Tuesday, October 12, 2021

है तुझे भी इजाजत(भाग 12 अंतिम)

आर्वी म्हणाली सर तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते तर तसे सांगायचे होते तुम्ही मला फसवलत तसे जान्हवी ला ही फसवलत. आर्वी मी कोणालाही फसवले नाही . जान्हवी आणि मी लहानपणापासून एकत्र मोठे झालो आमचे घरचे रिलेशन आहे. आणि तुला फसवले म्हणतेस तर मला सांग मी तुला कधीतरी लव यु बोललो का ? म्हणजे सर तुम्ही मला लाईक करत होता ते काय होत? आर्वी लाईक अँड लव आर टू डिफ्रंनट वर्ड्स अँड बोथ आर डिफ्रंनट मिनींग . तू गफलत करतेस आवडणे आणि प्रेम असणे या वेगवेगळ्या भावना आहेत. पण सर मी तर हे प्रेमच समजत होते. आर्वी मी तुला गोव्याला हेच बोललो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तिचा सहवास आवडतो म्हणजेच त्या व्यक्ती वर आपले प्रेम आहे अस होत नाही बस्स आवडते कोणीतरी दयाट्स इट. तेव्हा तू ही म्हणाली हो सर मला पण असच वाटत मग मला वाटले तू ही मला लाईक करतेस सो काय हरकत आहे थोडा वेळ एकत्र घालवू एन्जॉय करू त्यात इतकं मनाला का लावून घेतेस? मी आज ही तुला लाईक करतो. बास सर आता एंगेजमेंट झालीय तुमची आणि अस बोलता तुम्ही? आर्वी कुठल्या मेंटयालिटी मध्ये जगतेस तू आज चा काळ जमाना असाच आहे मस्त रहा एंजॉय करा उगाच इमोशनल फुल होऊन काही ही मिळत नाही आयुष्यात. मला सांग तू माझ्या सोबत जो वेळ घालवलास तो कायम तुझ्या आठवणीत राहील ना तुला ही आनंद मिळाला ना मग झाले तर कशाला इतका विचार करतेस? आणि मी तुला कुठल्याच गोष्टीला जबरदस्ती केली नाही आपण फिजिकली एकत्र आलो ते ही तुझ्या मर्जीने. सर तुमच्या हाई प्रोफाईल सोसायटीमध्ये हे अस चालत असेल आम्ही नाही आहोत इतके मॉडर्न आम्ही खर प्रेम करतो मनापासून जीव लावतो तुम्हाला नाही समजणार ते. आर्वी तुला माझ्याशी संबंध ठेवायचा तर ठेव आय डोन्ट माईंड पण हे चिट केले वगैरे बोलू नकोस. नो सर मी इतकी ही चिप नाही आहे. मला माझा स्वाभिमान विकून नाही जगता येणार. हा घ्या माझा राजीनामा . आणि आर्वी तिथून बाहेर पडली. तिला फसवल्याच दुःख होतच पण टाळी एका हाताने वाजत नाही हे ती ही जाणून होती. या गोष्ट ला ती ही जबाबदार होतीच,  विचार  न करता हिमांशू ला भुलून ती वाहवत गेली. ती घरी आली आणि संयु रिया सौम्या ला संध्याकाळी त्याच्या नेहमीच्या ठिकाणी या म्हणाली तिचा आवाज ही अगदी लो फील करत होता .मला तुमची गरज आहे अस बोलली. इकडे या तिघींना टेंशन आले की काय झाले आर्वी ला . फोन वर बोलताना पण डिस्टर्ब वाटत होती. संध्याकाळी सगळ्या जमल्या त्यांना बघुनच आर्वी त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. आर्वी काय झाले अशी रडतेस का सांग ना रिया बोलली. रिया  हिमांशू चिटेड मि काल त्याने त्याच्या मैत्रीण सोबत एंगेजमेंट केली. व्हॉट ? तिघी एकदम ओरडल्या . हो मी काल बर्थ डे पार्टीला गेले तेव्हा त्याची एंगेजमेंट ची अनौसमेंट केली अचानक आणि झाली त्याची एंगेजमेंट जान्हवी म्हणून आहे तिच्या सोबत. मग त्याने तुला का डेट केले संयु बोलली. त्याला वाटले मी त्याला लाईक करते म्हणजे फक्त लाइकच असेल प्रेम वगैरे नाही. आणि तो सुद्धा फक्त मला लाइक करायचा नॉट लव. हे दोन वेगवेगळे वर्ड्स आहेत म्हणे त्याचा मिनींग पण वेगळा होता. तुला आनंद वाटत होता माझा सहवास आवडत होता म्हणून मी पण एन्जॉय केले दयाटस इट. 

ओहह आर्वी तू त्याला कधी बोलली नाहीस का की तुझे प्रेम आहे त्याचावर? सौम्या म्हणाली.नाही ग मला वाटले तो मला रिस्पॉन्स देतो म्हणजे मी ही त्याला आवडत असणार ना! ओके आर्वी जे झालं ते झालं ही श्रीमंत मूल अशीच असतात ग त्यांना प्रेम वगैरे खेळ वाटतो त्यांना फक्त टाईमपास करायचा असतो आणि आपण त्यांच्या दिसण्याला,बोलण्याला भुलून जातो. सोडून दे हा विषय आताच इथे तूच मला बोलली होतीस ना की आयुष्यात प्रोब्लेम ,दुःख येणारच म्हणून आपण जगणं नाही सोडायच . त्यावर मात करत जगायचं हो ना . आता एकदाच रडून घे मनसोक्त आर्वी नंतर या डोळ्यातुन एक ही अश्रू वाया घालवू नकोस. तुझ्या साठी कोणीतरी असेलच ना जो तुझे हे अश्रू आपल्या ओजळीत जपून ठेवेल . मग हास बघू आता छान पैकी  . असे म्हणत रिया ने तिचे डोळे पुसले. आम्ही आहोत ना ग सोबत संयु सौम्या म्हणाल्या. हो आय लव यु डियर म्हणत आर्वी ने तिघींना मिठी मारली. चोघींनी एकमेकींचे हात एकत्र ठेवले आणि रिया म्हणाली,देयर इज ओन्ली वन बेस्ट शिप मग बाकीच्या म्हणाल्या येस दयाट इज आवर फ्रेंडशिप..थ्री चियर्स फॉर आवर फ्रेन्डशिप हिप हिप हुर्ररे..असे मोठ्याने ओरडल्या. हे आयुष्य आपलं आहे आणि ते कसे जगायचं ते आपणच ठरवायचं ,दुःख,अपमान,सगळं बाजूला ठेवून आनंदात जगायचं . कोणाचा विचार नाही करायचा . स्वतःता साठी जगायचे रिया म्हणाली. हो रिया यु आर राईट सौम्या म्हणाली. मग तिघी निघाल्या आर्वी च्या कार मधून मूड चेंज करायला संयु ने एफ एम सुरू केले मस्त गाणं लागले होते.....
  इन दिनों, दिल मेरा, मुझसे है कह रहा
तू ख्व़ाब सजा, तू जी ले ज़रा
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मुहब्बत

बेरंग सी है बड़ी ज़िन्दगी कुछ रंग तो भरूँ
मैं अपनी तनहाई के वास्ते अब कुछ तो करूँ
जब मिले थोड़ी फुर्सत, मुझसे कर ले मुहब्बत
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मुहब्बत

उसको छुपाकर मैं सबसे कभी ले चलूँ कहीं दूर
आँखों के प्यालों से पीता रहूँ उसके चेहरे का नूर
इस ज़माने से छुपकर, पूरी कर लूँ मैं हसरत
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मुहब्बत

जणू त्या चोघी साठीच हे सॉंग लागले होते त्या ही मग मोठ्याने गाणं म्हणू लागल्या ,तू ख्वाब सजा, तू जी ले जरा है तुझे भी इजाजत.................

या चार मैत्रिणीची कथा आणि व्यथा मी या  कथे मधून मांडण्याचा प्रयत्न केला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.  मला हेच सांगायचे आहे की जसे मी सुरवातीला हे वाक्य टाकले की  "We all have our own sorrows, but it doesn't mean we just cry over them and forget to enjoy life ..!!" ...  म्हणजेच आयुष्यात दुःख असणारच आहे याचा अर्थ असा नाही होत की आपण त्या दुःखावर रडत बसायचं आणि आयुष्य जगणंच सोडून द्यायच. आयुष्य एकदाच मिळते ते आनंदानं हसत जगायच ... म्हणूनच माझ्या कथेचे शीर्षक ही मला साजेसे वाटते ...है तुझे भी इजाजत...!!  शेवटी एकच सांगावेसे   
 वाटते ....."हजारों उलझने राहों में, 🤔 और कोशिशे बेहिसाब,
इसी का नाम है जिंदगी, चलते🚶रहिए जनाब।

समाप्त.....माझ्या या कथेला तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.. माझ्या इतर ही कथा वाचा शेयर करा. माझ्या नावासहित प्रसिध्द करू शकता. कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या आधीन आहेत . साहित्य चोरी हा गुन्हा आहे. कथा कशी वाटली नक्की सांगा... पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद 💐💐



है तुझे भी इजाजत(भाग 12 अंतिम)

आर्वी म्हणाली सर तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते तर तसे सांगायचे होते तुम्ही मला फसवलत तसे जान्हवी ला ही फसवलत. आर्वी मी कोणालाही फसवले नाही . जान्हवी आणि मी लहानपणापासून एकत्र मोठे झालो आमचे घरचे रिलेशन आहे. आणि तुला फसवले म्हणतेस तर मला सांग मी तुला कधीतरी लव यु बोललो का ? म्हणजे सर तुम्ही मला लाईक करत होता ते काय होत? आर्वी लाईक अँड लव आर टू डिफ्रंनट वर्ड्स अँड बोथ आर डिफ्रंनट मिनींग . तू गफलत करतेस आवडणे आणि प्रेम असणे या वेगवेगळ्या भावना आहेत. पण सर मी तर हे प्रेमच समजत होते. आर्वी मी तुला गोव्याला हेच बोललो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तिचा सहवास आवडतो म्हणजेच त्या व्यक्ती वर आपले प्रेम आहे अस होत नाही बस्स आवडते कोणीतरी दयाट्स इट. तेव्हा तू ही म्हणाली हो सर मला पण असच वाटत मग मला वाटले तू ही मला लाईक करतेस सो काय हरकत आहे थोडा वेळ एकत्र घालवू एन्जॉय करू त्यात इतकं मनाला का लावून घेतेस? मी आज ही तुला लाईक करतो. बास सर आता एंगेजमेंट झालीय तुमची आणि अस बोलता तुम्ही? आर्वी कुठल्या मेंटयालिटी मध्ये जगतेस तू आज चा काळ जमाना असाच आहे मस्त रहा एंजॉय करा उगाच इमोशनल फुल होऊन काही ही मिळत नाही आयुष्यात. मला सांग तू माझ्या सोबत जो वेळ घालवलास तो कायम तुझ्या आठवणीत राहील ना तुला ही आनंद मिळाला ना मग झाले तर कशाला इतका विचार करतेस? आणि मी तुला कुठल्याच गोष्टीला जबरदस्ती केली नाही आपण फिजिकली एकत्र आलो ते ही तुझ्या मर्जीने. सर तुमच्या हाई प्रोफाईल सोसायटीमध्ये हे अस चालत असेल आम्ही नाही आहोत इतके मॉडर्न आम्ही खर प्रेम करतो मनापासून जीव लावतो तुम्हाला नाही समजणार ते. आर्वी तुला माझ्याशी संबंध ठेवायचा तर ठेव आय डोन्ट माईंड पण हे चिट केले वगैरे बोलू नकोस. नो सर मी इतकी ही चिप नाही आहे. मला माझा स्वाभिमान विकून नाही जगता येणार. हा घ्या माझा राजीनामा . आणि आर्वी तिथून बाहेर पडली. तिला फसवल्याच दुःख होतच पण टाळी एका हाताने वाजत नाही हे ती ही जाणून होती. या गोष्ट ला ती ही जबाबदार होतीच,  विचार  न करता हिमांशू ला भुलून ती वाहवत गेली. ती घरी आली आणि संयु रिया सौम्या ला संध्याकाळी त्याच्या नेहमीच्या ठिकाणी या म्हणाली तिचा आवाज ही अगदी लो फील करत होता .मला तुमची गरज आहे अस बोलली. इकडे या तिघींना टेंशन आले की काय झाले आर्वी ला . फोन वर बोलताना पण डिस्टर्ब वाटत होती. संध्याकाळी सगळ्या जमल्या त्यांना बघुनच आर्वी त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. आर्वी काय झाले अशी रडतेस का सांग ना रिया बोलली. रिया  हिमांशू चिटेड मि काल त्याने त्याच्या मैत्रीण सोबत एंगेजमेंट केली. व्हॉट ? तिघी एकदम ओरडल्या . हो मी काल बर्थ डे पार्टीला गेले तेव्हा त्याची एंगेजमेंट ची अनौसमेंट केली अचानक आणि झाली त्याची एंगेजमेंट जान्हवी म्हणून आहे तिच्या सोबत. मग त्याने तुला का डेट केले संयु बोलली. त्याला वाटले मी त्याला लाईक करते म्हणजे फक्त लाइकच असेल प्रेम वगैरे नाही. आणि तो सुद्धा फक्त मला लाइक करायचा नॉट लव. हे दोन वेगवेगळे वर्ड्स आहेत म्हणे त्याचा मिनींग पण वेगळा होता. तुला आनंद वाटत होता माझा सहवास आवडत होता म्हणून मी पण एन्जॉय केले दयाटस इट. ओहह आर्वी तू त्याला कधी बोलली नाहीस का की तुझे प्रेम आहे त्याचावर? सौम्या म्हणाली.नाही ग मला वाटले तो मला रिस्पॉन्स देतो म्हणजे मी ही त्याला आवडत असणार ना! ओके आर्वी जे झालं ते झालं ही श्रीमंत मूल अशीच असतात ग त्यांना प्रेम वगैरे खेळ वाटतो त्यांना फक्त टाईमपास करायचा असतो आणि आपण त्यांच्या दिसण्याला,बोलण्याला भुलून जातो. सोडून दे हा विषय आताच इथे तूच मला बोलली होतीस ना की आयुष्यात प्रोब्लेम ,दुःख येणारच म्हणून आपण जगणं नाही सोडायच . त्यावर मात करत जगायचं हो ना . आता एकदाच रडून घे मनसोक्त आर्वी नंतर या डोळ्यातुन एक ही अश्रू वाया घालवू नकोस. तुझ्या साठी कोणीतरी असेलच ना जो तुझे हे अश्रू आपल्या ओजळीत जपून ठेवेल . मग हास बघू आता छान पैकी  . असे म्हणत रिया ने तिचे डोळे पुसले. आम्ही आहोत ना ग सोबत संयु सौम्या म्हणाल्या. हो आय लव यु डियर म्हणत आर्वी ने तिघींना मिठी मारली. चोघींनी एकमेकींचे हात एकत्र ठेवले आणि रिया म्हणाली,देयर इज ओन्ली वन बेस्ट शिप मग बाकीच्या म्हणाल्या येस दयाट इज आवर फ्रेंडशिप..थ्री चियर्स फॉर आवर फ्रेन्डशिप हिप हिप हुर्ररे..असे मोठ्याने ओरडल्या. हे आयुष्य आपलं आहे आणि ते कसे जगायचं ते आपणच ठरवायचं ,दुःख,अपमान,सगळं बाजूला ठेवून आनंदात जगायचं . कोणाचा विचार नाही करायचा . स्वतःता साठी जगायचे रिया म्हणाली. हो रिया यु आर राईट सौम्या म्हणाली. मग तिघी निघाल्या आर्वी च्या कार मधून मूड चेंज करायला संयु ने एफ एम सुरू केले मस्त गाणं लागले होते.....
  इन दिनों, दिल मेरा, मुझसे है कह रहा
तू ख्व़ाब सजा, तू जी ले ज़रा
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मुहब्बत

बेरंग सी है बड़ी ज़िन्दगी कुछ रंग तो भरूँ
मैं अपनी तनहाई के वास्ते अब कुछ तो करूँ
जब मिले थोड़ी फुर्सत, मुझसे कर ले मुहब्बत
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मुहब्बत

उसको छुपाकर मैं सबसे कभी ले चलूँ कहीं दूर
आँखों के प्यालों से पीता रहूँ उसके चेहरे का नूर
इस ज़माने से छुपकर, पूरी कर लूँ मैं हसरत
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मुहब्बत

जणू त्या चोघी साठीच हे सॉंग लागले होते त्या ही मग मोठ्याने गाणं म्हणू लागल्या ,तू ख्वाब सजा, तू जी ले जरा है तुझे भी इजाजत.................

या चार मैत्रिणीची कथा आणि व्यथा मी या  कथे मधून मांडण्याचा प्रयत्न केला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.  मला हेच सांगायचे आहे की जसे मी सुरवातीला हे वाक्य टाकले की  "We all have our own sorrows,but it doesn't mean we just cry over them and forget to enjoy life ..!!" ...  म्हणजेच आयुष्यात दुःख असणारच आहे याचा अर्थ असा नाही होत की आपण त्या दुःखावर रडत बसायचं आणि आयुष्य जगणंच सोडून द्यायच. आयुष्य एकदाच मिळते ते आनंदानं हसत जगायच ... म्हणूनच माझ्या कथेचे शीर्षक ही मला साजेसे वाटते ...है तुझे भी इजाजत...!!  शेवटी एकच सांगावेसे   
 वाटते ....."हजारों उलझने राहों में, 🤔 और कोशिशे बेहिसाब,
इसी का नाम है जिंदगी, चलते🚶रहिए जनाब।

समाप्त.....माझ्या या कथेला तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.. माझ्या इतर ही कथा वाचा शेयर करा. माझ्या नावासहित प्रसिध्द करू शकता. कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या आधीन आहेत . साहित्य चोरी हा गुन्हा आहे. कथा कशी वाटली नक्की सांगा... पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद 💐💐



है तुझे भी इजाजत (भाग 11)

चेतन थोडा तरी हर्ट झाला हे तिने ओळखले होते पण तो समंजस आहे मला सांभाळून घेईल इतका विश्वास त्याच्या बद्दल तिला नक्कीच होता हो आणि चेतन होताच तसा केयरिंग अँड अँडरस्टँडिंग!
  आज हिमांशू चा वाढदिवस होता. आर्वी ने त्याला आदल्या रात्रीच 12 ला विश केले होते. त्याला घेतलेले गिफ्ट घेऊन ती ऑफिस ला आली. आल्या आल्याच ती त्याच्या केबिन कडे गेली. मे आय कम इन सर. येस आर्वी कम इन म्हणत हिमांशू ने तीला बसायला सांगितले. तिने त्याला शेकहॅण्ड करत पुन्हा एकदा बर्थडे विश केले. त्याला गिफ्ट दिले . ओहह आर्वी हे कशाला आनलेस गिफ्ट वैगरे. असू दे सर म्हणत आर्वी ने त्याला विचारले आवडले का सर गिफ्ट? या इट्स नाइस डियर  बट यु आर द मोस्ट प्रेशियस गिफ्ट फॉर मि. तशी आर्वी त्याच्या कडे पाहून हसत होती. आर्वी आज रात्री माझ्या बर्थडे ची पार्टी आहे तू नक्की ये तसे ही मी सगळ्या स्टाफ ला आता सांगणारच आहे. ओके सर म्हणत आर्वी त्याच्या केबिन मधून बाहेर आली. संध्याकाळी पार्टी ला काय घालावे तिला समजेना खूप मोठी मोठी लोक आसणार तिथे उगाच आपण विचित्र दिसायला नको त्यात आपण असे फॅटी फॅटी . काय घालावे असा विचार करत आर्वी ने एक लॉंग स्कर्ट निवडला आणि त्यावर छानसा असा टॉप घालायचा असे तिने ठरवले. छान मेकअप करून आर्वी तयार झाली. हॉटेल जे डब्लू मॅरियेट मध्ये हिमांशू ने पार्टी ठेवली होती. ती तिची कार घेऊन गेली . इतक्या मोठ्या हॉटेल ला ती फर्स्ट टाइम आली होती सो थोडी गोंधळली होती. हॉटेल मध्ये गेल्यावर तिला तिथल्या रिसेप्शनने विचारले की हिमांशू आरोरा यांच्या पार्टी साठी आला आहात का? हो मॅम ती बोलली. तुम्ही लिफ्ट ने टेरेस वर जा तिथे पार्टी ऑर्गनाइज केली आहे. ओके म्हणत आर्वी लिफ्ट ने टेरेस वर आली ते मस्त हॉटेल चे रुफ टेरेस होते. खुप छान लाईटस ने सगळं डेकोरेशन केले होते. समोर मोठा स्टेज होता. तिथे मोठ्या अक्षरात हॅप्पी बर्थडे हिमांशू असे लिहिले होते. रेड आणि व्हाईट कलरचे बलून वॉल वर लावले होते. त्या बलून च्या मधून लाईटस सोडल्या होत्या . आर्वी ने पाहिले एका बाजूला तिचा सगळा ऑफिस स्टाफ बसला होता,तिथे ती गेली. त्यांना सँनक्स आणि ड्रिंक देण्यात आले.हिमांशू कुठे दिसत नव्हता. आर्वी आणि त्याचा बद्दल कोणाला बोलू नको असे हिमांशू ने तिला सांगितले होते म्हणून ती कोणाला विचारू पण शकत नवहती तरी तिने फक्त बाकीच्याना विचारले सर कुठे दिसत नाहीत. एक कलीग म्हनाली,अजून सर काही आले नाहीत ,आम्हाला पण नाही दिसले. थोड्याच वेळात हिमांशू आला मस्त त्याने थ्री पीस ब्लेझर घातला होता खूप स्मार्ट दिसत होता. त्याच्या सोबत एक सुंदर नाजूक दिसणारी  मुलगी होती . आर्वी ला वाटले असेल त्याची बहिन वगैरे. मग एक मोठा केक आणला तिथे आणि हिमांशू ला कट करायला लावला. सगळ्यानी टाळया वाजवून बर्थडे विश केले. हिमांशू ने  केक कापला. आणि त्या मुलीला केक भरवला तिने ही त्याला केक भरवला. स्टेजवर एक जण आला त्याच्या हातात माईक होता तो म्हणाला,तुम्हा सगळ्याना आज  हिमांशू च्या बर्थ डे पार्टी ला आमंत्रण करण्या मागे अजून एक खास कारण आहे ते म्हणजे आज हिमांशू आणि त्याची बाल मैत्रीण जान्हवी शहा यांची एंगेजमेन्ट सुध्दा आहे हे तुम्हा सर्वांना स्पेशल सुरप्राइज होते सो हिमांशू अँड जान्हवी लेट्स स्टार्ट द एंगेजमेंट सेरेमनी आणि सगळ्यानी टाळया वाजवत त्यांना ग्रीट केले. आर्वी ला समजेना हे काय चाललय. हिमांशू चा साखरपुडा ? तिच्या पाया खालची जमीन सरकली. समोर हिमांशू आणि जान्हवी एकमेकांना रिंग घालत होते आणि आर्वीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहात होत्या तिला तिथे थांबने आता अशक्य झाले. ती तिथून बाहेर पडली. रडत रडतच ती कार ड्राईव्ह करत घरी आली. हिमांशू ने तिला फसवले होते ,तिचा फक्त वापर केला होता त्याने . तो काही तिच्या वर प्रेम करत नवहता तर त्या जान्हवी वर प्रेम करत होता मग आर्वी ला गोवयाला का घेवून गेला फक्त तिचा उपभोग घ्यायला? आर्वीच डोकं विचार करून करून बधिर होऊ लागले. खूप रडली ती तिच्या डोळ्यासमोर त्याची एगेजमेन्ट दिसत होती. काही सुचत न्हवते तिला.व्हाय यु चिट मि हिमांशू व्हाय असे ती बडबडत होती. रडत रडत तिला झोप लागून गेली. सकाळी ती उठली कालचा प्रसंग पुन्हा आठवू लागला तसे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. खूप हर्ट झाली होती ती . हिमांशू वर डोळे झाकून प्रेम केले विश्वास ठेवला त्याची ही अशी शिक्षा ? याच विचारात ती तयार झाली ऑफिस ला आली. रडून रडून डोळे सुजले होते डोकं जाम झाले होते. ऑफिस मध्ये तिने सांगितले की तब्येत ठीक नाही म्हणून. हिमांशू अजून आला नवहता ऑफिस ला. ती वाट बघत बसली. 10 मिनींटात तो आला. आर्वी त्याच्या केबिन मध्ये न परवानगी घेता गेली. आर्वी अरे ये ये गुड मॉर्निंग हिमांशू म्हणाला. पण ती काहिच बोलली नाही. काल तू पार्टी ला आली नाहीस का? हा आले होते सर खूप छान सरप्राईज दिले तुम्ही मला. आर्वी तू बस आणि मग बोल काय सरप्राईज? आर्वी म्हणाली सर तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते तर तसे सांगायचे होते तुम्ही मला फसवलत तसे जान्हवी ला ही फसवलत. आर्वी मी कोणालाही फसवले नाही . 

क्रमश .....



है तुझे भी इजाजत(भाग 10)

हिमांशू तीच्या बाजूला शांत झोपला होता. आर्वी ने त्याला कपाळावर किस केले  तसा तो जागा झाला सर मी जाते माझ्या रुम मधये आणि आवरून येते. तसे हिमांशू ने तिला पुन्हा आपल्या जवळ ओढले आणि तिला किस केले. जा आणि स्वीमिंग पूल जवळ ये.हिमांशू म्हणाला. आर्वी स्वहताचे आवरुन लाँनवर आली.हिमांशू आला लगेच त्याने स्विमिंग ची शॉर्टस घातली होती फक्त बाथ सूट त्याने आर्वी कडे दिला ती तिथे टेबल जवळ चेयर होती तिथे बसली. हिमांशू एकदम हॉट दिसत होता. आजूबाजूला असणाऱ्या मुली त्याच्या कडे अनामिष नजरेने पहात होत्या. आर्वी सुद्धा भान हरपून त्याच्या कडे पहात होती. तो मस्त स्विमिंग करत होता आणि आर्वी ला पाहून स्माईल करत होता. मधूनच फ्लाइंग किस देत होता. त्याच स्विमिंग झाले तसे त्याने आर्वी ला बाथसुट द्यायला बोलवले आर्वी गेली त्याने पटकन तिला पाण्यात ओढले . तिला क्षणभर काही समजलेच नाही पण आपण पान्यात आहोत हे समजले तसे ती घाबरून म्हणाली,सर मला खूप भीती वाटते मला बाहेर काढा ना प्लिज. त्याने तिला घट्ट पकडले होते म्हणाला,बघ मी पकडले आहे तुला ,तुला काही ही होणार नाही चिल आर्वी. तरी ती घाबरत होती त्याला खूप हसू येत होते त्याने पाणी तिच्या अंगावर उडवले . सर बाहेर काढा ना मला. तसे त्याने तिला सरळ हाताला धरून उभे केले म्हणाला,बघ 4 फूट भर पाणी आहे फक्त याला तू घाबरतेस. हो सर म्हणत तिने त्याच्या कमरेला पकडून ठेवले. मग हिमांशू म्हणाला, चल जाऊ बाहेर आणि तिला तसाच पकडुन ते दोघ पूल बाहेर आले. जा आर्वी चेंज करून ये नाहीतर आजारी पडशील. ओके म्हणत ती रूम कडे गेली. आर्वी आणि हिमांशू आवरून आले आज ते कल्वा बीच,कलंगुट बीच,अंगोदा बीच,बागा बीच फिरणार होते. दिवस भर ते फिरत  होते. खाण पिण सगळं आर्वी एन्जॉय करत होती. रात्र झाली तसे ते हॉटेल वर परतले. आज ही आर्वी हिमांशू सोबत त्याच्या रूम मध्ये झोपली. दोघ एकमेकात गुंग झाले होते. दुसर्या दिवशी ते गोव्याहुन परत निघाले. आर्वी ला घरी सोडून हिमांशू गेला. आर्वी एका वेगळ्याच विश्वात दंग होती. हिमांशू त्याचा सहवास गोवा ट्रिप यातच तल्लीन होती ती. पुढच्याच आठवड्यात हिमांशू चा वाढदिवस होता त्याला काहीतरी छान गिफ्ट द्यावे असे तिने ठरवले. इकडे रिया ने संयु आणि सौम्या ला त्या दिवशी जिम मध्ये जे घडले तिच्या आणि रसिका मध्ये ते सगळं सांगितले होते. मयंक ने तिला जिम मधून काढले हे ही सांगितले आर्वी चा फोन लागत नव्हता सो तिला याबद्दल काहीच कल्पना नवहती. सकाळी तिला सौम्या चा कॉल आला मग तिने रिया बद्दल सगळं आर्वी ला सांगितले . आर्वी ला ही वाईट वाटले खूप. या विकेंड ला भेटूया असे आर्वी म्हणाली. रिया आणि संयु ला पण सांग असे म्हणत आर्वी ने फोन ठेवला. तिच्या मनात आले की का आयुष्य साधे सरळ असू शकत नाही? किती तरी वळण येत राहतात प्रत्येकाच्या आयुष्यात. यालाच जीवन म्हणतात का? तिला रिया बद्दल खूप वाईट वाटले तिने तिला काळजी नको करू आम्ही आहोत सोबत तुझ्या असा मेसेज केला. विकेंड ला त्या चौघी भेटल्या खूप गप्पा मारल्या त्यांनी. आर्वी ने तिची गोवा ट्रीप छान झाली असे सांगितले ती खुश होती . हिमांशू चा बर्थडे लवकरच आहे बोलली त्याच्या साठी वाढदिवसाला गिफ्ट म्हणून तिने एक लेदर चे वॉलेट आणि टाय खरेदी केला. रिया गप गप होती. आर्वी म्हणाली,रिया नको ना इतकं मनाला लावून घेऊ .लाईफ मध्ये असे अपस अँड डाऊन्स येत राहणार म्हणून काय आपण जगणं सोडून देतो का? झालेल्या गोष्टीचा किती विचार करायचा हे आपणच ठरवायला हवे ना? प्रॉब्लेम सगळ्याना येतात ग म्हणून आनंदानं जगणं विसरून जायचा का? संयु सौम्या ही बोलल्या हो रिया आर्वी बरोबर बोलत आहे उगाच नको ना टेंशन घेवूस . ओके आय एम फाईन गर्ल्स रिया म्हणाली. तसे त्या तिघी एकसाथ म्हणाल्या येस दयाटस लाइक  अ गुड गर्ल. मग गप्पा हसण,ड्रिंक करत जेवण केले त्यांनी आणि  त्या घरी परतल्या. 
   आज चार दिवस झाले संयु ने चेतन ला कॉल केला नवहता मेसेज केला नवहता त्याचा फोन आला तेव्हा ती मोजकेच बोलली . कामात असेल म्हणून त्याने ही बाब इग्नोर केली. संयु ला समजत नवहते की काय करावे चेतन सोबत रिलेशन ठेवू की नको या संभ्रमात ती होती कारण नुपूर च वागणं . त्या दिवशी चेतन भेटला हॉटेलमध्ये तेव्हा पासून नुपूर संयु शी तुटक तुटकच वागत होती. आई चे मन,भावना समजून घ्यायला ती अजून तशी लहानच होती. पण संयु मात्र विचारात पडली की नुपूर ला कसे आणि कोणत्या शब्दात समजावून सांगू. म्हणूनच ती चेतन ला टाळत होती. आठवडा झाला पण कायम वीक डे ला भेटणारी संयु या आठवड्यात भेटली नाही आपल्याला हे चेतन च्या लक्षात आले. संध्याकाळी संयु ऑफिस सुटल्यावर बाहेर आली तर ऑफिस बाहेर समोरच चेतन उभा असलेला तिला दिसला. आता त्याला टाळण तिला शक्य नव्हते. हॅलो चेतन तू इथे कसा? काय करणार मग तुला वेळ नाही आहे ना माझ्या साठी म्हणून आलो इथेच . चेतन इथे नको बोलायला चल कॉफी शॉप ला जाऊ संयु बोलली. चल जाऊ चेतन म्हणाला आणि त्याच्याच बाईक वरून ते जवळच्या कॉफी शॉप ला आले. चेतन ने कॉफी ऑर्डर केली. संयु अग काय चालयय तुझं ना मेसेज ना कॉल माझे काही चुकले आहे का सांग. चेतन तुझे काहीच नाही चुकले रे उलट तू किती प्रेम करतोस माझ्यावर हे मला माहीत नाही का? मग का असे इग्नोर करतेस मला. चेतन त्या दिवशी तू मला आणि नुपूर ला भेटलास ना तेव्हा पासून नूपुर नीट बोलत नाही रे माझ्याशी तिला बहुतेक आपलं रिलेशन मान्य नाही. ती मला बोलली सुद्धा की तुला कशाला बॉयफ्रेंड हवा? संयु तू बोल ना तिच्या शी नीट समजावून सांग. चेतन आपलं नात समजुन घेन्या इतपत ती मोठी नाही अजून. तरी मी त्या दिवशी बोलले पण तिला नाही पटले माझे म्हणणे. मग मी बोलून बघू का तिच्याशी . नको चेतन मग तर ती अजून चिडेल. अरे मग काय तू मला भेटनार बोलणार नाहीस का? मी प्रेम करतो तुझ्यावर संयु आय निड यु. हो चेतन मला समजत सगळं पण माझा ही नाईलाज तू समजून घे ना. संयु मी तुला समजून घेतच आलोय ग.माज्या मनाचा विचार तू पण कर ना. चेतन मी आई आहे रे मला माज्या आधी माझ्या मुली चा विचार करायला हवा. हो तू आई आहेस म्हणून तू मन मारून जगणार आणि उद्या तुझी मुलगी च तुला म्हणेल की मी सांगितले नव्हते तुला की माज्या साठी जग,तडजोड कर. चेतन हेच ना नूपुर च हे अडनीड वय आहे रे,तिला दुखवून मी माझं सुख कसे उपभोगु? मग काय करायच संयु तोडून टाकणार आहेस आपलं नात ? मला दुखवणार आहेस तू? आणि माझ्या शिवाय तू जगू शकशील ? चेतन आता तुझ्या कुठल्याच प्रश्नांची मी उत्तरे नाही देऊ शकत. तूच सांग मग संयु काय करायचं आपण त्याने तिचा हात हातात घेत विचारले. संयु ला चेतन हवा होता पण नुपूर ला ही दुखवायचे नव्हते. तिचे डोळे भरून आले. चेतन मी पण नाही राहू शकत रे तुझ्या शिवाय . संयु हे चाललंय ते असच चालू राहू दे तू नुपूर कडे जास्त लक्ष दे आता तिला तुझी जास्त गरज आहे आणि मी आहे कायम तुझ्या सोबत. जसा वेळ मिळेल तसे आपण भेटू नुपूर समोर मला तू कॉल करत जाऊ नकोस. नुपूर तुझी फर्स्ट प्रायोरिटी असेल. ती मोठी होईल तस तसे तिला समजत जाईल की तुला ही आधाराची,सोबतीची गरज आहे . तेव्हा मग आपण आपल्या नात्याचा विचार करू. चेतन म्हणजे आपल रिलेशन आहे तसे राहील ना? हो संयु आपल्या नात्यात दुरावा नाही येणार. चेतन एक सांगू तुला ? हा बोल ना संयु. चेतन आपण थोडया दिवसांचा ब्रेक घेऊया का? तू थांबशील का माझ्या साठी? हम्मम कठीण आहे पण चालेल तुझ्या साठी मी हे करायला तयार आहे. पण आठवण आली तर निदान कॉल कर मला. मी ही करेन. फक्त भेटायचे नाही म्हणतेस ना? हो चेतन थोडे दिवस मला नुपूर सोबत घालवू दे. ओके चल निघुयात संयु तो म्हणाला. संयु ला त्याच्या शी बोलून खूप हलके वाटत होते. थँक्यू चेतन संयु म्हणाली. तो फक्त हसला तिच्या कडे पाहून. संयु ला घरी सोडून चेतन घरी आला. आता कुठे संयु ला जरा निवांत वाटत होते आता ती नुपूर ला वेळ देणार होती. पण चेतन थोडा तरी हर्ट झाला हे तिने ओळखले होते पण तो समंजस आहे मला सांभाळून घेईल इतका विश्वास त्याच्या बद्दल तिला नक्कीच होता हो आणि चेतन होताच तसा केयरिंग अँड अँडरस्टँडिंग!
क्रमश .......कसा वाटला हा भाग नक्की सांगा. All rights rests with the author. Any kind of copying will result in legal consequences. 
 



है तुझे भी इजाजत (भाग 9)

रिया ला विसरणं त्याला अवघड होतं बिकॉज हि लव हर फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट.  रिया ही रागात घरी आली. तिला रडू आवरत नव्हते . मयंक ने तीचा अपमान केला होता. तिला राहुन राहून हेच वाटत होते की मी लेस्बियन आहे यात माझा काय दोष ? आणि मी माझ्या शरीरा च्या गरजा का पूर्ण करू नये? माज्या कडे बोट दाखवण्याचा अधिकार कोणालाच नाही. मी जशी आहे तसे स्वतःला स्वीकारले आहे  मग माझ आयुष्य कसे जगायचे हे मी ठरवणार. आणि मोठ्याने रडत ती म्हणत होती ,येस आय एम अ लेस्बियन. !! मग तिने खूप ड्रिंक घेतली आणि रसिका ला फोन लावला पण रसिका तिचा कॉल घेत नव्हती. खूप वेळा तिने कॉल लावला. मग एकदा तिने रिसिव्ह केला. बोल रिया का फोन करतेस मला. रसिका आय निड यु आय लव यु . आय कान्ट लिव्ह विदाउट यु. रिया आता सार काही संपले आहे. आपल्यात कोणतंच नात नाही. रसिका अस का म्हणतेस तू? तू माझी बेस्ट फ्रेन्ड आहेस ना? नो रिया मी तुझी कोणीही नाही.आता पर्यंत ठीक होत पण आता साऱ्या जगाला समजेल की मी लेस्बियन आहे. रसिका मग काय झाले आपण जे आहोत जसे आहोत तस स्वहताला स्वीकारने यातच भल आहे ते जगा पासून का लपवायचे? या समाजाने ही आपल्याला मानाने स्वीकारायला हवे असेल तर आधी आपण स्वहता स्वहताला स्वीकारायला हवे ना? हे बघ रिया तुला जमेल ते  सगळं मला नाही जमणार सो मला आता तू कधीच कॉल करू नकोस म्हणत रसिका ने फोन ठेवला. रिया ला काही समजेना खूप एकटी पडली ती आणि तसेच विचारात झोपून गेली.                                                               
            आर्वी हिमांशू सोबत गोव्याला जायला तयार झाली ती त्याच्या प्रेमात वेडी झाली होती तिची सारासार विवेकबुद्धी आता काम करत नवहती . हिमांशू शिवाय तिला दुसरं काही ही दिसत नव्हते. हे प्रेम आहे की मृगजळ हे ही तिला समजत नव्हते. ती हिमांशू सोबत फक्त वाहत चालली होती. हिमांशू ही खूश झाला. त्याच्या कार नेच ते ड्राइवर ला सोबत घेऊन निघाले. हिमांशूचा इतका जवळचा सहवास आर्वी ला वेड लावायला पुरेसा होता. गोव्यात ते 2 दिवस राहणार होते. दुपारी ते गोव्यात पोहचले. मग फ्रेश होऊन एकत्र लंच करू असे हिमांशू आर्वी ला म्हणाला. हॉटेल मध्ये त्याने 2 रूम बुक केल्या होत्या. त्यांनी लंच केले मग थोडा रेस्ट करून संध्याकाळी ते  बेताल बाटीमबीच ला जाणार होते . आर्वी मस्त थ्री फोर्थ जीन्स आणि लेमन कलरचा शॉर्ट टॉप घालून तयार झाली. हिमांशू ने ही शॉर्ट बर्म्युडा आणि व्हाईट टी शर्ट घातला होता. आज पहिल्यादा आर्वी त्याला असे कमी कपड्यात पाहत होती खूप हँडसम ,चार्मिंग दिसत होता तो. आर्वी एकटक पाहत होती त्याला. ती ही मस्त क्युट दिसत होती. यु आर लूकिंग सो लव्ली आर्वी . थँक्यू सर यु टू. चल निघायचे का तिथला बेताल बातिमबीच वरचा सनसेट खूप मस्त असतो. मग ते दोघे त्या बिच वर आले खूप मस्त वातावरण होते तिथे खूप लोक सनसेट पाहायला आली होती.
सनसेट चा नजारा खूपच रमणीय होता. सूर्याचा तो केशरी गोळा हळूहळू समुद्रात उतरत असल्याचा भास होत होता. सारा समुद्र त्या तांबूस केशरी रंगात न्हाऊन निघाला होता. आर्वी आणि हिमांशू ने खूप फोटो काढले .एकमेकांचा हात पकडून  ते बिच वर फिरत होते कधी हिमांशू तिला कमरेला आपल्या हातांचा विळखा घालून चालत होता. त्याचा तो मादक राकट स्पर्श तिला उल्हासित करत होता . मनात आनंदाचे तरंग उमटवत होता. तिला त्याचा तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. तनमन तिचे फुलुन जात होते. या बीच ला सनसेट बीच या नावाने ही ओळखले जात होते. अंधार पडू लागला तसे ते हॉटेल कडे परतले. दोघांनी ड्रिंक घेतले आणि मग जेवण केले. हिमांशू म्हणाला,आर्वी चल ना बाहेर लाँन वर फिरून येऊ. हा सर म्हणत ते हॉटेल च्या बाहेर लाँन वर आले तिथे स्विमिंग पूल पण होता. त्याने विचारले आर्वी स्विमिंग येते का तुला .? नाही सर मला भीती वाटते पाण्याची . ओहह अरे आपण उद्या मस्त स्विमिंग केले असते ना. नको सर तुम्ही करा ना . बर तू फक्त मला सोबत म्हणून इथे ये. चालेल सर. मग खूप गप्पा मारत बसले ते तिथे बेंचवर. हिमांशू  ने हलेकच तिचा हात आपल्या हातात घेतला . तिच्या नजरेत नजर रोखून पाहू लागला. शांत अशी रात्र,थंड बोचरी हवा,हवेने उडनारे तिचे केस. सगळं त्याला मादक वाटत होत. दुसर्या हाताने त्याने तिचे केस काना मागे टाकले तिच्या गालावरून हात फिरवला . ती नखशिखांत शहारली त्याच्या स्पर्शाने.त्याने आपल्या दोन्ही हातात तिचा चेहरा धरला आणि तिच्या ओठांवर किस केले. त्याचा हळुवार स्पर्श तिला अजून मोहात पाडत होता. आर्वी आय वॉन्ट यु आय लव यु डियर प्लिज. तिला त्याला नाकारणे अवघड झाले कारण ती ही त्याच्या मिठीत कैद वाहायला आसूसली होती. त्याने पुन्हा तिला किस केले म्हणाला,कम इन माय रूम आर्वी आय एम वेटिंग. आणि तो त्याच्या रूम कडे गेला. आर्वी ला समजेना काय करावे पण  हिमांशू चा सहवास तिला वेड लावत होता. शेवटी मना पुढे  डोक्याचे काही चालेना.असच असत प्रेम ... वेडं करणार आणि वेड लावणार ही!! आर्वी हिमांशू च्या रूम मध्ये गेली. त्याला खात्री होती की आर्वी येणार खूप मुलींना त्याने असच वेड लावलं होत. त्या मुळे मुलींची मानसिकता त्याला चांगली माहीत होती. त्याने आर्वी ला घट्ट मिठी मारली तिला किस करत राहिला पुन्हा पुन्हा. ती ही त्याला तसाच प्रतिसाद देत होती. दोघ बेडवर आले दोघांमधील कपडयांचा अडसर कधीच दूर झाला होता. प्रणयाच्या धुंदीत ते जगाला विसरून गेले आणि एकमेकात एकरूप झाले. सकाळी आर्वी ला जाग आली तिने पाहिले तर  हिमांशू तीच्या बाजूला शांत झोपला होता. आर्वी ने त्याला कपाळावर किस केले  तसा तो जागा झाला सर मी जाते माझ्या रुम मधये आणि आवरून येते. 
क्रमश .....stay connected...👍                                            
                                            
                                                       

                                           



है तुझे भी इजाजत (भाग 8)

हा माणूस आई चा फ्रेन्ड आहे की अजून कोणी असा ती विचार करत होती आता ती 12 वर्षा ची होती इतकं तरी तिला समजत होते. खाण झालं तसे चेतन ने बिल पेंड केले संयु नको म्हणत होती तरी पैसे देताना अगदी हक्का ने तिचा हात बाजूला करून चेतन ने बिल दिले. मग भेटू नंतर म्हणत चेतन निघून गेला या दोघी घरी आल्या. तसे नुपूर ने संयु ला विचारले मम्मा हा चेतन कोण ग. अग बोलले ना तुला माझा मित्र आहे म्हणून. मित्र आहे  की बॉयफ्रेंड आहे? आता नुपूर ला डाऊट आलाच आहे तर सांगावे खरे असे ठरवून संयु म्हणाली हा तो माझा बॉयफ्रेंड आहे. का मम्मा,तुला काय गरज आहे बॉयफ्रेंड ची? बेटा हे बघ तू अजून लहान आहेस, तुला जसे मित्र मैत्रीणी आहेत तसे मला सुद्धा   आहेत पण कोणी एक आपला खास मित्र बनतो आपली तशी गरजच असते तुला आता या गोष्टी नाही समजणार नंतर सगळं पटेल तुला. मग काय तू त्याच्याशी लग्न करणार आहेस? अजून काही नाही ठरवले मी नुपूर पण चेतन चांगला मुलगा आहे. पण तरीही स्टेप फादर ना? हे बघ नुपूर त्या गोष्टी खूप पुढच्या आहेत सध्या आम्ही चांगले मित्र आहोत आणि तुला पटणार नाही तोपर्यंत आणि तू तयार होत नाहीस तोपर्यंत आम्ही लग्न नाही करणार ओके. असे बोलून संयु रुम मध्ये गेली. नुपूर ला आवडले नाही का की चेतन माझा बॉयफ्रेंड आहे ते? पण तिला कसे समजावून सांगू ती धड लहान नाही आणि मोठी ही नाही. त्या नम्रता डॉक्टर पण म्हणाल्या ना की आपण पालक मुलांचे आयडॉल असतो मग मी चांगली आई नाही का?मी कोणावर तरी प्रेम करते म्हणून मी वाईट ठरते  का? मला माझं मन,भावना समजून घेणारा   कोणी सोबती नको का?  मी नुपूर चा चांगला सांभाळ करते तिच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्या साठी झटते.मग माझ्या गरजांच काय? आई वडील दोन्ही भूमिका पार पाडते मग यात माझ्या साठी मी थोडा वेळ जगले माझ्या गरजांची पूर्तता केली तर माझे काय चुकले ? नवरा कसा ही वागो,बाहेर लफडी करो त्याला सगळं माफ असत का? आणि मी मात्र आई आहे म्हणून  मी मन ,भावना, मारून मी ही माणूस आहे हे विसरून जगायचं का ? कशा साठी? नेहमी एका बाई लाच का अग्नीपरीक्षा द्यावी लागते ? पुरुष कसा ही बेलगाम वागू दे बाई च्या वागण्यावर मात्र कायम प्रशनचिन्ह ? मनासारख जगण्याचं स्वातंत्र्य सुध्दा बाई ला असू नये?  संयु खूप विचार करू लागली.आपोआप तिच्या डोळयातुन अश्रू वाहू लागले.चेतन की नुपूर या कात्रीत ती सापडली. खूप रडली आणि तशीच तिला झोप लागली.   रिया नेहमी प्रमाणे  जिम ला आली. आता रियाचे आणि रसिका चे नाते खूप घट्ट बनले होते कारण दोघीही लेस्बियन् होत्या. एकमेकीं शिवाय त्यांना करमत नसे मयंक आला होता जिम ला त्याने रिया ला गूड मॉर्निंग विश केले . रिया तू काही विचार केलास का माझ्या प्रपोजल चा? नाही मयंक अजुन तरी नाही. किती वेळ लागेल तुला माझ्यात काय कमी आहे ते तरी सांग ना की तुला मिळाला आहे कोणी दुसरा? मयंक मी सध्या कोणा चाच विचार करत नाहीये.ओके म्हणत मयंक त्याच्या केबिन मध्ये गेला. थोड्या वेळात रसिका आली अजून बाकीचे जिम मेम्बर पण आले. मयंक केबीन मधून रिया कडे पहात होता. सगळ्याना ती छान व्यवस्थित  गाईड करत होती. रसिका कडे जरा जास्त लक्ष देत होती. वर्क आऊट करताना रसिका खूप आकर्षक आणि सेक्सी दिसत होती. रिया ला तिला जवळ घेण्याचा मोह होत होता. शेवटी रिया ने रसिका च्या कानात काहीतरी सांगितले . आणि ती निघून गेली. हे सर्व मयंक केबिन मधून पहात होता. पाच मिनिटांत रसिका पाण्याची बाटली घेऊन तिथुन निघाली जेणेकरून कोणाला डाऊट येऊ नये. ती निघाली तसा मयंक ही उठला आणि रसिका च्या मागे जाऊ लागला. जिम खूप मोठी होती आणि खालच्या मजल्यावर एक स्टोर रूम होती तिथे जिम चे तुटलेले समान,मशनरी ठेवत असत. रसिका स्टोर रुम कडेच निघाली. मयंक पाठोपाठ होता तिला ते नाही समजले. त्याला पाहायचे होते की ही स्टोर रूम कडे का चालली आहे. रसिका दरवाजा उघडून आत गेली पण घाईत तीने दरवाजा नुसता बंद केला.कडी नाही लावली. मयंक दरवाज्या जवळ गेला. दाराला कान लावून ऐकू लागला. रसिकाला पाहून रिया ने तिला लगेचच मिठीत घेतले आणि तिला किस करू लागली. दोघीही जगाला विसरून किसिंग करत होत्या. मयंक ला काही आवाज ऐकू येईना पण तो दरवाज्याला खेटून उभा होता सो दरवाजा उघडा आहे हे त्याला समजले मग त्याने ते दार उघडले आणि पाहिले रिया आणि रसिका एकमेकांना जबरदस्त किस करत होत्या रसिका ने तिचा टिशर्ट काढला होता. आणि रिया तिला चेहऱ्यावर,छातीवर किस करत होती. मयंक हे पाहून शॉक झाला. आणि टाळ्या वाजवत  म्हणाला,वा ग्रेट रिया रसिका व्हेरी नाईस. त्यांच्या आवाजाने त्या भानावर आल्या. रसिका ने पटकन टि शर्ट घातला आणि तिथुन बाहेर पळत गेली. रिया खाली मान घालून उभी होती. वा रिया मस्त चालय तुम्हां दोघींच.त्याने तिचा चेहरा उचलून धरला  म्हणाला,मिस रिया यु आर नॉट अ गर्ल यु आर लेस्बियन . म्हणूनच तुला मी आवडत नव्हतो हा मयंक मी लेस्बियन आहे म्हणूनच मला तुझ्यात इंटरेस्ट नव्हता. आता तुला समजले ना. हो चांगलेच समजले. नाऊ यु गेट आऊट फ्रॉम जिम आय डोन्ट वॉन्ट अ लेस्बियन अँज अँन  इन्स्ट्रॅक्टर. मला पण काय इथे थांबायची हौस  नाही आहे आय एम गोइग. गेट लॉस्ट रागाने म्हणत  मयंक वर जिम मध्ये आला. त्याला अपेक्षा नव्हती की असे काही घडेल जिच्यावर मना पासून प्रेम केले ती लेस्बियन निघाली . खूप दुःखी झाला तो. केबिन मध्ये येऊन टेबलवर डोकं ठेवून बसला. खूप वाईट वाटत होते त्याला की रियाचा त्याने अपमान केला. त्यातच म्युझिक प्लेयर वर गाणं लागले होते ...."
मेरे हिस्से में तू नहीं हैये भी ना जानू क्यूँ नहीं हैइतना ही बस मुझको पता हैमैं तेरा ग़लत तू मेरा सही है
तेरे बिन ये ग़म हैकुछ सांसें कम हैंकी तुझको पाने से ज़्यादा खोयी खोयी जाएदिल रोयी जाए, रोयी जाए, रोयी जाएआँखों के किनारे बैठा रोयी जाएदिल रोयी जाए, रोयी जाए, रोयी जाएयादों के सहारे बैठा रोयी जा
तेरे बिना ज़िंदगी तो हैपर जीने से ऐतराज़ हैमाने हुवे हैं दो दिललेकिन तक़दीरें नाराज़ हैं
कहता है कहानीइश्क़ का ये पानीसब डूबे साहिल पे लेकिन कोई कोई आएदिल रोयी जाए, रोयी जाए, रोयी जाएआँखों के किनारे बैठा रोयी जाएदिल रोयी जाए, रोयी जाए, रोयी जाएयादों के सहारे बैठा रोयी जाएओ रोयी जाए ओ
तू नहीं हमकदम तो रास्ते बुरेतू नहीं तो नींद भी आँखों से है परेखामखां ही पड़ गयीं दरारें ख़्वाब मेंतेरे बिन तन्हाई सी धड़कनों में चलायें
तेरे बिन ये ग़म हैकुछ सांसें कम हैंकी तुझको पाने से ज़्यादा खोयी खोयी जाएदिल रोयी जाए, रोयी जाए, रोयी जाए।    
हे गाणे ऐकून मयंक अजूनच हर्ट झाला खरच सेम त्याची अवस्था या गाण्या सारखी झाली होती. त्याच ही दिल रोयी जाये असच झालं होत.   बराच वेळ तो खाली मान ठेवून बसला होता. रिया ला विसरणं त्याला अवघड होतं बिकॉज हि लव हर फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट.  रिया ही रागात घरी आली.

क्रमश...कसा वाटला हा भाग नक्की सांगा.माझ्या नावासहित इतरत्र कथा प्रसिद्ध करू शकतात..कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या आधीन आहेत..



Friday, October 1, 2021

है तुझे भी इजाजत (भाग 7)

​आर्वी मॅडम तर काय हिमांशू ला डेट करत आहेत. आणि तुझी गर्लफ्रेंड काय म्हणते रिया आर्वी ने विचारले. वुई बोथ आर व्हेरी हॅप्पी डियर. बिचारा मयंक आर्वी हसत म्हणाली. मग गप्पा मारत त्यांनी जेवण केले. सकाळी आर्वी ऑफिस ला आली . हिमांशू आता तिला कॉफी लंच ला आवर्जून बोलवू लागला . तिला खूप  छान वाटायचे. ते दोघे फोन वर सुद्धा बोलायचे चॅट करायचे. रात्री आर्वी जेवण करून अशीच फोन चेक करत बसली होती. तेव्हा हिमांशू चा कॉल आला हे बेबी व्हाट आर यु डुइंग ? काही नाही जस्ट जेवण झाले. ती म्हणाली. कॅन यु मिस मि..आय मिस यु अ लॉट डियर. तशी ती लाजत होती . येस आय अल्सो मिस यु . रियली ?हिमांशू ने विचारले. हो . मग तुझ्या रूम च्या विंडो मध्ये येऊन बघ जरा बाहेर. आर्वी विंडो पाशी आली. तिने पाहिले हिमांशू खाली रोडवर उभा होता त्याच्या कार ला टेकून आणि आर्वी ला त्याने खाली ये असा इशारा केला. आर्वी खुश झाली. तिने घरात सांगितले की बाहेर तिच्या मैत्रिणी आल्या आहेत आम्ही आईसक्रिम खाऊन येतो. ती पटकन आवरून खाली आली. सर तुम्ही या वेळेला इथे काय करताय.  तसे हिमांशू तिचा चेहरा आपल्या बोटांनी उचलून तिच्या डोळ्यात पहात म्हणाला मिस आर्वी  आय मिस यु सो आलो इथे.चल लॉंग ड्राइव्ह ला जाऊ. हा आर्वी बोलली. मग दोघे कार मधून निघाले हिमांशू ने तिला आवडते म्हणून एफ एम सुरू केले.. मस्त गाणं लागले होते..

सचियाँ मोहब्बतन निभावांगीहीरिये मैं तेरी कहलावांगीइक वारी दिल लग जाणे देदिल दा करार बण जावांगी
इल्तेजा दिल दी हैइक पहल इश्क़ की, होने दे
दिल जानिये मैनु जी लैण देदो लफ्ज़-ए-मोहब्बत कह लैण देदिल जानिये मैनु जी लैण देदो लफ्ज़-ए-मोहब्बत कह लैण दे
दिन रात तुझे मैं देखा करूँआँखों की यही बस चाहत है
दिन रात तुझे मैं देखा करूँआँखों की यही बस चाहत हैमैं क़ैद हूँ तेरी लक़ीरों मेंतेरे साथ ही मेरी क़िस्मत है
जीत की हार कीइक पहल प्यार की होने दे
दिल जानिये मैनु जी लैण देदो लफ्ज़-ए-मोहब्बत कह लैण देदिल जानिये मैनु जी लैण देदो लफ्ज़-ए-मोहब्बत कह लैण दे
मेरा रब तुझमें ही वसदा ऐदिल करता तेरी इबादत है
मेरा रब तुझमें ही वसदा ऐदिल करता तेरी इबादत हैनज़दीक़ है लेकिन कह ना सकेमुझको तेरी ही आदत है
बेवजह जीने कीहौले हौले से दिल खोने देदिल जानिये मैनु जी लै दो लफ्ज़-ए-मोहब्बत कह लैण दे
आर्वी हिमांशू कडे पहात हसत होती. तो ही तिला स्माईल देत होता. हे स्वप्न की सत्य हेच तिला समजेना. हिमांशू तिला लाईक करेल असे तिला स्वप्नात पण वाटले नव्हते. हिमांशू म्हणाला,आर्वी माझ्या सोबत फिरायला येशील ? कुठे सर  ? वूइ विल गो फॉर 2 डेज पिकनिक इन गोवा. मी घरी विचारून  सांगेन . ओके आर्वी. मग एका आईस्क्रीम शॉप जवळ हिमांशू ने कार थांबवली. आर्वी चल आईस्क्रीम घेऊ तो म्हणाला. ते दोघे आईस्क्रीम घेऊन तिथंच कार जवळ खात उभे राहिले. हिमांशू म्हणाला, आर्वी तुला काय वाटत व्हाट इज लव? म्हणजे काय सर? प्रेम म्हणजे नक्की काय अस तुला वाटत. माझ्या साठी प्रेम म्हणजे आपण ज्याच्या वर प्रेम करतो जो आपल्याला आवडतो त्याची काळजी घेणं,त्याला जपणं,त्याचे प्रॉब्लेम सोडवणं,त्याला समजून घेण. हेच प्रेम असत ना? आर्वी मी असा नाही विचार करत एखादी व्यक्ती  तुम्हाला फक्त आवडू पण शकते बट नॉट फॉर लाईफ लॉंग . तिच्या सोबत तुम्हाला वेळ घालवणं छान वाटतं,तीच हसन,बोलणं आवडत म्हणून तिच्या वर आपलं प्रेम आहे असा अर्थ नाही होत ना? म्हणजे सर तुम्हाला म्हणायचे आहे की प्रेम अस सहजासहजी होत नाही . मात्र एखादा आवडू शकतो पण त्याचा बद्दल प्रेम नाही वाटत असच ना? हो मी असच पाहतो प्रेमा कडे आणि आयुष्य आपलं आहे सो आपल्या टर्मस आणि कंडिशन वर मला जगायला आवडत. माय लाईफ माय रुल. हो सर मला ही असेच आवडते.  दोघे कार मध्ये बसले हिमांशू ने तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठाचे दीर्घ चुंबन घेतले .ती ही त्याला किस करू लागली .मग दोघ  घरी आले. आर्वी विचारात पडली की हिमांशू असा का बोलला प्रेमा बद्दल त्याला एक्झायटली काय सुचवाचे होते. खरच तो माझ्या वर प्रेम करत असेल का. पण तो बोलला ना मागेच की हि अल्सो  लाईक मी. मग मला असे फिरायला किंवा डेट वर का बोलवले असते त्याने. जाऊ दे नको जास्त विचार करायला तो असच बोलला असेल असा विचार करून आर्वी झोपून गेली.   आज नुपूर च्या शाळेत पालकांसाठी एक सेमीनार भरवले होते. एक नामवंत मानसोपचार स्पेशालिस्ट   डॉ.नम्रता बोरवणकर येणार होत्या. वयात येणाऱ्या मुली त्याचे प्रॉब्लेम,त्याचा     आहार,व्यायाम,हार्मोनलं चेंजेस,मूड स्विंगस या सर्व गोष्टी बद्दल त्या बोलनार होत्या सो संयु ऑफिस ला सुट्टी टाकून शाळेत नुपूर सोबत आली होती. डॉ नी खूप छान सगळ्या विषयावर माहिती दिली. पालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या म्हणाल्या जे काही कारणास्तव आज सिंगल पँरेंट्स  आहेत त्याना आपल्या पाल्याला मोठं करताना ,घडवताना  अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुलाच्या मनाचा विचार करून त्याला योग्य ते मार्गदर्शन करावे लागते. त्याच्या उजवल्ल भविष्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. या साठी स्वहता सक्षम असणे गरजेचे आहे. चांगले आचार विचार आणि संस्कार मुलां वर होणे गरजेचे आहे. मुलाचे पालक हेच मुलाचे आयडॉल असतात त्या नुसार आपले वर्तन असणे गरजेचे असते. असे डॉ. नम्रता बोलल्या. सेमिनार संपल्यावर संयु आणि   नुपूर  एका हॉटेलमध्ये नाष्टा करायला गेल्या असे पण दुपार झाली होती. त्या दोघींनी डोसा  ऑर्डर केला. ऑर्डर येईपर्यंत त्या दोघी बोलत बसल्या होत्या. इतक्यात कोणि तरी आवाज दिला हाय संयु तसे संयु ने मागे पाहिले तर चेतन तिच्या कडेच येत होता. चेतन त्यांच्या टेबल पाशी आला. संयु कशी आहेस? आणि नुपूर कडे पाहून म्हणाला,तू नुपूर आहेस हो ना? मी ठीक आहे चेतन आणि हा ही नुपूर माझी मुलगी. संयु ने नुपूर ला चेतन ची ओळख करून दिली हा माझा फ्रेन्ड चेतन. आज ऑफिस नाही का तुला संयु? नाही आज रजा टाकली हिच्या शाळेत कार्यक्रम होता. ओके मी ही एका मिटिंग ला आलो होतो,भूक लागली म्हणून आलो इथे. संयु त्याला म्हणाली,चेतन आमच्या सोबत च बस ना एकटा कुठे खातो. ओके नुपूर ला चालणार असेल तर. तो म्हणाला. नुपूर ठीक आहे बोलली. पण चेतन ला पाहून संयु चा खुललेला चेहरा नुपूर आब्झर्व करत होती. त्यांची ऑर्डर आली. चेतन ने पाव भाजी घेतली. खाताना ही दोघ एकमेकांकडे पहात हसत खात होते. हे सगळं नुपूर पहात होती अगदी बारीक लक्ष देऊन. हा माणूस आई चा फ्रेन्ड आहे की अजून कोणी असा ती विचार करत होती ..
क्रमश.....


है तुझे भी इजाजत (भाग 6)

​आय आल्सो लाइक यू चँबी गर्ल. तसे ती अजुनच लाजत होती पन तिला विश्वास बसत नव्हता की याला मि खरच आवडत असेन का? मग डिनर संपवून ते निघाले .आर्वी खुश होती . हिमांशु ने कार स्टार्ट करण्या आधी आर्वी ला म्हणाला, आर्वी आता तुझ्या बद्दल मि जे काही बोललो ते बाहेर कोनाला सांगू नकोस. नाही सर मि बाहेर यातल काहिच बोलणार नाही. गुड़ गर्ल म्हणत त्याने तिच्या चेहरया वर आलेले केस तिच्या काना मागे घेतले आणि तिच्या डोळ्यात पहात तिच्या ओठां वर आपले ओठ ठेवले खुप पँशीनेटली तो तिला किस करु लागला मग ति ही त्याला प्रतिसाद देवू लागली . बराच वेळ त्यांचे किसिंग सुरु होते मग थोड्या वेळाने तो बाजूला झाला. आर्वी यू आर सो स्वीट म्हणत त्याने सीट बेल्ट लावला आणि कार सुरु केली.तिच्या घरा जवळ तिला सोडून तो निघुन गेला. आर्वी हवेत तरंगत तरंगत घरी आली . अजुन ही ती त्याच्या स्पर्शात धूंद होती. कधी हे सगळ संयु रिया सौम्या ला सांगते असे तिला झाले. रात्री मग आपल्या फ्रेंडस ना तिने हे सगळ सांगितले. पण रिया म्हणाली आर्वी जर हिमांशु ही तुला लाइक करतो तर मग या बद्दल बाहेर काही बोलू नकोस असे का म्हणाला. अग उगाच लोकां मध्ये चर्चा नको म्हणुन म्हणाला असेल तो खुप श्रीमंत आहे त्याच स्टेटस आहे काहितरी म्हणून बोलला असेल. आर्वी त्याच स्टेटस आहे म्हणजे तुला कीमत नाही का. ?प्रेम करतो तर मग लपवतो का? जगा समोर तुला स्विकारायला त्याला लाज वाटते का? रिया अग असे काही असते तर त्याने मला आज डिनर ला इन्वाइट केले असते का? आर्वी मी जास्त काही नाही बोलत तू समंजस आहे सो बी केयरफूल इतकच सांगते. ओके रिया म्हणत आर्वी झोपायला गेली.सौम्या खूप डिस्टर्ब झाली होती प्रतीक असा वागेल याची तिला कल्पना नव्हती. प्रतीक चे खरंच प्रेम आहे आपल्यावर याच भ्रमात होती ती. पण ते सगळं दिखावा होता तो त्याच प्रेम सगळं खोट होत. ती खूप उदास झाली. दुसऱ्या दिवशी ऑफिस ला रजा टाकून ती आठ दिवसा साठी तिच्या गावी घरी आली तिला थोडा चेंज हवा होता प्रतीक पासून त्याच्या आठवणी पासून तिला दूर जायचे होते. गावी आली तर घरी सर्वाना आनंद झाला. निवांत राहिली तिथे. संध्याकाळी ती बाहेर पडली फिरायला गावातील गणपती मंदिराकडे जायला. वाटेत शेतात काम करणारे शेतकरी,लहान मुले बघून तिला छान वाटत होते किती कष्ट करतात हे शेतकरी दिवस रात्र पण कष्ट,दुःख याचा विचार न करता घाम गाळत राहतात. असा विचार तिच्या मनात आला. मंदीरात ती गेली दर्शन घेवून तिथे थोडा वेळ बसली. अरे सौम्या कधी आली तू घरी ? त्यांचाच गावातल्या काकू तिला विचारत होत्या. कालच आले,थोडा कंटाळा आला होता मग सुट्टी टाकून आले. काकू तुम्ही काका कसे आहात. आम्ही दोघ मजेत राहतो . एकुलता एक मुलगा फॉरेन ला नोकरी ला गेला आणि तिथेच लग्न करून सेटल झाला. पैसे पाठवतो दर महिन्याला. त्याला आमची काळजी वाटत नाही तर मग आम्ही पण आता त्याची वाट बघत नाही. कसलीच अपेक्षा नाही बघ. एकमेकांना सोबत करत राहतो . मुलगा असून नसल्या सारखाच! काकू बोलत होत्या पण त्या मागचं दुःख स्पष्ट त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. काकू तुम्ही जा ना तिकडे मग. नाही ग आपला गाव आपला देश सोडून नाही करमत आता या वयात. आणि कशाला दुःख करत बसायचं आजचा दिवस आपला म्हणत छान आनंदात जगायचं. त्याला वाटेल तर तो येईल परत भारतात. चल अंधार पडेल मी जाते . काकू गेल्या सौम्या विचार करत बसली. मुलगा इतका दूर आहे तरी काका काकू त्याच दुःख न मानता आनंदात जगत आहेत या  उतारवयात . आणि आपण नुसतं ब्रेकअप काय झालं तर डिप्रेस झालो. सौम्या ही घरा कडे निघाली. वाटेत तिला मंदा भेटली.  तिची शाळेतील मैत्रीण अग सौम्या तू कधी आली? कालच आले कशी आहेस तू? मी ठीक आहे . तुझं लग्न झाल्याचे समजले होते मंदा मग मिस्टर काय करतात कुठे असतात? मंदा म्हणाली,लग्न झालं आणि वर्षात मोडलं पण. का काय झालं? सौम्या हुंड्यासाठी मला सासरी खूप त्रास दिला छळ केला. मग आले ते घर सोडून त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली पण ते पैसे वाले लोक,पैशाच्या जोरावर सुटले ते. आता मी राहते आई वडीलां सोबत भाऊ आहे लहान. काम करते मी इथे पतसंस्थेत . गेला भूतकाळ विसरून छान जगते ग. आनंदी राहते. अशीच रहा मंदा आणि काही मदत् लागली तर सांग मला नक्की. हो सौम्या. सौम्या घरी आली मंदाच कौतुक वाटत होतं तिला. सासर चा त्रास छळ सहन करून आता स्वहताच्या पायावर उभी आहे . खरच आयुष्य एकदा मिळत ते कसं जगायचं आपणच ठरवायला हवं. कोणाच्या असण्या नसण्याने काही फरक नाही पडला पाहिजे शो मस्ट गो ऑन.असे वागले तरच आयुष्य सुंदर बनेल. सौम्या ला खूप हलके मोकळं वाटत होत. तिची उदासीनता कुठल्या कुठे गायब झाली. निवांत आठवडा भर गावी राहून ती परत पुण्याला आली. आज रविवार होता संयु रिया आर्वी सौम्या भेटणार होत्या खुप दिवस झाले त्या भेटल्या नव्हत्या. मस्त एका हॉटेल ला त्या जेवायला आल्या. रिया ने विचारले सौम्या अशी मधूनच का गावी गेली होतीस काही प्रोब्लेम ? नाही ग प्रॉब्लेम नाही पण प्रतीक ने ब्रेकअप केले . म्हणजे आर्वी बोलली. तसे सौम्या ने त्या दिवशी प्रतीक आणि तिच्या मध्ये काय काय बोलणे झाले ते सांगितले. मी खूप डीप्रेस झाले होते ग प्रतीक इज माय लाइफ पण त्याला माझ्या बद्दल काहीच फिलिंग नाही हे मला सहन नाही झाले. हॉऊ यु फील नाऊ सौम्या. संयु बोलली. आता मी मस्त आहे मी कोणासाठी रडत कुढत नाही बसणार माझं आयुष्य आहे मला हवं तसं जगणार.आणि प्रतीक ही डोन्ट डीझर्व मि. सो आय डोन्ट केयर. येस सौम्या तो तुझ्या लायक नाही रिया म्हणाली. संयु व्हाट अबाउट यु डियर  आर्वी म्हणाली. तशी संयु ब्लश करू लागली ओहह म्हणजे तुमची प्यार की  गाडी पुढे गेली म्हणायची. रिया म्हणाली. हा तसेच काही तरी संयु बोलली. आणि आर्वी मॅडम तर काय हिमांशू ला डेट करत आहेत. ...

क्रमश.....कसा वाटला हा भाग नक्की कमेंट करा..
 


हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...