Tuesday, July 20, 2021

माणसातला देव्

पुण्यात कोरोना चा कहर माजला होता. नोकरी चे ही काही खरे नव्हते. वर्क फ्रॉम होम सुरु होते . पगार ही पुर्ण हातात येत नव्हता. दिनेश ने बायको आणि 2 मुलां सह गावी कर्नाटक ला जाण्याचा निर्णय घेतला. पावसाचे दिवस सुरु होते. लागेल तेवढे सामान  सोबत घेऊन कार घेवून निघाला. दीपाली पुढे आणि मुले मागच्या सिटवर बसली होती. पाऊस थांबायचा नाव घेत नव्हता. रात्री चा त्यांचा प्रवास सुरु होता. पुणे कोल्हापुर हाय वे वर धुंवाधार पाऊस चालू होता. हळू हळू कार ड्राइव्ह करत दिनेश चालला होता.याच हाय वे वर कोरोना नामक सैतान दबा धरुन बसला असेल हे त्याच्या गावी ही नव्हते. जेमतेम सातारा क्रॉस केले आणि दीपाली ला अचानक थंडी वाजुन अंगात ताप भरला आणि तिला उलटया सुरु झाल्या. तिला श्वास घ्यायला ही त्रास होऊ लागला. मग मुले पुढच्या सीट वर बसली आणि दीपाली मागे सीट वर झोपली.दिनेश ने एक सरकारी हॉस्पिटल बघुन गाड़ी तिथे नेली. दीपाली ला डॉक्टरानी चेक केले खूप शिकस्तीचे प्रयत्न त्यांनी केले पण शेवटी  त्याच्या हातात तिचं डेथ सर्टिफिकेट दिलं ज्यावर लिहलं होत sudden death due to Corona virus.  दिनेश ला काहीच सुचत नवहते तो बधिर झाला होता. दोन लहान मूल आणि मृत अवस्थेतील पत्नी यांना सोबत त्याचा प्रवास गावाकडे सुरू झाला. आता त्याने कोल्हापूर पार केले होते कर्नाटक हद्दीत तो पोहचत होताच तसे त्याने आपल्या घरी कॉल लावून दीपाली बद्दल सांगितले पण गावात बाहेरून आलेल्यानं परवानगी नाही तू तसाच माघारी जा अस दिनेश ला सांगण्यात आले. निराश हताश मनाने आणि जड अंतकरणा ने तो माघारी निघाला . आपल्या बायको चा अंत्यविधी कुठे आणि कसा करू हा विचार डोक्यात होता. तितक्यात समोर कोल्हापूर गावाची कमान त्याला दिसली . दीपाली आई अंबाबाई ची निस्सीम भक्त होती आई तूच आता मार्ग दाखव म्हणत दिनेश कोल्हापूर च्या कमानी तुन आत आला. जवळच लक्ष्मी पुरी पोलीस स्टेशन त्याला दिसले . पोलिसांनी त्याची अवस्था बघितली आणि त्याला मुलांना चहा बिस्किटे खाऊ घातली. दीपाली चा अंत्यविधी ही पार पाडला. दिनेश  त्या पोलिसांना पुढे चक्क नतमस्तक झाला. साहेब खूप ऐकले होते कोल्हापूर आणि इथल्या माणसां बद्दल आज त्याची प्रचिती आली. माणसाने जन्म कुठे ही घ्यावा पण मरण मात्र कोल्हापुरात यावं . हे अगदी खरे आहे. तुमच्या रुपात जणू देवच माझ्या मदतीला आला..पोलीसांचा निरोप घेताना दिनेश चे डोळे कृतज्ञेन भरून आले.

(कोल्हापूर कर्नाटक सीमेवर दि १०.०७.२०२१ रोजी घडलेल्या एका सत्य घटनावर आधारित.*)

No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...