खव्ययेगिरी...,,
- Get link
- X
- Other Apps
खव्य्येगीरी,
हॉटेल"नुसते नाव घेतले तरी तोंड़ाला पाणी येते ना!!मग लहान मूल असो ,गृहिणी असो हॉटेल म्हन्टल की भारी खुश होतात,हॉटेल चे चविष्ठ जेवण,तिथले इंटीरियर प्रत्येकाला मोहात पाडत.आपल्या भारतीय खाद्य संस्कृति मध्ये विविध प्रकार चे पदार्थ पाहावयास मिळतात,रूचकर ,चविष्ठ पदार्थ ही आपली खासियत आहे.ती पुरातन काळा पासून सुरुच आहे.तरी देखील हॉटेल ची सवय किवा हॉटेल चा मोह आपल्याला सोडवत नाही.मध्यमवर्गीय कुटुंबा मध्ये तर वीक एन्ड ला जेवायला बाहेर जायचे हा पायंडाच पडला आहे.मुलांना थोड़ा खान्यात चेंज तर घरच्या गृहिणी ला एक दिवस आराम!! रस्त्या वरच्या वडा पाव पासून ते फाइव स्टार हॉटेल पर्यन्त चा हा प्रवास भारतीय संस्कृतीत उल्लेखनीय च म्हणावा लागेल.ज्याला जे परवडते,मग तो वडा पाव असो,ढाबया वरचे जेवण असो,किवा फाइव स्टार मधले जेवण असो,प्रत्येक जण हॉटेल ची चव चाखतच असतो.फार पूर्वी हॉटेलची सुरवात ही बाहेरगावी जाणाऱ्या साठी खान्याची सोय व्हावी या उद्देशाने झाली.कामा निमित्ताने बाहेरगावी जाणारे लोक,त्यांची खाणयाची ,राहण्याची सोय म्हणून हॉटेल कड़े पाहिले जायचे.त्यामुळे प्रत्येक शहरात हॉटेल्स ची साखळी च तयार झाली.परगावी एकटे राहणाऱ्या विद्यार्थासाठी हॉटेल किवा मेस म्हणजे पोट भरणया ची सोय असायची.आज कोणता ही समारंभ असो तो हॉटेल मध्ये साजरा करण्या ची जणू चढाओढ दिसून येते,हॉटेल मध्ये जाणे,ही आज प्रत्येकाची प्रतिष्ठे ची बाब बनली आहे,कामच्या मीटिंग असोत,वाढदिवस असो,लग्नाचा वाढदिवस असो,तो हॉटेल मध्येच साजरा करण्याची प्रथा सगळी कडेच दिसून येते,पूर्वी सारखे नातेवाईकाना घरी जेवायला बोलावून 15/ 20 लोकांचा स्वयंपाक करने,त्यांना अगत्याने खावु घालने,ही पद्धत हळू हळू हॉटेलिग मुळे बंद होत चालली आहे.सध्या विभक्त कुटुंब पद्वति मुळे कोणाला कामाचा त्रास नको आहे,,त्यात नोकरी करणारे जोड़पे असेल तर घरी स्वयंपाक करण्या पेक्षा बाहेर खान्याला प्राधान्य दिले जाते.त्यामुळे प्रत्येकाची गरज,आवड़,लक्षात घेता हॉटेल ची चलती कायमच राहनार आहे,
आज हॉटेल व्यवसायाचा विस्तार पाहता,एक चांगला व्यवसाय म्हणून या क्षेत्रा कड़े पाहिले जाते,यातूनच हॉटेल मैनेजमेंट या अभ्यास क्रमाची निर्मिति झाली.आज बरेच जण हॉटेल व्यवसायात उतरत आहेत,मुलां मध्ये शेफ,हॉटेल मैनेजमेंट,याची आवड़ दिसून येत आहे आणि करियर साठी ही हा एक उत्तम पर्याय आहे,चांगल्या दर्जाची सेवा,रूचकर जेवण,आर्कषक सजावज या गुणा मुळे या हॉटेल व्यवसायास प्रचंड मागणी आहे.या व्यवसायास कधी ही मरण नाही,फक्त उत्तम गुणवत्ता,उत्कृष्ट सेवा,यावर या व्यवसायाचे भविष्य ठरते.मित्रां सोबत पार्टी असो,किवा गेट टूगेदर असो होटेलिंग तो बनता ही बनता हैं,,,एकत्र हसत खेळत जेवनाचा आस्वाद घ्यायचा तर हॉटेल ला पर्याय नाही,आणि हो बायको माहेरी गेली तरी तुमच्या पोटा ची काळजी घ्यायला हॉटेल आहेतच,अधुन मधून थोडा बदल हवा ,,तेच तेच घरचे खावून कंटाळा आला असेल,,तर गो गेट रेडी फॉर हॉटेल,,,,,,!
___ संगीता देवकर.....प्रिंट/मिडिया रायटर,,पिम्परी पुणे18
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment