Wednesday, July 28, 2021

हैं तुझे भी इजाजत (भाग 2)

थोड्या वेळात हिमांशु ने आर्वी ला आपल्या केबिन मध्ये बोलावले. मे आय कम इन सर ? यस प्लीज एंड हॅव अ सीट  तो म्हणाला. ती त्याच्या समोर बसली तो या वीक चे मॅगझिन पहात होता त्याला बघुन आर्वी ची धडधड वाढत होती अंगावर रोमांच येत होते ओ गॉड किती चार्मिंग आणि स्मार्ट दिसतो हा त्याच्या सगळ्याच हालचाली किती मस्त आहेत मला वेड लागेल खरच आर्वी मनातच हा विचार करत होती. मिस आर्वी .. पन तिचे लक्ष नव्हते तो पुन्हा म्हणाला, मिस आर्वी ... हा सर सॉरी सर बोला ना. हा तुमचा ब्लॉग आता खूपच लोकप्रिय होत चालला आहे . खास या ब्लॉग साठी लेडीज हे मॅगझिन आवर्जून खरेदी करतात. दयाटस ऑल क्रेडिट गोज टू यू मिस आर्वी. थैंक यू सर. आज पासून या ब्लॉग मध्ये एक अँडिशन कर हा ब्लॉग वाचून तुम्हाला काही डॉउटस असतिल काही प्रश्न असतील तर यू आर मोस्ट वेलकम . असे अँड कर आणि येणारया सगळ्या प्रश्नाची उत्तरे तूच द्यायचीस. ओके सर मी करते. अँड वन्स अगेन थैंक्यू सर म्हणत आर्वी त्याच्या केबिन बाहेर आली. तिला खुप छान वाटत होते. तिने सौम्या ला हे मेसेज करून सांगितले कारण सौम्या ला माहित होते आर्वी किती वेडी आहे हिमांशु साठी. परत संध्याकाळी ऑफिस सुटलयावर पटापट आर्वी ने टेबल आवरले आणि हिमांशु सोबतच लिफ्ट मधून गेली. हे बरेच दिवस हिमांशु पहात होता त्याला समजले  होते की आर्वी खास त्याच्या साठी हे करते. संयु आर्वी सौम्या रिया फोन वर बोलायच्या,चाट करायच्या चांगली मैत्री झाली त्यांची. या वीकेंड ला हॉटेल ला डिनर ला भेटायचे ठरले. वेळेत आल्या सगळ्या . आर्वी म्हणाली हॅव अ ड्रिंक गर्ल्स ? या रेड वाइन  रिया बोलली . बकीच्याना पन चालेल ना . हो  मागव संयु आणि सौम्या म्हणालया. सौम्या -- हैल्लो गर्ल्स आपल्या बद्दल अजुन कोणाला काहीच माहित नाही सो प्लीज टोल्ड. स्टार्ट विथ मि,,म्हणत सौम्या सांगू लागली,मी एका लहाश्या गावातुन इथे आले कारण माझे स्वप्न होते फैशन डिझायनर बनण्याचे  आणि ते मी बनले आता एका कंपनीत आहे जूनियर डिझायनर म्हणून,अँड आय हॅव अ बॉयफ्रेंड आल्सो हिज नेम वॉज प्रतीक. आता संयु बोलू लागली,मी एका प्राइवेट कंपनीत जॉब करते .आय एम अ डिवोर्सी अँड हॅव अ डॉटर अ सिंगल मदर. वन ऑफ माय फ्रेंड चेतन ही वॉज़ फॉल इन लव विथ मि बट आय एम नॉट कम्फर्टेबल सो डोन्ट डिसायडेड यट. रिया म्हणाली,आय एम फ्रॉम दिल्ली फ्रॉम अ पंजाबी फैमिली . चांगल्या सुखवस्तु घरात राहत होते पन घरी माझ लग्न ठरवत होते पन मला लग्ना मध्ये इंटरेस्ट नाही म्हणून घरातून निघुन आले आता मि जिम इंस्ट्रक्टर म्हणून काम करते. आर्वी म्हणाली मी कंटेट रायटर म्हणून काम करते मी प्रॉपर पुण्याचीच आहे. ज्या मँगझिन साठी काम करते .मला खायला खुप आवडते आणि माझे लाइफ मला हवे तसे जगते माय लाईफ माय रूल . माझा कोणी बॉयफ्रेंड नाही पन माझा बॉस मला खुप खुप आवडतो ,मी त्याला  आवडते की नाही नो आइडिया. वाइन आले होते त्यांनी चियर्स करत ड्रिंक घ्यायला सुरवात केली. खुप गप्पा मारत त्यांनी जेवन केले . असच भेटायचे आणि मस्त आयुष्य जगायचे असे त्यांनी ठरवले. जेवन झाले सगळ्या जनी एकत्र आर्वी च्यां कार मधून आले होते आता आर्वी प्रत्येकिला डॉप करत जाणार होती . खुप मस्त छान मुड मध्ये होत्या त्या. त्यात कार मध्ये रेडियो ला गाने लागले होते. जो दिल से लगेउसे केह दो हाय हाय हायजो दिल न लगेउसे केह दो बाय बाय बाय                                      
आने दो आने दोदिल में आ जाने दोकह दो मुस्कुराहट को।      
जाने दे जाने दोदिल से चले जाने दोकह दो घबराहट कोBye Bye...लव यू ज़िन्दगीलव यू ज़िन्दगीलव यू ज़िंदगीलव मी ज़िंदगी  जणु त्याच्या वरच हे गान लिहिले होते  मग सगळ्याच जणी मोठ्या आवाजात लव यू जिंदगी असे म्हणू लागल्या . आप आपल्या घरी पोहचल्या. रिया सकाळी 10 वाजताच जिम ला यायची दुपारी लंच ला घरी येऊन परत 5 ते 9 जिम ला. असे तिचे काम होते. गुड मॉर्निंग रिया जिम मध्ये येता येता मयंक म्हणाला . व्हेरी गुड मॉर्निंग मयंक . मयंक हा जिम चा ओनर तो ही दिवस भर असायचा जिम मध्ये आणि रिया त्याला खूप आवडायची पण रिया त्याच्या कडे लक्ष देत नसायची. अगदी वेल मेंटेन मॉडर्न अशी ती जिम होती. मयंक च्या हाताखाली एक ऑफिस बॉय आणि अजून 2 मेल ट्रेनर सुद्धा होते . हॅव अ कॉफी रिया मयंक ने विचारले . ओके म्हणत रिया त्याच्या केबिन मध्ये आली. त्याने बॉय ला कॉफी बनवायला सांगितले. सो रिया हॉऊ इज युवर वर्क गो ऑन.. मच बेटर. लेडीज आर सो सँटिसफाइड विथ देयर वर्कआऊट. दयाट्स गुड रिया . मयंक तिच्या कडे एकटक पहात होता . रिया यु आर लूकिंग सो प्रिटि. थँक्स मयंक. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला रिया आय वॉन्ट टू से समथिग ,मिट मी आऊट डोअर वि आर गोइंग फॉर डीनर. मयंक सांगेन मी तुला नंतर ओके ती म्हणाली  कॉफी आली होती. एक एक करून जिम चे मेम्बर येऊ लागले होते. कॉफी संपवून रिया त्याच्या केबिनच्या बाहेर आली. एक्सक्युज मी मॅम जिम चे ऑफिस कुठे आहे एक सुंदर मुलगी रिया ला विचारत होती. रिया ने तिला ऑफिस दाखवले. न्यू ऍडमिशन होते तिचे. ती सर्व प्रोसेस करून आली . हॅलो मॅम आय एम रसिका आज पासून जिम जॉईन करतेय. ओके रसिका यु आर वेलकम रिया म्हणाली आणि तिला सुरवातीला वॉर्म अप करायला शिकवू लागली. रसिका छान होती तिला एक्सरसाईज शिकवताना तिला टच करताना रिया ला वेगळेच फिलिंग येत होते . पुनः पुन्हा रिया रसिकाला स्पर्श करत होती तिच्या जवळ जाऊन तिचे श्वास अनुभवत होती. तिच्या  शरीराचा चा गंध आपल्या श्वासात भरून घेत होती. तिला रसिका खूप आवडली. हो कारण रिया वॉज अ लेस्बियन . आणि ही गोष्ट रियाला ही माहीत होती म्हणूनच घरी  तिचे लग्न जमवत होते तेव्हा ती पळून आली . तिला मुलां मध्ये इंटरेस्ट नवहता म्हणूनच मयंक बद्दल तिला तशी बॉयफ्रेंड वाली फिलिंग येत नवहती. 
क्रमश ......कसा वाटला हा भाग प्लिज कमेंट...


Tuesday, July 27, 2021

हैं तुझे भी इजाजत (भाग 1)

We all have our own sorrows,but it doesn't mean we just cry over them and forget to enjoy life ..!!" .......by writer Sudeep Nagarkar... (You are trending in my dreams )
     अँमनोरा मॉल फूल सजवला होता लाईट् च्या माळा निओंन् बल्ब यांनी चमकत होता. आज 31 डीसेंबर होते आणि त्यासाठी न्यू इयर चे सेलिब्रेशन खास रेड एफ एम् तर्फे होते म्युजिक शो डी जे पार्टी,डिनर,ड्रिंक सगळ होतं फूल माहौल रंगीन झाला होता. ज्याना कार्यक्रमाचे पास मिळाले होते त्यानाच या प्रोग्राम ला एंट्री होती .बाकि मॉल फिरायला आलेले लोक नुसत कानावर पडनारे म्युझिक आणि डि जे चा ताल यावर समाधान मानुन् जात होते . आतला माहौल खरच न्यू इयर ला वेलकम करायला चार चाँद लावत होता. जो तो ग्रुप नी फ़्रेंड सोबत आला होता कोणी डी जे च्या तालावर नाचत होते तर कोणी शिट्टी मारून गान्याला दाद देत होतं. कोणाच्या हातात स्नैक ,कोणाच्या हातात ड्रिंक होतं. जो तो आपल्या मस्तीत ,नादात तल्लीन झाला होता. रिया ऐकटी हातात वाइन घेवून बसली होती. आणि शो एन्जॉय करत होती. तिच्या बाजूला संयुक्ता तिच्या मैत्रिणी आणि तिची 11 वर्षाची मुलगी होती.संयुक्ता पन ड्रिंक करायची पन आता मुलगी होती सोबत म्हणून आज तिने ड्रिंक नाही घेतली.रिया एकदम बोल्ड दिसत होती उंच गोरी जीन्स आणि टी शर्ट घातलेली टॉम बॉय सारखी संयु ची मुलगी राहून राहून रिया कडेच पहात होती. तीला रिया बद्दल उत्सुकता लागुन् राहिली होती . तिचे रिया कड़े पाहणे रिया च्या लक्षात आले तेव्हा रिया ने तीला स्माइल दिली आणि हैलो म्हणाली. तसे तिने ही हाय केले. मग सयुक्ता बोलली हाय शी इज माय डॉटर फर्स्ट टाईम शी केम फॉर द इवेंट सो क्वाइट एक्सायटेड . या ओके माय सेल्फ रिया अँड आय एम् सयूंक्ता. रिया म्हणाली हँव ड्रिंक? नो थंक्स. संयु म्हणाली. आता 12 वाजायला 5 मिनिट कमी होते तसे सर्व जन स्टेज जवळ आले सगळ्यांनी एकत्र ड्रिंक्स हातात धरुन चीयर करत न्यू इयर चे वेलकम करायचे असे सांगितले होते . त्यामुळे सर्वजन पुढे आले बरोबर 12 च्या ठोक्याला सगळे जन हॅपी न्यू इयर म्हणत चियर केले. रिया ला ड्रिंक जास्त झाली होती ती एका मुलीं ला मागे धड़कली. सो सॉरी म्हणत तिने मागे असणाऱ्यां मुलींची माफी मागितली ती आर्वी होती या ईट्स ओके बी केयर फुल. हे आर्वी व्हाट हैपन सौम्या ने विचारले. नथिंग म्हणत त्या दोघी त्यांच्या जागेवर आल्या परत ड्रिंक घेतले त्यांनी. मग जेवायला  दूसरी कड़े टेबल लावले होते तिथे गेल्या. तिथे रिया सयुक्ता आर्वी आणि सौम्या एकत्र बसल्या होत्या. पुन्हा रिया ला पाहून आर्वी म्हणाली ,हेल्लो हॉउ यु फील नॉउ? मच बेटर थंक्स . फ्रेंड्स आर्वी ने हात पुढे केला. या फ़्रेंडस म्हणत रिया ने शेकहैंड केला मग रिया ने संयु ला ही शेकहैंड केला तिची आर्वी सोबत ओळख करून दिली . चोघी एकमेकिंच्या फ़्रेंड बनलया. गप्पा मारत जेवण करत होत्या. आर्वी म्हणाली आय एम् अ कंटेंट रायटर इन अ वुमन्स मॅगझिन. सौम्या म्हणाली आय एम् फैशन डिझायनर,संयु बोलली आय एम् डूइंग अ जॉब इन प्राइवेट कंपनी. अँड आय एम् जिम इंस्ट्रक्टर रिया म्हणाली. त्यांनी आपले नम्बर शेयर केले. जेवन झाले मग सगळ्या निरोप घेवून घरी निघाल्या . वीकेंड ला पुन्हा भेटु असे ठरले. आर्वी आणि सौम्या मैत्रीणि होत्या सो त्या एकत्रच गेल्या. संयु आणि रिया कैब ने गेल्या .  दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफ कोर्स मंडे होता. आर्वी ऑफीस ला आली तिची स्कूटी पार्क करत पटापट लिफ्ट कड़े आली. पार्किंगमध्ये गाड़ी लावतानाच तिने हिमांशु ची कार पाहिली होती . हिमांशु तिचा बॉस वुमेन्स वर्ल्ड मॅगझिन चा सर्वेसर्वा ,अ वेरी डैशिंग चार्मिंग ,सिजलिंग यंग बॉय.. आर्वी ला खुप आवड़ायचा ,प्रेमात होती त्याच्या. त्याच्या सोबत लिफ्ट मध्ये जायला मिळावे म्हणून बरोबर हिमांशु च्या वेळे ला ती ही ऑफीस ला यायची. पन आर्वी थोड़ी फैट होती तीला खाणयावर कंट्रोल ठेवता येत नव्हता. पन दिसायला छान गुड़ी गुड़ी चँबी गर्ल. थोड़े वेट सोडले तर नक्की सुंदर होती. त्यामुळे तिला वाटायचे की हा हैंडसम हंक हिमांशु तीला भाव का देईल . बट ही मेंटेन हिज स्टैंडर्ड. ती पळतच लिफ्ट पाशी आली. नुकतीच लिफ्ट आली होती तीला पाहून हिमांशु ने लिफ्ट अडवली होती. थैंक यु सर, चील इतकी घाई का आहे त्याने विचारले. सर लेट नको व्हायला म्हणून पळत आले. ओह्ह तो इतकेच बोलला. ती त्यालाच पहात होती . खुप हैंडसम दिसत होता तो आणि त्याने लावलेला परफ्यूम तिला भयानक आवड़ायचा ती मुद्दाम त्याच्या जवळ च उभी राहायची जेणे करून तो सुवास ती मनभरून घ्यायची. रोज हेच ती करायची वेड़ी झाली होती हिमांशु साठी. ऑफीस आले तसे दोघे ही लिफ्ट मधून बाहेर आले . आर्वी तिच्या टेबल पाशी गेली.
क्रमश  कथा कशी वाटली नक्की कमेंट करा..stay connected..!!!   ©® sangieta devkar 2017


Tuesday, July 20, 2021

माणसातला देव्

पुण्यात कोरोना चा कहर माजला होता. नोकरी चे ही काही खरे नव्हते. वर्क फ्रॉम होम सुरु होते . पगार ही पुर्ण हातात येत नव्हता. दिनेश ने बायको आणि 2 मुलां सह गावी कर्नाटक ला जाण्याचा निर्णय घेतला. पावसाचे दिवस सुरु होते. लागेल तेवढे सामान  सोबत घेऊन कार घेवून निघाला. दीपाली पुढे आणि मुले मागच्या सिटवर बसली होती. पाऊस थांबायचा नाव घेत नव्हता. रात्री चा त्यांचा प्रवास सुरु होता. पुणे कोल्हापुर हाय वे वर धुंवाधार पाऊस चालू होता. हळू हळू कार ड्राइव्ह करत दिनेश चालला होता.याच हाय वे वर कोरोना नामक सैतान दबा धरुन बसला असेल हे त्याच्या गावी ही नव्हते. जेमतेम सातारा क्रॉस केले आणि दीपाली ला अचानक थंडी वाजुन अंगात ताप भरला आणि तिला उलटया सुरु झाल्या. तिला श्वास घ्यायला ही त्रास होऊ लागला. मग मुले पुढच्या सीट वर बसली आणि दीपाली मागे सीट वर झोपली.दिनेश ने एक सरकारी हॉस्पिटल बघुन गाड़ी तिथे नेली. दीपाली ला डॉक्टरानी चेक केले खूप शिकस्तीचे प्रयत्न त्यांनी केले पण शेवटी  त्याच्या हातात तिचं डेथ सर्टिफिकेट दिलं ज्यावर लिहलं होत sudden death due to Corona virus.  दिनेश ला काहीच सुचत नवहते तो बधिर झाला होता. दोन लहान मूल आणि मृत अवस्थेतील पत्नी यांना सोबत त्याचा प्रवास गावाकडे सुरू झाला. आता त्याने कोल्हापूर पार केले होते कर्नाटक हद्दीत तो पोहचत होताच तसे त्याने आपल्या घरी कॉल लावून दीपाली बद्दल सांगितले पण गावात बाहेरून आलेल्यानं परवानगी नाही तू तसाच माघारी जा अस दिनेश ला सांगण्यात आले. निराश हताश मनाने आणि जड अंतकरणा ने तो माघारी निघाला . आपल्या बायको चा अंत्यविधी कुठे आणि कसा करू हा विचार डोक्यात होता. तितक्यात समोर कोल्हापूर गावाची कमान त्याला दिसली . दीपाली आई अंबाबाई ची निस्सीम भक्त होती आई तूच आता मार्ग दाखव म्हणत दिनेश कोल्हापूर च्या कमानी तुन आत आला. जवळच लक्ष्मी पुरी पोलीस स्टेशन त्याला दिसले . पोलिसांनी त्याची अवस्था बघितली आणि त्याला मुलांना चहा बिस्किटे खाऊ घातली. दीपाली चा अंत्यविधी ही पार पाडला. दिनेश  त्या पोलिसांना पुढे चक्क नतमस्तक झाला. साहेब खूप ऐकले होते कोल्हापूर आणि इथल्या माणसां बद्दल आज त्याची प्रचिती आली. माणसाने जन्म कुठे ही घ्यावा पण मरण मात्र कोल्हापुरात यावं . हे अगदी खरे आहे. तुमच्या रुपात जणू देवच माझ्या मदतीला आला..पोलीसांचा निरोप घेताना दिनेश चे डोळे कृतज्ञेन भरून आले.

(कोल्हापूर कर्नाटक सीमेवर दि १०.०७.२०२१ रोजी घडलेल्या एका सत्य घटनावर आधारित.*)

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...