Tuesday, October 12, 2021

है तुझे भी इजाजत(भाग 12 अंतिम)

आर्वी म्हणाली सर तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते तर तसे सांगायचे होते तुम्ही मला फसवलत तसे जान्हवी ला ही फसवलत. आर्वी मी कोणालाही फसवले नाही . जान्हवी आणि मी लहानपणापासून एकत्र मोठे झालो आमचे घरचे रिलेशन आहे. आणि तुला फसवले म्हणतेस तर मला सांग मी तुला कधीतरी लव यु बोललो का ? म्हणजे सर तुम्ही मला लाईक करत होता ते काय होत? आर्वी लाईक अँड लव आर टू डिफ्रंनट वर्ड्स अँड बोथ आर डिफ्रंनट मिनींग . तू गफलत करतेस आवडणे आणि प्रेम असणे या वेगवेगळ्या भावना आहेत. पण सर मी तर हे प्रेमच समजत होते. आर्वी मी तुला गोव्याला हेच बोललो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तिचा सहवास आवडतो म्हणजेच त्या व्यक्ती वर आपले प्रेम आहे अस होत नाही बस्स आवडते कोणीतरी दयाट्स इट. तेव्हा तू ही म्हणाली हो सर मला पण असच वाटत मग मला वाटले तू ही मला लाईक करतेस सो काय हरकत आहे थोडा वेळ एकत्र घालवू एन्जॉय करू त्यात इतकं मनाला का लावून घेतेस? मी आज ही तुला लाईक करतो. बास सर आता एंगेजमेंट झालीय तुमची आणि अस बोलता तुम्ही? आर्वी कुठल्या मेंटयालिटी मध्ये जगतेस तू आज चा काळ जमाना असाच आहे मस्त रहा एंजॉय करा उगाच इमोशनल फुल होऊन काही ही मिळत नाही आयुष्यात. मला सांग तू माझ्या सोबत जो वेळ घालवलास तो कायम तुझ्या आठवणीत राहील ना तुला ही आनंद मिळाला ना मग झाले तर कशाला इतका विचार करतेस? आणि मी तुला कुठल्याच गोष्टीला जबरदस्ती केली नाही आपण फिजिकली एकत्र आलो ते ही तुझ्या मर्जीने. सर तुमच्या हाई प्रोफाईल सोसायटीमध्ये हे अस चालत असेल आम्ही नाही आहोत इतके मॉडर्न आम्ही खर प्रेम करतो मनापासून जीव लावतो तुम्हाला नाही समजणार ते. आर्वी तुला माझ्याशी संबंध ठेवायचा तर ठेव आय डोन्ट माईंड पण हे चिट केले वगैरे बोलू नकोस. नो सर मी इतकी ही चिप नाही आहे. मला माझा स्वाभिमान विकून नाही जगता येणार. हा घ्या माझा राजीनामा . आणि आर्वी तिथून बाहेर पडली. तिला फसवल्याच दुःख होतच पण टाळी एका हाताने वाजत नाही हे ती ही जाणून होती. या गोष्ट ला ती ही जबाबदार होतीच,  विचार  न करता हिमांशू ला भुलून ती वाहवत गेली. ती घरी आली आणि संयु रिया सौम्या ला संध्याकाळी त्याच्या नेहमीच्या ठिकाणी या म्हणाली तिचा आवाज ही अगदी लो फील करत होता .मला तुमची गरज आहे अस बोलली. इकडे या तिघींना टेंशन आले की काय झाले आर्वी ला . फोन वर बोलताना पण डिस्टर्ब वाटत होती. संध्याकाळी सगळ्या जमल्या त्यांना बघुनच आर्वी त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. आर्वी काय झाले अशी रडतेस का सांग ना रिया बोलली. रिया  हिमांशू चिटेड मि काल त्याने त्याच्या मैत्रीण सोबत एंगेजमेंट केली. व्हॉट ? तिघी एकदम ओरडल्या . हो मी काल बर्थ डे पार्टीला गेले तेव्हा त्याची एंगेजमेंट ची अनौसमेंट केली अचानक आणि झाली त्याची एंगेजमेंट जान्हवी म्हणून आहे तिच्या सोबत. मग त्याने तुला का डेट केले संयु बोलली. त्याला वाटले मी त्याला लाईक करते म्हणजे फक्त लाइकच असेल प्रेम वगैरे नाही. आणि तो सुद्धा फक्त मला लाइक करायचा नॉट लव. हे दोन वेगवेगळे वर्ड्स आहेत म्हणे त्याचा मिनींग पण वेगळा होता. तुला आनंद वाटत होता माझा सहवास आवडत होता म्हणून मी पण एन्जॉय केले दयाटस इट. ओहह आर्वी तू त्याला कधी बोलली नाहीस का की तुझे प्रेम आहे त्याचावर? सौम्या म्हणाली.नाही ग मला वाटले तो मला रिस्पॉन्स देतो म्हणजे मी ही त्याला आवडत असणार ना! ओके आर्वी जे झालं ते झालं ही श्रीमंत मूल अशीच असतात ग त्यांना प्रेम वगैरे खेळ वाटतो त्यांना फक्त टाईमपास करायचा असतो आणि आपण त्यांच्या दिसण्याला,बोलण्याला भुलून जातो. सोडून दे हा विषय आताच इथे तूच मला बोलली होतीस ना की आयुष्यात प्रोब्लेम ,दुःख येणारच म्हणून आपण जगणं नाही सोडायच . त्यावर मात करत जगायचं हो ना . आता एकदाच रडून घे मनसोक्त आर्वी नंतर या डोळ्यातुन एक ही अश्रू वाया घालवू नकोस. तुझ्या साठी कोणीतरी असेलच ना जो तुझे हे अश्रू आपल्या ओजळीत जपून ठेवेल . मग हास बघू आता छान पैकी  . असे म्हणत रिया ने तिचे डोळे पुसले. आम्ही आहोत ना ग सोबत संयु सौम्या म्हणाल्या. हो आय लव यु डियर म्हणत आर्वी ने तिघींना मिठी मारली. चोघींनी एकमेकींचे हात एकत्र ठेवले आणि रिया म्हणाली,देयर इज ओन्ली वन बेस्ट शिप मग बाकीच्या म्हणाल्या येस दयाट इज आवर फ्रेंडशिप..थ्री चियर्स फॉर आवर फ्रेन्डशिप हिप हिप हुर्ररे..असे मोठ्याने ओरडल्या. हे आयुष्य आपलं आहे आणि ते कसे जगायचं ते आपणच ठरवायचं ,दुःख,अपमान,सगळं बाजूला ठेवून आनंदात जगायचं . कोणाचा विचार नाही करायचा . स्वतःता साठी जगायचे रिया म्हणाली. हो रिया यु आर राईट सौम्या म्हणाली. मग तिघी निघाल्या आर्वी च्या कार मधून मूड चेंज करायला संयु ने एफ एम सुरू केले मस्त गाणं लागले होते.....
  इन दिनों, दिल मेरा, मुझसे है कह रहा
तू ख्व़ाब सजा, तू जी ले ज़रा
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मुहब्बत

बेरंग सी है बड़ी ज़िन्दगी कुछ रंग तो भरूँ
मैं अपनी तनहाई के वास्ते अब कुछ तो करूँ
जब मिले थोड़ी फुर्सत, मुझसे कर ले मुहब्बत
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मुहब्बत

उसको छुपाकर मैं सबसे कभी ले चलूँ कहीं दूर
आँखों के प्यालों से पीता रहूँ उसके चेहरे का नूर
इस ज़माने से छुपकर, पूरी कर लूँ मैं हसरत
है तुझे भी इजाज़त, कर ले तू भी मुहब्बत

जणू त्या चोघी साठीच हे सॉंग लागले होते त्या ही मग मोठ्याने गाणं म्हणू लागल्या ,तू ख्वाब सजा, तू जी ले जरा है तुझे भी इजाजत.................

या चार मैत्रिणीची कथा आणि व्यथा मी या  कथे मधून मांडण्याचा प्रयत्न केला. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.  मला हेच सांगायचे आहे की जसे मी सुरवातीला हे वाक्य टाकले की  "We all have our own sorrows,but it doesn't mean we just cry over them and forget to enjoy life ..!!" ...  म्हणजेच आयुष्यात दुःख असणारच आहे याचा अर्थ असा नाही होत की आपण त्या दुःखावर रडत बसायचं आणि आयुष्य जगणंच सोडून द्यायच. आयुष्य एकदाच मिळते ते आनंदानं हसत जगायच ... म्हणूनच माझ्या कथेचे शीर्षक ही मला साजेसे वाटते ...है तुझे भी इजाजत...!!  शेवटी एकच सांगावेसे   
 वाटते ....."हजारों उलझने राहों में, 🤔 और कोशिशे बेहिसाब,
इसी का नाम है जिंदगी, चलते🚶रहिए जनाब।

समाप्त.....माझ्या या कथेला तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.. माझ्या इतर ही कथा वाचा शेयर करा. माझ्या नावासहित प्रसिध्द करू शकता. कथेचे सर्व हक्क लेखिकेच्या आधीन आहेत . साहित्य चोरी हा गुन्हा आहे. कथा कशी वाटली नक्की सांगा... पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद 💐💐



No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...