Tuesday, July 27, 2021

हैं तुझे भी इजाजत (भाग 1)

We all have our own sorrows,but it doesn't mean we just cry over them and forget to enjoy life ..!!" .......by writer Sudeep Nagarkar... (You are trending in my dreams )
     अँमनोरा मॉल फूल सजवला होता लाईट् च्या माळा निओंन् बल्ब यांनी चमकत होता. आज 31 डीसेंबर होते आणि त्यासाठी न्यू इयर चे सेलिब्रेशन खास रेड एफ एम् तर्फे होते म्युजिक शो डी जे पार्टी,डिनर,ड्रिंक सगळ होतं फूल माहौल रंगीन झाला होता. ज्याना कार्यक्रमाचे पास मिळाले होते त्यानाच या प्रोग्राम ला एंट्री होती .बाकि मॉल फिरायला आलेले लोक नुसत कानावर पडनारे म्युझिक आणि डि जे चा ताल यावर समाधान मानुन् जात होते . आतला माहौल खरच न्यू इयर ला वेलकम करायला चार चाँद लावत होता. जो तो ग्रुप नी फ़्रेंड सोबत आला होता कोणी डी जे च्या तालावर नाचत होते तर कोणी शिट्टी मारून गान्याला दाद देत होतं. कोणाच्या हातात स्नैक ,कोणाच्या हातात ड्रिंक होतं. जो तो आपल्या मस्तीत ,नादात तल्लीन झाला होता. रिया ऐकटी हातात वाइन घेवून बसली होती. आणि शो एन्जॉय करत होती. तिच्या बाजूला संयुक्ता तिच्या मैत्रिणी आणि तिची 11 वर्षाची मुलगी होती.संयुक्ता पन ड्रिंक करायची पन आता मुलगी होती सोबत म्हणून आज तिने ड्रिंक नाही घेतली.रिया एकदम बोल्ड दिसत होती उंच गोरी जीन्स आणि टी शर्ट घातलेली टॉम बॉय सारखी संयु ची मुलगी राहून राहून रिया कडेच पहात होती. तीला रिया बद्दल उत्सुकता लागुन् राहिली होती . तिचे रिया कड़े पाहणे रिया च्या लक्षात आले तेव्हा रिया ने तीला स्माइल दिली आणि हैलो म्हणाली. तसे तिने ही हाय केले. मग सयुक्ता बोलली हाय शी इज माय डॉटर फर्स्ट टाईम शी केम फॉर द इवेंट सो क्वाइट एक्सायटेड . या ओके माय सेल्फ रिया अँड आय एम् सयूंक्ता. रिया म्हणाली हँव ड्रिंक? नो थंक्स. संयु म्हणाली. आता 12 वाजायला 5 मिनिट कमी होते तसे सर्व जन स्टेज जवळ आले सगळ्यांनी एकत्र ड्रिंक्स हातात धरुन चीयर करत न्यू इयर चे वेलकम करायचे असे सांगितले होते . त्यामुळे सर्वजन पुढे आले बरोबर 12 च्या ठोक्याला सगळे जन हॅपी न्यू इयर म्हणत चियर केले. रिया ला ड्रिंक जास्त झाली होती ती एका मुलीं ला मागे धड़कली. सो सॉरी म्हणत तिने मागे असणाऱ्यां मुलींची माफी मागितली ती आर्वी होती या ईट्स ओके बी केयर फुल. हे आर्वी व्हाट हैपन सौम्या ने विचारले. नथिंग म्हणत त्या दोघी त्यांच्या जागेवर आल्या परत ड्रिंक घेतले त्यांनी. मग जेवायला  दूसरी कड़े टेबल लावले होते तिथे गेल्या. तिथे रिया सयुक्ता आर्वी आणि सौम्या एकत्र बसल्या होत्या. पुन्हा रिया ला पाहून आर्वी म्हणाली ,हेल्लो हॉउ यु फील नॉउ? मच बेटर थंक्स . फ्रेंड्स आर्वी ने हात पुढे केला. या फ़्रेंडस म्हणत रिया ने शेकहैंड केला मग रिया ने संयु ला ही शेकहैंड केला तिची आर्वी सोबत ओळख करून दिली . चोघी एकमेकिंच्या फ़्रेंड बनलया. गप्पा मारत जेवण करत होत्या. आर्वी म्हणाली आय एम् अ कंटेंट रायटर इन अ वुमन्स मॅगझिन. सौम्या म्हणाली आय एम् फैशन डिझायनर,संयु बोलली आय एम् डूइंग अ जॉब इन प्राइवेट कंपनी. अँड आय एम् जिम इंस्ट्रक्टर रिया म्हणाली. त्यांनी आपले नम्बर शेयर केले. जेवन झाले मग सगळ्या निरोप घेवून घरी निघाल्या . वीकेंड ला पुन्हा भेटु असे ठरले. आर्वी आणि सौम्या मैत्रीणि होत्या सो त्या एकत्रच गेल्या. संयु आणि रिया कैब ने गेल्या .  दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफ कोर्स मंडे होता. आर्वी ऑफीस ला आली तिची स्कूटी पार्क करत पटापट लिफ्ट कड़े आली. पार्किंगमध्ये गाड़ी लावतानाच तिने हिमांशु ची कार पाहिली होती . हिमांशु तिचा बॉस वुमेन्स वर्ल्ड मॅगझिन चा सर्वेसर्वा ,अ वेरी डैशिंग चार्मिंग ,सिजलिंग यंग बॉय.. आर्वी ला खुप आवड़ायचा ,प्रेमात होती त्याच्या. त्याच्या सोबत लिफ्ट मध्ये जायला मिळावे म्हणून बरोबर हिमांशु च्या वेळे ला ती ही ऑफीस ला यायची. पन आर्वी थोड़ी फैट होती तीला खाणयावर कंट्रोल ठेवता येत नव्हता. पन दिसायला छान गुड़ी गुड़ी चँबी गर्ल. थोड़े वेट सोडले तर नक्की सुंदर होती. त्यामुळे तिला वाटायचे की हा हैंडसम हंक हिमांशु तीला भाव का देईल . बट ही मेंटेन हिज स्टैंडर्ड. ती पळतच लिफ्ट पाशी आली. नुकतीच लिफ्ट आली होती तीला पाहून हिमांशु ने लिफ्ट अडवली होती. थैंक यु सर, चील इतकी घाई का आहे त्याने विचारले. सर लेट नको व्हायला म्हणून पळत आले. ओह्ह तो इतकेच बोलला. ती त्यालाच पहात होती . खुप हैंडसम दिसत होता तो आणि त्याने लावलेला परफ्यूम तिला भयानक आवड़ायचा ती मुद्दाम त्याच्या जवळ च उभी राहायची जेणे करून तो सुवास ती मनभरून घ्यायची. रोज हेच ती करायची वेड़ी झाली होती हिमांशु साठी. ऑफीस आले तसे दोघे ही लिफ्ट मधून बाहेर आले . आर्वी तिच्या टेबल पाशी गेली.
क्रमश  कथा कशी वाटली नक्की कमेंट करा..stay connected..!!!   ©® sangieta devkar 2017


No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...