिच्या साठी पावसात आला,,तिला अचानक त्याने आपल्या हाताचा विळखा घालून आपल्या जवळ आणले,तिच्या डोळ्यात पहात म्हणाला,काय म्हणालीस,मी आणि अनरोमँटिक ,,ती लाजली आणि खाली नजर फिरवली,,त्याने पुन्हा हाताने तिचा चेहरा वर उचलला,,म्हणाला,किती गोड दिसतेस यार,,तुझी ही गालावरची लाली,हे गुलाबी ओठ,,आणि हे तुझे चिंब भिजलेले रूप सजलेले,,तो एकटक पहात होता तिच्या कडे,,ती म्हणाली,मितेश काय एकदम फिल्मी,
हो,,तूच म्हणाली ना मी अनरोमँटिक आहे ,,मग आता सांग ,म्हणत तिच्या ओठावर आपले ओठ टेकवणार तितक्यात संयुक्ता त्याला ढकलून दूर पळाली,आणि पुन्हा त्याला चिडवत म्हणाली,काय मग मिस्टर रोमँटिक पावसाने जादू केली ना,तो तिला पकडायला जाऊ लागला तशी संयु पुढे पळत होती,,तसा मितेश ओरडला संयु पावसात पळू नकोस पडशील,,इतके म्हणे पर्यंत संयु एका दगडाला पाय लागून पडणार होती  तेव्हा मितेश ने पटकन पळत जाऊन तिला आपल्या मिठीत पकडले,,आणि तिला ओरडला तुला बोललो ना पडशील म्हणून का ऐकत नाहीस तू संयु,,त्याने बोलताच तिचा चेहरा पडला,,तिच्या कडे पहात मितेश जोरजोरात हसू लागला,,बघ बघ कशी घाबरलीस मला,,कशी गंमत केली,,म्हणत तो अजूनच तिला चिडवू लागला,ती त्याला मारायला लागली तसा तो ही पळू लागला,,वरून पाऊस बरसत होता आणि इथे हे दोघे एकमेकांच्या सहवासात चिंब चिंब होत होते,संयु ला आता थंडी वाजत होती ती एका झाडा खाली थांबली मितेश ही आला,म्हणाला काय मग दमलीस का इतक्यात अजून भिजायचं नाही का? मितेश नको आता बास मला थंडी वाजते आहे,,
तसा मितेश खट्याळ पणे म्हणाला,मग मी काय करू ज्याने तुझी थंडी पळून जाईल,,
गप बैस मित्या,,संयु लाडाने त्याला मित्या म्हणत असे.
मितेश ने तिचे हात हातात घेतले ,तिच्या डोळ्यात पहात म्हणाला,संयु खूप दिवसांनी आपण असे एकत्र फिरत आहोत ना,मी फक्त कामच काम करत राहतो,पण तू माझी वाट पहात असतेस हे ही माझ्या गावी नसते,खूप कमी वेळ देतो ना मी तुला.
संयुक्ता बोलली,मितेश तुला वर्क लोड असतो खूप हे मला माहित आहे,मग जमेल तसा वेळ तू मला देतोस ना,मी काही तक्रार केली का,?
हेच संयु तू तक्रार करत नाहीस कारण मी ओरडतो चिडतो म्हणून तू समंजस पणे गप राहतेस,,किती समजून घेतेस तू मला,,आणि मी मात्र,
मितु असे काही नाही,तू देशील तितका वेळ मला पुरेसा आहे राज्या,,मितेश ने तिला आपल्या बाहुपाशात घेतले,म्हणाला,आज खूप छान वाटलं तुझ्या सोबत वेळ घालवला,इथून पुढे मी नक्की तुझ्या साठी वेळ काढेन संयु,,मी इतके दिवस काय गमवत होतो हे आज मला समजले ग,आपला हा क़्वालिटी टाइम किती मिस केला मी.
मितेश आय लव यू अण्ड ऑलवेज विथ यु डियर,,असे म्हणत सयुक्ता ने त्याला घट्ट मिठी मारली.
मितेशने आपली मिठी सोडली आणि तीला म्हणाला,संयु हे बघ,आणि तो गुडघ्या वर बसला तिचा हात्  आपल्या हातात घेत म्हणाला,माय स्वीटहार्ट संयु  आज मी पुन्हा एकदा  नव्याने तुझ्या प्रेमात पडलो आहे ,आय लव यू जान,,आय रियली लव यू,, आणि त्याने तिच्या हाता वर किस केले,सयुक्ता ही खुप खुश झाली.मितेश ने पुन्हा तीला आपल्या मिठित घेतले आणि म्हणाला जायचे का आता घरी,,
हो मितेश म्हणत ते दोघे त्यांच्या कार कड़े निघाले,घरी आले,संयु फ्रेश होउन् आली तर मितेश ने दोघां साठी मस्त कॉफी बनवली होती,कॉफी संपली तसे मितेश म्हणाला,मग सांग संयु कशी झाली होती कॉफी?
ती म्हणाली ठीक पन तूझ्या इतकी स्वीट नव्हती ना!
अच्छा म्हणत मितेश तिच्या जवळ आला,तिच्या गालावरुन आपले बोट फिरवत म्हणाला ओह्ह म्हणजे तुला स्वीट हवे आहे तर,,
तसे काही नाही मित्या,,मग असे बोलत मितेश ने तिचे ओठ आपल्या ओठानी कैद केले,पुन्हा एकदा हे प्रेम वेडे प्रेमाच्या पावसात चिम्ब भिजत होते,,बाहेर पाऊस   अजुन ही बरसत होता,जणु या दोघांच्या प्रेमाचा तो एकमेव साक्षीदार होता...!!!!

 

क्यू..??

जानकर भी क्यू यू अंजान बनते हो
हमे तडपता छोड यू महफिल से चले जाते हो
आंखोसे सब कुछ बोल जाते हो,
बिखरे हुये हमारे दिल को,क्यू समेंटना चाहते हो
भुला नही सकेंगे हम ,क्यू वो यादे दे रहे हो
आज हम साथ ही सही,,मगर कल कहा ,,?
ये जानकर भी क्यू पास आ रहे हो.
भंवर में है कशती  हमारी,,क्यू आप साहिल बनना चाहते हो.
हम खामोश हैं  ऐसे ही हमे रहने दो,
बुझ गये है ख्वाब सभी,बस अब नया ख्वाब ना दिखावो,
अश्को का क्या है,,उन्हे यू हि बहने दो...!!!!

----------संगीता..

Sunday, January 12, 2020

स्पेस मूळे हरवतोय नात्यांचा श्वास


स्पेस मुळे हरवतोय नात्याचा श्वास,,
      
आजकाल उच्च शिक्षणा मुळे आर्थिक स्वातंत्र्या मुळे मुले आणि मुली यांच्या लग्ना बाबत आणि जोड़ीदारा बाबत च्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत,एकमेकांना त्यांच्या गुणदोषा सकट स्वीकारने किवा कोणा एका साठी तडजोड़ करने हे यांना पटत नाही.प्रेम विवाह असो किवा ठरवून केलेला विवाह असो,मूल मुलीं एकमेकांना लग्ना आधी भेटतात्,बोलतात,,त्यामुळे स्वभाव कसे आहेत हे समजते तरी देखील लग्ना नंतर मि का तडजोड़ करू? असा प्रश्न असतोच,मि आहे अशी आहे किवा मि आहे असा आहे यात बदल नाही होणार हाच दोघांन् मधील वादा चा मुद्दा असतो,मला माझी स्पेस हवी जशी लग्ना आधी होती हा मुलीं चा जास्त हट्ट असतो,पन लग्नानंतर काही जबाबदारी,कर्त्तव्य,पार पाडावे लागतात,,या कड़े दोघे ही कानाडोळा करतात,मना सारखे जगण,प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य,याला स्पेस म्हणत नाहीत,स्वातंत्र्य दोघांना हवे पण त्याला ही काही  लिमिट्स असू शकतात,पति पत्नी म्हणून वावरताना दोन्ही कढील कुटुंबाच्या संस्काराची मूल्ये जपली गेली पाहिजेत,मित्र मैत्रिणी सोबत वेळ घालवने,पार्टीज ना जाणे,,यात दोघांचा ही सहभाग हवा,माझे मित्र आमचा ग्रुप या ऐवजी आपले एकत्र असणे जास्त महत्वाचे आहे,याचा विचार दोघांनी करावा,स्पेस हवी म्हणून स्वातंत्रया चा अतिरेक करु नये,मनमानी करने म्हणजे स्पेस नव्हे,दोघांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन,एकमेकांना पुरेसा वेळ देणे,,आदर करने,जबाबदारी वाटून घेणे,काही वेळेस गरज असेल तर तड़जोड़ करने,एकमेकांच्या भावना समजून घेणे,अडचणी तुन एकत्र दोघांनी मार्ग काढ़ने,एकमेकांना समजून घेऊन एकमेकांच्या कामाचा ही आदर राखने गरजेचे आहे,मि,माझे,असा अहम भाव ठेवल्यास नात्यात गोड़वा टिकनारच नाही,,म्हणून नात्यां मधील श्वासा घुसमटन्या इतकी स्पेस नात्यात असुच नये,आपण आपले,हा दृष्टिकोण दोघांनी ठेवायला हवा,,तर नाते अखण्ड राहिल,
,             ----संगीता देवकर,,,प्रिंट/मिडिया रायटर,,पिम्परी पुणे 18,

Thursday, January 9, 2020

खव्ययेगिरी...,,


खव्य्येगीरी,


हॉटेल"नुसते नाव घेतले तरी तोंड़ाला पाणी येते ना!!मग लहान मूल असो ,गृहिणी असो हॉटेल म्हन्टल की भारी खुश होतात,हॉटेल चे चविष्ठ जेवण,तिथले इंटीरियर प्रत्येकाला मोहात पाडत.आपल्या भारतीय खाद्य संस्कृति मध्ये विविध प्रकार चे पदार्थ पाहावयास मिळतात,रूचकर ,चविष्ठ पदार्थ ही आपली खासियत आहे.ती पुरातन काळा पासून सुरुच आहे.तरी देखील हॉटेल ची सवय किवा हॉटेल चा मोह आपल्याला सोडवत नाही.मध्यमवर्गीय कुटुंबा मध्ये तर वीक एन्ड ला जेवायला बाहेर जायचे हा पायंडाच पडला आहे.मुलांना थोड़ा खान्यात चेंज  तर घरच्या गृहिणी ला एक दिवस आराम!! रस्त्या वरच्या वडा पाव पासून ते फाइव स्टार हॉटेल पर्यन्त चा हा प्रवास भारतीय संस्कृतीत उल्लेखनीय च म्हणावा लागेल.ज्याला जे परवडते,मग तो वडा पाव असो,ढाबया वरचे जेवण असो,किवा फाइव स्टार मधले जेवण असो,प्रत्येक जण हॉटेल ची चव चाखतच  असतो.फार पूर्वी हॉटेलची सुरवात ही बाहेरगावी जाणाऱ्या साठी खान्याची सोय व्हावी या उद्देशाने झाली.कामा निमित्ताने बाहेरगावी जाणारे लोक,त्यांची खाणयाची ,राहण्याची सोय म्हणून हॉटेल कड़े पाहिले जायचे.त्यामुळे प्रत्येक शहरात हॉटेल्स ची साखळी च तयार झाली.परगावी एकटे राहणाऱ्या विद्यार्थासाठी हॉटेल किवा मेस म्हणजे पोट भरणया ची सोय असायची.आज कोणता ही समारंभ असो तो हॉटेल मध्ये साजरा करण्या ची जणू चढाओढ दिसून येते,हॉटेल मध्ये जाणे,ही आज प्रत्येकाची प्रतिष्ठे ची बाब बनली आहे,कामच्या मीटिंग असोत,वाढदिवस असो,लग्नाचा वाढदिवस असो,तो हॉटेल मध्येच साजरा करण्याची प्रथा सगळी कडेच दिसून येते,पूर्वी सारखे नातेवाईकाना घरी जेवायला बोलावून 15/ 20 लोकांचा स्वयंपाक करने,त्यांना अगत्याने खावु घालने,ही पद्धत हळू हळू हॉटेलिग मुळे बंद होत चालली आहे.सध्या विभक्त कुटुंब पद्वति मुळे कोणाला  कामाचा त्रास नको आहे,,त्यात नोकरी करणारे जोड़पे असेल तर घरी स्वयंपाक करण्या पेक्षा बाहेर खान्याला प्राधान्य दिले जाते.त्यामुळे प्रत्येकाची गरज,आवड़,लक्षात घेता हॉटेल ची चलती कायमच राहनार आहे,

     आज हॉटेल व्यवसायाचा विस्तार पाहता,एक चांगला व्यवसाय म्हणून या क्षेत्रा कड़े पाहिले जाते,यातूनच हॉटेल मैनेजमेंट या अभ्यास क्रमाची निर्मिति झाली.आज बरेच जण हॉटेल व्यवसायात उतरत आहेत,मुलां मध्ये शेफ,हॉटेल मैनेजमेंट,याची आवड़ दिसून येत आहे आणि करियर साठी ही हा एक उत्तम पर्याय आहे,चांगल्या दर्जाची सेवा,रूचकर जेवण,आर्कषक सजावज या गुणा मुळे या हॉटेल व्यवसायास प्रचंड मागणी आहे.या व्यवसायास कधी ही मरण नाही,फक्त उत्तम गुणवत्ता,उत्कृष्ट सेवा,यावर या व्यवसायाचे भविष्य ठरते.मित्रां सोबत पार्टी असो,किवा गेट टूगेदर असो होटेलिंग तो बनता ही बनता हैं,,,एकत्र हसत खेळत जेवनाचा आस्वाद घ्यायचा तर हॉटेल ला पर्याय नाही,आणि हो बायको माहेरी गेली तरी तुमच्या पोटा ची काळजी घ्यायला हॉटेल आहेतच,अधुन मधून थोडा बदल हवा ,,तेच तेच घरचे खावून कंटाळा आला असेल,,तर  गो गेट रेडी फॉर हॉटेल,,,,,,!

                       ___ संगीता देवकर.....प्रिंट/मिडिया रायटर,,पिम्परी पुणे18

वेलकम 2020


वेलकम 2020


डिसेबर महीना सुरु झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते नवीन वर्षा च्या आगमनाचे,येणाऱ्या वर्षात काय काय करता येईल याचा विचार सगळे जण करत असतात.नवा उत्साह,नवा जोश,नवे स्वप्न,यांची शिदोरी सोबत घेवून आपण नव वर्षाचे स्वागत करतो.
आजच्या आधुनिक युगा मध्ये नात्याची वीण ढिली होत आहे,इतरां सोबत आनंद वाटून घेण्याची वृती दुर्मिळ होत चालली आहे.एकीकडे दोन वेळ च्या जेवंणाची भ्रांत पडलेली असताना दुसऱ्या बाजूला 31 कसा साजरा करायचा या नियोजनात महिना भर आधीच गुंतलेली तरुणाई दिसत आहे.तसेच आपलेपणा,आपुलकी,प्रेम याने ओतप्रोत भरलेली काही माणसे आज अंधारातील उजेड बनून दाहिदिशा उजळवून टाकत आहेत. सकारात्मक विचार घेऊन नव्याने जगण्याची सुरवात करणारी काही तरुणाई पहिली की त्यांना सलाम करावासा वाटतो.आजकाल अपयशा ची कारणे सांगनारे बरेच जन असतात्,परिस्थिती,पैसा,शिक्षण अशी कारणे देवून अपयश आले असे सांगतात,पण धेययवादी माणसे संघर्ष करत जिद्दिने विजय ही मिळवतात.सकारात्मक विचार आणि मनाची तयारी असेल तर कोणती च गोष्ट अशक्य नसते,नववर्षात नव निश्चय,आणि संकल्प हवा.धावत्या जगासोबत धावत असताना अनेक प्रकारचे लोक भेटतात ,विविध प्रवृति चे,स्वभावाचे ,त्यांमुळे काहीवेळेला मनस्ताप ही होतो,यासाठी आपल्या मनावर ताबा असणे गरजे चे आहे.,यासाठी काही गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात.
स्वता :साठी वेळ काढा- घरातील काम आणि नोकरीतील ताण,यामुळे स्वहता कड़े म्हणावे तितके लक्ष देता येत नाही,दिवसभरातील 10 ते 15 मिनिटे स्वतः साठी राखुन् ठेवावीत,या वेळेत आपल्याला आवडेल ते काम जसे संगीत ऎकने,व्यायाम करने,आपल्या आवडत्या कलेला वेळ देणे,जेणे करुन् आपले मन प्रफुल्लित होईल,उत्साही होईल.
सकारात्मक विचार करा- एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा विचार करने ही मानवी मनाची वृत्ती च आहे.मग विनाकारण त्या गोष्टी चा विचार करने,त्याचा बाऊ करने आणि मनस्ताप करुन् घेणे हा आपला स्वभाव बनून जातो,अशा परिस्थितीत सकारात्मक विचार करने,आपला आत्मविश्वास ढळू न् देणे आपल्याच हातात असते.त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा.
स्वता ची कामे स्वता करा- दुसऱ्या वर अवलंबून राहायची आपल्याला खुप सवय असते,त्यामुळे आपली कामे होत नाहीत् उलट मनस्ताप होतो,म्हणून कामाचे नियोजन करुन् आपले काम आपणच करण्या कड़े कल असावा,यामुळे कामा ची शिस्त आपोआप लागते.
नवीन वर्षाचे स्वागत चांगल्या गोष्टिनी केले तर म्हणजे आपल्या प्रियजनांना,नातेवाईकाना मेजवानी देण,सहलीचे आयोजन करण,आपल्या क्षेत्रातील व्यक्ति सोबत काहि चर्चा सवांद साधने,चांगल्या विचारांचे आदान प्रदान करन,चर्चासत्र आयोजित करने,मित्र मैत्रिणीना घरी बोलावून गोड़ धोड खाउ घालने,,उगाचच नवीन वर्ष सेलिब्रेशन म्हणून ड्रिंक्स करण्या पेक्षा गोड धोड़ खाणे केव्हा ही चांगलेच!
आयुष्यातील एक वर्ष सरलं म्ह्णून जरी आयुष्य एक वर्षाने सरलेलं असल तरी जगण सरलेलं नसतं आणि जगताना तारतम्य बाळ्गावेच लागते हे विसरून ही चालत नसतं.रोज दैनंदिनी लिहायची सवय करावी,एखाद्या ब्लॉग लिहावा,,मग वर्ष संपता संपता ती रोजनिशी उलगडून पहावी त्या लिहिलेल्या कविता,कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात यात एक वेगळाच् आनंद मिळेल.
सरलेलं वर्ष आपल्याला बरंच काही शिकवून गेलेल असत जे आपल्याला पूढ्च वर्ष जगण्यासाठी उपयोगी पडणार असतं. त्यामुळे आपण सरलेल्या वर्षात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करायची नाही हे आपण मनाशी ठाम ठरवायला हंव. मागील वर्षीच्या शेवट्च्या मध्यरात्री प्रत्येकाने काही मिनिटे एकान्तात स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवं आपण कोण आहोत ,आपण काय आहोत, आपल्याकडे काय आहे, हे सारं विसरून, आपला अहंकार बाजूला सारून जीवन क्षणभंगूर आहे आणि या क्षणभंगूर जीवनात आपण असं काही केल आहे का ज्यामुळे आपण जग सोडल्यानंतरही लोक आपल नाव आदराने घेतील ? या प्रश्नाच उत्तर सापडताच जर प्रत्येकाने स्वतःच्या नव्हे तर जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक वर्षी एक संकल्प केला तर येणार प्रत्येक नवीन वर्ष सर्वांनाच सुखा समाधानाच आणि समृध्दीचच जाईल .!!!

-----///--///-----///----////-----////----


संगीता देवकर,प्रिंट/मिडिया रायटर,पिम्परी पुणे 18.


आज फिर आप की कमी सी है


!!    आज फिर आप की कमीसी है,,!!

आज फिर आप की कमी सी है
चले आवो ,ना जाने कबतक जिंदगी है,,
ओ 'तेरी आँखो से छलकता जाम,वो मदहोशी ,
आज भी जिंदगी एक मयखाना है,,
  आज भी आंखोमे वो नमी सी है
     आज फिर आप की कमी सी है,,
तुम्हारे ही वजुद में,अक्सर मैने तराशा खुद को,
  गुजर गया वो पल,पर वो दर्द आज भी सीने मे कैद है
वो हसी 'तेरी मेरी आँखो में कही गुम है,,
    आज भी आप की कमी सी है,,,
समझना पाये आप,,और हम कह ना पाये,,
नजरोसे बाते करना,,ये तो आप का हुन्नर है,,
वही मुकाम पे जिंदगी आज भी ठहरी है,,
आज भी आप की कमीसी है,,,
चले आवो ना जाने कबतक जिंदगी है,,,,,!!!

,,


Wednesday, January 8, 2020

100 शब्दांची गोष्ट


 अरु अग प्रॉब्लेम कोणाच्या आयुष्यात नसतात? म्हणून काय जगणं सोडून द्यायच असत का? तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं पटत नाही तो तुला किंमत देत नाही मग तू तुझं आयुष्य जग तुझ्या मनासारखं आणि बाकी सगळं इग्नोर कर. निषाद अरु ला समजावत होता.आज ते कॉलेज च्या रियुनियन ला एकत्र आले होते. निषाद म्हणाला,आठवत का तुला अरु तू किती छान पेंटीग्ज करायचीस . हो ते तर मी विसरूनच गेले. मग आता पुन्हा नव्याने सुरवात कर नवनवीन रंगानी आयुष्य भरून टाक मग दुःखाचा कोणताच रंग तुला उदास नाही करणार. पुन्हा त्या जुन्या अरु ला जिंवत कर आणि नवीन वर्षांचे स्वागत तुझ्या अनोख्या रंगांनी कर.

तिचे अवकाश


 सीमा स्वहताचे आवरून जेवण उरकून अक्षय ची वाट पहात डायनींग टेबल वरच बसली होती. रोज अक्षय ला घरी यायला उशीर व्हायचा कधी तो जेवून यायचा कधी घरी जेवायचा म्हणून सीमा रिया आणि वरुण सोबत मुलां सोबत जेवून घ्यायची. अक्षय एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये कामाला होता. कामा मुळे तो परदेशी ही वारंवार जायचा.दिसायला स्मार्ट कामात हुशार त्यामुळे त्याला स्वहता बद्दल अहंकार पण जास्तच होता. सीमाही डबल ग्रॅज्युएट झाली होती. पण अक्षय च्या इगो मुळे त्याने तिला जॉब करू नाही दिला. त्याच्या प्रेमा खातर तिने घर सांभाळणे आनंदाने स्वीकारले. सुरवातीचे नवीन नवलाई चे दिवस पटकन निघून गेले पण कायम एक गोष्ट खटकायची की अक्षय तिला नेहमी स्वहता पेक्षा कमी लेखायचा पण ती ही गोष्ट सुद्धा इग्नोर करत असे. नतर तिला रिया आणि वरुण ही दोन गोड मुलं झाली त्याच्या सोबत ती खुश राहायची. अक्षय मात्र त्याच्यात असूनही नसल्या सारखा असायचा . रात्री खूप उशीर अक्षय घरी आला. सीमा कंटाळून तिथेच झोपी गेली होती. दाराच्या लैच च्या आवाजाने तिला जाग आली . तिने पटकन त्याला विचारले अक्षय जेवायला वाढू का ? काही नको मी जेवून आलो आहे  असे म्हणत तो बेडरूम मध्ये गेला पण एका शब्दाने पण त्याने तिला तू जेवली का किंवा इतका वेळ माझी वाट पहात होती का ? असे काहीही विचारले नाही . कसा विचारणार ना तो शेवटी पुरुषी अहंकार! सीमा ही त्याच्या मागे बेडरुम मध्ये गेली . अक्षय कपडे बदलून पटकन झोपला . सीमा ही शेजारी झोपली . तिचे डोळे भरून आले कारण कित्येक दिवस झाले अक्षय लवकर येवो किंवा उशिरा येवो तो तिला जवळ घेऊन साधी तिची चौकशी ही करत नव्हता त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तिला स्वहताच्या मना सारख फक्त ओरबाडून घ्यायचा. याचेच तिला वाईट वाटायचे याला कारण होती प्राजक्ता. त्याची ऑफिस मधली कलीग. गेली चार वर्षे दोघांच अफ़येर सुरू होतं.तिनेच एकदा अक्षय च्या नकळत त्यांचे चॅट  मेसेजेस पाहिले होते. पण त्यांचे अफयेर सीमा ला हे माहीत आहे याची अक्षय ला कल्पना नव्हती. पण सीमा खूप साधी आणि सोशिक अशी होती तिला वाटले हे थोडं आकर्षण असेल त्या दोघांना एकमेकांचं कारण एकत्र काम करतात त्यामुळे अक्षय कधीतरी सुधरेल त्याला मुलांची जबाबदारी समजेल असे मानून सीमा गप्प होती . तिला संसार मोडायचा नव्हता. पण अक्षय स्वहताच्या धुंदीत मस्त होता. त्याला वाटायचे सीमा काय साधारण बाई आहे प्राजक्ता बोल्ड आणि स्मार्ट !. शेवटी पुरुषांना बायको बायको सारखी आणि मैत्रीण मात्र बोल्ड आणि स्मार्ट हवी असते . असा काहीसा प्रकार होता. सकाळी सीमा लवकर उठून मुलांना तयार करून स्कुल बस पर्यंत सोडून यायची . मग अक्षय चा नाष्टा डबा तयार करायची. पण अक्षय ला तिची कदर नव्हती. नाष्टा करत असताना अक्षयचा फोन वाजला त्याला मेसेज आला होता परत लागोपाठ 2 मेसेज आले फोन त्याने बेडरूम मध्ये चार्जिंग ला लावला होता . सो त्याने सीमा ला सांगितले फोन बाहेर आण. सीमा पटकन गेली आणि त्याचा फोन बघत बघत बाहेर आली तसा अक्षय तिच्यावर ओरडला फोन काय बघतेस कोणाचे मेसेजस पाहू नयेत इतके पण मॅनरस नाहीत का तुला ? सीमा म्हणाली नाही मी न्हवते पहात काही ते सहजच तिला मध्येच तोडत अक्षय म्हणाला नॉनसेन्स पुन्हा माझा फोन पाहायचा नाहीं . सीमा ला खूप वाईट वाटले. ती गप्प बसली . तिला माहीत होते की प्राजक्ता चे मेसेज असणार म्हणून तो खवळला . अक्षय खाऊन झाल्यावर बाहेर पडला. सीमाचे डोळे भरून आले ती तशीच आसवे गाळत राहिली. तो कायम तिचा अपमान करायचा. आणि ती शांत राहून ते सहन करायची. तिला आई वडील न्हवते ती लहान असताना एका अपघातात ते गेले. मामा कडे ती लहानाची मोठी झाली . शिक्षण केले आता आपल्या मुळे मामा मामी ला अजून त्रास नको काही म्हणून ती अक्षय चे वागणे सहन करत होती. कोणाला काही बोलत नव्हती.आज वरुण चा 10 वा वाढदिवस होता अक्षय ने मोठी पार्टी ठेवली होती त्याच्या ऑफिस स्टाफ आणि वरूण च्या मित्रांना बोलावले होते. एका हॉटेल मध्ये पार्टी होती . संपूर्ण पार्टी मध्ये अक्षय प्राजक्ता सोबत च फिरत होता सीमा चे त्याला काही पडले नव्हते पण त्या कडे ही सीमा ने कानाडोळा केला . पार्टी छानच झाली वरूण रिया खूप खुश होते. रात्री सर्व घरी परतले.आज अक्षय ही खुश होता त्यामुळे किती तरी दिवसांनी त्याने सीमा ला जवळ केले आणि तुटून पडला तिच्या शरीरावर  आणि स्वहताची तृप्ती झाल्यावर शांत झोपला देखील. सीमा विचार करू लागली या घरात माझं माज्या मनासारखं काहीतरी आहे का . कुठेच माझ्या मनाला आणि मताला देखील किंमत नाही  मुलां साठी मी सगळं सहन करते पण म्हणून मला मन भावना नाहीत असे होत नाही ना पण कोणाला बोलणार हे सगळं .? सीमा या विचारातच झोपी गेली . सकाळी सगळे घरा बाहेर पडले सीमा एकटीच होती तिचा फोन वाजला तिने पाहिले तिची बेस्ट फ्रेंड नीता चा फोन होता तिने घेतला म्हणाली नीता अग किती दिवसांनी केलास फोन कशी आहेस तू ? माहेरी आली आहेस का ? नीता म्हणाली हो हो अग किती प्रश्न मी मजेत आहे मी आता तुला भेटायला येतेय घरी मग बोलू निवांत चालेल ? हो नीता ये लवकर मी वाट पाहते अस म्हणत सीमा ने फोन ठेवला . आणि घर आवरू लागली. थोडयाच वेळात नीता आली. दोघी कॉलेज च्या खास मैत्रिणी नीता माहेरी आली की सीमा ला आवर्जून भेटत असे . नीता खूप बडबडी त्यामुळे ती बोलतच होती सीमा मात्र ऐकत हसत तिचे बोलणे ऐकत होती. नीता म्हणाली बाकी काय म्हणतात आमचे भाऊजी खूप लाड करत असतील ना तुझे इतकं छान तू घर सांभाळतेस मूलांकडे बघतेस . सीमा फक्त हु म्हणाली . आणि सीमा तुमच्या लग्नाला 12 वर्ष होतील ना ग आता. हो सीमा म्हणाली .  ओहह तरी तू किती छान स्वहताला मेन्टेन ठेवले आहेस . भाऊजीचे खूप प्रेम असेल ना ग तुझ्यावर ? पण सीमा यावर गप्प बसली. तिच्या चेहर्या कडे पाहून नीता ला समजले काहीतरी घोळ आहे . नीता म्हणाली सीमा बोल काय आहे तुझ्या मनात. तू कायम अशी शांत सोशिक बनून राहतेस .सगळं ठीक आहे ना संसारात तुझ्या ? मला समजतंय तुझ्या चेहर्या कडे पाहून आणि तू जास्त बोलत ही नाहीयेस सांग मला . नीता ने इतकं विचारल्यावर सीमाला राहवले नाही ती रडू लागली नीताने तिला जवळ घेतले म्हणाली रडू नको सीमा बोल काय प्रॉब्लेम आहे. मी तुला नक्की मदत करेन. मग सीमा ने अक्षय चे वागणे त्याचे प्राजक्ता सोबत चे अफेयर सगळं नीता ला सांगितले . यावर नीता म्हणाली अग कुठल्या जमान्यात राहतेस सीमा आणि का हे सगळं सहन करतेस? अक्षय ला धडा शिकवायचा सोडून तू रडत बसतेस. काय करू शकते मी नीता ? मला माहेरचा ही आधार नाही ग  सीमा म्हणाली . हो सीमा पण म्हणून तू तुझा स्वाभिमान पण गमावून बसली आहेस का ? तू डबल ग्रॅज्युएट आहेस हे विसरलीस का . अग अक्षय ला सांग आता मुलं मोठी झाली आहेत मी घरी बसणार नाही नोकरी करनार हे ठणकावून सांग . आणि त्याच्या अफ़येर बद्दल पण बोल मग बघू कसा तुला नोकरी करू देत नाही तो . सीमा तू स्वहताच्या पायावर आधी उभी रहा. मग पुढे बघू काय करायचे . अक्षय ला त्याची चूक समजली तर ठीक नाहीतर बघू काय करता येईल पण तू जॉब शोधत रहा मी पण तुझ्या साठी प्रयत्न करते . सीमा ला तिचे म्हणणे पटले जो पर्यंत ती काही स्टँड घेत नाही तो पर्यंत अक्षय ला ही तिची किंमत कळणार नाही . ती म्हणाली हो नीता तू म्हणतेस तसेच करेन मी . येस ग्रेट सीमा आणि मी आहे कायम तुझ्या सोबत . मग जेवण करून नीता निघून गेली . सीमा ने लगेचच ऑनलाईन  लिंकडीन वर तिचे प्रोफाईल बनवले आणि आपण जॉब करायचाच असा निग्रह केला . थोड्याच दिवसात तिला एका कॉलेज कडून जॉब ऑफर आली . तिने ती स्वीकारली . आणि आजच अक्षय ला हे सांगायचे असे ठरवले . रात्री अक्षय उशिरा च आला . ती जागीच होती . ती म्हणाली अक्षय मला बोलायचे आहे तुझ्याशी . अक्षय म्हणाला,आता मी दमलो आहे उद्या बघू असे पण तुला काय बोलायचे असणार किराणा संपला किंवा काही आणायचे असेल सो झोप आता . नाही अक्षय मला महत्वाचं बोलायचे आहे ती म्हणाली . अक्षय भडकला म्हणाला,तुला समजत नाही का मी दमून आलो आहे . सीमा म्हणाली दमायला काय तू ओव्हर टाईम करून आलास का प्राजक्ता सोबत .हे ऐकताच अक्षय ने तिला जोरात थप्पड लगावली. सीमा तशी रागात म्हणाली का मी बोलले ते खोटे आहे का ? तुझे आणि प्राजक्ता चे काय चाललय मला सगळ माहीत आहे. अक्षय म्हणाला हो आहे आमचं अफेयर तुला काय करायचे ते कर आय डोन्ट माइंड तुला डिओर्स घ्यायचा तर घे मी माझ्या मुलांना सांभाळू शकतो तितका मी कमावतो ओके . सीमा म्हणाली ,हे घर कायद्याने माझं सुद्धा आहे मी इथून कुठेच बाहेर जाणार नाही आणि मुलांना मी सुध्दा सांभाळू शकते कारण उद्या पासून मी ही जॉब करणार आहे . तुझे वागणे इतके दिवस सहन केले आता नाही . आणि अक्षय तुला या घरात राहायचे तर रहा मात्र डिओर्स मी तुला अजिबात देणार नाही . आज पर्यंत मी मुलां कडे पहात त्यांच्या साठी जगले आता ही त्यांच्या सोबतच जगेन . इतकं बोलून सीमा बेडरूम मधून बाहेर आली आणि मुलांच्या रुम मध्ये गेली . अक्षय ला अनपेक्षित असा  हा धक्का होता . त्याला हे समजत न्हवते की सीमा अशी बदलली कशी ? त्याच्या सारख्या पुरूषांना हे समजत नाही की  स्त्री तशीच वेळ आली तर वाघिणीचे रूप घेऊ शकते ती शांत आहे तोपर्यंत शांत नाहीतर ती महाकाली बनते . कधी कधी परिस्थिती तीला तसे बनायला भाग पाडते . सकाळी लवकर उठून सीमा ने सगळं काम आवरले. अक्षय चा नाष्टा डबा बनवला . मुलांना तयार केले . अक्षय टेबलवर आला होता स्वहताचे आवरून नाष्टा करायला. सीमा  त्याला किचनमध्ये नाही दिसली . तो स्वहता हातानें नाष्टा घेऊन खात होता. इतक्यांत सीमा मस्त छान ड्रेस घालून केस क्लीप लाऊन मोकळे सोडून  हलकीशी गुलाबी लिपस्टिक लावून तयार होऊन मुलां सोबत बाहेर आली . अक्षय तीच्या या बदललेल्या रूपा कडे पाहतच राहिला.  मुलाना तिने सांगितले की ती संध्याकाळी पाळणा घरातून त्यांना पिकअप करेल . आणि मुलांना बस पर्यंत सोडायला गेली. घरी येऊन तिने तिचा डबा घेतला आणि अक्षय कडे न पाहताच बाहेर पडली. नीता चा कॉल आला तिला बेस्ट लक देण्यासाठी साठी . आज सीमाला तीचे अवकाश गवसले होते सो नीता ही जाम खुश होती . एका कॉलेजमध्ये सीमा लेक्चर म्हणून लागली होती . आता तिने ठरवले होते आता" मागे वळुन नाही पाहायचे फक्त पुढे जायचे". खूप समाधान आणि आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. .
  समाप्त...

 संगीता देवकर ,प्रिंट /मीडिया रायटर,,,पिंपरी,18,,

The copy right rests with the author...

      


दर्द ए दिल

दर्द ऐ दिल,,,
   
टेकडी वर मस्त थंड हवा होती,सूर्य अस्ताला निघाला होता. दूरवर नजर जाईल तिकडे सूर्याचा केशरी रंग आभाळभर पसरला होता,बरीच लोक टेकडी वर वॉक साठी आले होते कोणी ग्रुप करून गप्पा मारत बसले होते. खूप प्रसन्न असे ते संध्याकाळ चे वातावरण होते. 
मीरा आणि देवांश तिथे बराच वेळ शांत बसले होते. ते दोघे एकाच ऑफिस मध्ये काम करत होते. दोघां मध्ये मैत्री कधी झाली,ते बेस्ट फ्रेंड कधी बनले  हे त्यांनी ही कळले नव्हते.आणि आता ते दोघ एका हळुवार,नाजूक नात्यात गुंतत चालले होते. देवांश पेक्षा  मीरा जास्तच इमोशनली त्याच्यात गुंतत चालली होती.
ते त्याला माहित होत आणि जाणवत सुद्धा होत पण एकमेकांना सगळ्या गोष्टी शेयर करणारे ,मनातलं सगळं बोलणारे या विषयावर मात्र काहीच बोलत नव्हते.एकमेकांची काळजी,आपलेपणा,जिव्हाळा हे सगळं त्यांना वाटत होतं,तसे ते वागत ही होते. देव च्या मनात खुपदा आले होते ,हो देवांश ला सगळे ऑफिस मध्ये देवच म्हणायचे. तो अगदी  वेडा झाला होता मीरा च्या प्रेमात पण तिला सांगू शकत नव्हता. बीकॉज शी वॉज मॅरिड अँड हँव अ चाईल्ड. पण आज मीरा ने त्याला ऑफिस मध्ये सांगितले की ती हा जॉब सोडून जाणार आहे सो तो तिला घेऊन टेकडीवर आला होता.त्याला तिच्या शी बोलायचे होते. मीरा दूरवर शून्यात नजर लावून बसली होती. तिचे हे मौन त्याला असहाय होत होते. तो म्हणाला,मीरा बोल काहीतरी ,असं अचानक का तू जॉब सोडून चाललीस? काही प्रॉब्लेम झाला आहे का? सांग ना.
देव प्रॉब्लेम हाच आहे की आय एम स्टारटेड लाइकिंग यू अँन्ड आय कान्ट फरगेट यू देव.
मीरा यात प्रॉब्लेम काय आहे मग? मी सुद्धा तुला लाईक करतोच ना ? आणि हे आपल्या दोघांना पण माहित आहे फक्त यावर आपण काही बोललो नाही इतकंच.
देव,मी तुझ्यात नको इतकी गुंतत चाललीय आणि हे ठीक नाही रे. आपण खूप पुढे वाहवत जाण्या आधी इथेच थांबलेले बरे  आहे. देव ने तिचा हात आपल्या हातात घेतला म्हणाला, मीरा इतकं सोपं नाहीय ग,तुझ्या पासून दूर राहणं,मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर.
हेच तर नको आहे मला देव , तू कितीही माझ्यात गुंतलास तरी तू हे कसे काय विसरू शकतोस कि आय एम माँरिड वूमन ! मीरा मला माहित आहे सगळं ,पण तुझा स्वभाव ,तुझा आपलेपणा,माझी काळजी घेणं,हे कुठेतरी सुखावत गेल मला. तू खूप चांगली आहेस. पण तुझ्या नवऱ्याला मात्र तुझी कदर नाही हेच दुर्देव ! 
पण म्हणून मी तुझा गैरफायदा घेतोय असं काहीही मनात आणू नकोस.देव मी ओळखते तुला,तू कधीच कोणाकडे कसली अपेक्षा करत नाहीस सगळ्यांच्या  मदतीला धावून जातोस. सगळयांना आपलं म्हणतोस,तू कधीच गैर वागू शकणार नाहीस. आय ट्रस्ट यू. 
मग तरीही का जातेस माझ्या पासून दूर? निदान माझा तरी विचार कर ना प्लिज. 
देव मला मान्य आहे ,मी हि माझ्या नकळत तुज्यात गुंतत गेले ,माझ्या नवऱ्याच्या स्वभावा ला कंटाळून ,त्याच्या ड्रिंक्स पार्ट्या,त्याची अरेरावी,संशयी स्वभाव या सगळ्यात माझी होणारी अवहेलना,माझी तगमग यातून बाहेर पडण्या साठी मी तुझ्या मैत्रिची सावली शोधली,माझं मन तुझ्या जवळ हलकं केलं,नेहमी अश्रू ढाळायला तुझाच तर खांदा होता मला. पण या सगळ्यात आपण काही चुकीचे वागतोय हे जाणवलंच नाही रे. तुझं प्रेम,तुझा सहवास माझ्या मनाला शांत करायचा. मी स्वार्थी बनले होते देव. नवऱ्या कडून न मिळणारी आपले पणाची भूक,संवादाची भूक तुझ्या कडून पूर्ण  करून घेत राहिले. पण मी हे कसे काय विसरले कि माझ्या मुळे तुझे आयुष्य भरकटू शकते. तू हुशार आणि स्मार्ट आहेस. कोणीही तुझ्या वयाची मुलगी तुझ्या प्रेमात  पडू शकते देव,नॉट मि,,!! इतकं बोलून मीरा रडू लागली. देव चे ही डोळे भरून आलेले. त्याने तिच्या हातावर थोपटले,तो म्हणाला मीरा मला माहित आहे तू कोणत्या परिस्थितीत जगतेस,तुझा नवरा तुला कशी वागणूक देतो. आय नो एव्हरी थिंग . अशा परिस्थितीत कोणीही मायेचा,जिव्हाळ्याचा ओलावा एखादया दुसऱ्या व्यक्ती मध्ये शोधनारच हा निसर्ग नियम आहे यात तुझी काही ही चूक नाही ग. तू स्वहताला दोष देऊ नकोस. आणि मी कसलीही अपेक्षा करत नाहीये तुझ्या कडून,मी तितका स्वार्थी नाही. मीरा परत विचार कर,हा जॉब नको सोडू,दुसरा जॉब तुला कधी मिळणार? तो पर्यंत त्या नालायक माणसाचा त्रास तू सहन करत घरात बसणार आहेस का ? नाही देव,मी पूर्ण विचार केला आहे,मिळेल मला दुसरा जॉब. मीरा ला हे बोलताना देव बद्दल खूप वाईट वाटत होत,पण त्याच्या भविष्य साठी तिला त्याच्या मार्गातून बाजूला होणे गरजेचे होते. देव अतिशय सरळ,शांत समंजस असा 28 वर्षाचा तरुण तर मीरा एका मुलाची आई. आणि हे नातं कोणालाच  पचनी पडले नसते. सगळी कडे दोघांची बदनामी झाली असती. म्हणूनच मीरा ने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. देव ने त्याच्या बॅग मधून कॅडबरी काढली,दोघांना हि खूप आवडायची कॅडबरी ,एकमेकांना सोडून कधी हि एकट्याने त्यांनी कॅडबरी खाल्ली नव्हती. तिच्या समोर त्याने चॉकलेट धरले ,म्हणाला,माज्या आयुष्यातली तू चॉकलेट आहेस,जिने आयुष्यात खूप गोडवा आणला. तसे ती हसून म्हणाली,मॅड इंजिनियर होण्या पेक्षा रायटर का नाही झालास? तसा देव म्हणाला,तसाच विचार आहे,हा जॉब सोडून तुझ्यावर कविता करत राहावी कारण तुज्याबद्दल किती ही लिहिले तरी शब्द कमीच पडतील मीरा. कॅडबरी अर्धी तिला देत पुन्हा देव म्हणाला,ही माझी शेवटची कॅडबरी असेल,तुझ्या शिवाय ती खाण मला कधीच जमनार नाही. तसे मीरा ने त्याचा हात आपल्या हातात घेतला म्हणाली,देव काही लोक आपल्या आयुष्यात काही क्षणासाठी येतात,अगदी कमी वेळात खूप काही देऊन जातात. तुम्हाला समजून घेतात,कधी हसवतात तर कधी रडवतात देखील. पण त्यांचा थोड्याशा सहवासाने संपूर्ण आयुष्य जगल्याचा आनंद देऊन जातात,मी काय आणि तू काय असेच आहोत रे,वळवाच्या पावसा सारखं एक घटका येणार धो धो कोसळणार आणि दुसऱ्या क्षणात गायब. पण त्याच्या मुळे मनाला मिळणार गारवा कुठेतरी आतपर्यंत झिरपत राहतो कायमचाच! देव तू ही कुठेतरी मनाच्या खूप आत पर्यंत पोहचला आहेस रे,तिथे तू कायम असशील,जेव्हा तुझी मला आठवण येईल ना तेव्हा तो तुझ्या प्रेमाचा गारवा मला पुन्हा जगण्याची नवी उमेद देईल.
पण मीरा आपण मित्र म्हणून तरी राहू शकतो ना एकत्र? 
नाही देव खूप उशीर होण्या पेक्षा आधीच मागे फिरलेले कधी ही चांगलेच. अधून मधून मी फोन करेन तुला. पण तू ही जास्त कॉल मेसेजेस करायचे नाहीत.देव मुळातच खूप सेंटी होता,आणि मीरा चे हे बोलणे ऐकून तो आतून तुटत होता,तो भावूक होऊन म्हणाला,इट्स नॉट फेयर मीरा,आता तू स्वार्थी बनते आहेस,थोडा माझा विचार कर, अँटलिस्ट बोलणं तरी राहूदे ना आपल्यात! 
नको देव या मोहात मी अडकुन पडले तर बाहेर पडणं अवघड जाईल. 
मीरा मग काय वाईट आहे त्यात,मी कायम साथ देईन तुला. मी लोकांची पर्वा कधीच नाही करत अँन्ड अवर ऐज डिफ्रन्स वॉज नो मॅटर इन अवर रिलेशन.आय जस्ट लव्ह यू मीरा .
देव मला हे पटत नाही,अँन्ड इफ आय डन अ मिसटेक  देन प्लिज फरगिव मि. म्हणत तिने आपले हात त्याच्या समोर जोडले. तसा पटकन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत देव म्हणाला आर यू मॅड मीरा,हे काय करतेस? तुझी काय चूक यात? चूक असेल तर माझी आहे ,आय से सॉरी. 
देव यात चूक कोणाची असेल तर ती माझ्या परिस्थितीची आहे. मला सगळं समजत होत,तरी मी तुज्यात गुंतत चालले होते,खूप एकटी पडले होते सो मला मानसिक आधार हवा होता. एक सच्चा जवळचा  मित्र हवा होता. तू आमच्या ऑफिस मध्ये जॉईन झालास अन आपली मैत्री झाली पण आता मागे फिरण्यातच आपलं भलं आहे. 
मग मीरा आपल्यात नेमकं नातं तरी कोणतं आहे सांग ना? 
देव काही नाती अशी असतात ना त्यांना कुठल्याच लेबलची गरज नसते,आपण ती नाती फक्त अनुभवायची असतात मनापासून. हृदयात खोलवर जपून ठेवायची असतात,त्यांना एक विशिष्ठ नाव देऊन  एका चौकटीत ती बंदिस्त नाही करता येत. खरंच आपल्यात पण असच नातं आहे खूप सुंदर ना प्रेम ना मैत्री पण या दोन्ही मधला मध्य बिंदू म्हणता येईल असं. पण जे आहे  ते छान आहे,सुंदर आहे आणि ते तसच राहू दे,त्याला नावाची गरजच नाही. आता टेकडी वर बरीच गर्दी कमी झाली होती,संध्याकाळ संपून सूर्य पूर्ण मावळला होता अंधार पडू लागला होता,तशी मीरा म्हणाली,देव आता घरी जाऊयात आपण,उशीर होईल. तो जड अंतकरणाने उठला,पुन्हा एकदा तिचा हात हातात घेत म्हणाला,मीरा आय रियली मिस यू,डोन्ट डु धिस,,! त्याच्या डोळ्यात पाणी जमू लागले होते,कोणत्या ही क्षणी त्याचे अश्रू ओघळले असते इतका तो सेंटी झाला होता. 
ती म्हणाली,इतक हळवं बनून राहू नकोस देव हे जग खूप वेगळं आहे,प्रॅक्टिकल आहे. मी कायम तुझी मैत्रीण असणार आहे. तिच्या ही डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली होती,तिला ही त्याला विसरणं ,त्याच्या पासून दूर राहणं सहन होणार नव्हत. पण.... हे आयुष्यातले "पण च" माणसाला त्याच्या पुढे हताश ,हतबल करत असतात. देव ने तिच्या गाला वरचे अश्रू अलगद पुसले आणि पटकन तिला मिठी मारली,त्याला वाटलं हा काळ,हा क्षण इथेच थांबावा कायमचाच. हा अनुभव पुन्हा मिळणार नाही. ती ही मूक पणे त्याच्या मिठीत अश्रू ढाळत राहिली. काहीच न बोलता दोघ टेकडी उतरून खाली आली. देव म्हणाला,मीरा जिथं असशील तिथे आनंदी रहा,जास्त टेन्शन नको घेऊ,बी अ ब्रेव वूमन ,,कारण सगळी कडेच देव नसणार ग,त्या मुळे सांभाळून रहा. ती काहीच बोलली नाही,दोघांनी बाय म्हणत शेकहॅन्ड केला,ती म्हणाली देव स्वहताची काळजी घे,आणि तिच्या स्कुटी वरून ती निघून गेली. तिच्या जाणाऱ्या रस्त्या कडे पहात बराच वेळ देव तिथे थांबला,ती नजरे आड होई पर्यंत. मीरा घरी आली,सरळ बेडरूम मध्ये जाऊन ती बेड वर पडून खूप ओक्साबोक्सी रडली,देव चा चेहरा तिच्या नजरे समोरून जात नहवता ,तिला त्याचे अश्रू आठवत होते खूप रडली ती आणि रडत रडत म्हणू लागली,देव आय रियली लव्ह यू,आय मिस यू,स्टूपिड आय कान्ट लिव्ह विदाऊट यू . तिचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्ह ते आणि दूर वरून कुठेतरी गाण्याचे बोल मीरा ला ऐकू येत होत,, " देख लेना तेरे होठोपे हमेशा,मैं हसता हीं रहुंगा देख लेना,  " देख लेना,भिगी जो 'तेरी आंखे,आंखोसे मैं बहुंगा ,देख लेना  !!",,,
    
----------- समाप्त --------
कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या आधीन आहेत,
© sangieta devkar 2017.
    

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...