Friday, October 1, 2021

है तुझे भी इजाजत (भाग 7)

​आर्वी मॅडम तर काय हिमांशू ला डेट करत आहेत. आणि तुझी गर्लफ्रेंड काय म्हणते रिया आर्वी ने विचारले. वुई बोथ आर व्हेरी हॅप्पी डियर. बिचारा मयंक आर्वी हसत म्हणाली. मग गप्पा मारत त्यांनी जेवण केले. सकाळी आर्वी ऑफिस ला आली . हिमांशू आता तिला कॉफी लंच ला आवर्जून बोलवू लागला . तिला खूप  छान वाटायचे. ते दोघे फोन वर सुद्धा बोलायचे चॅट करायचे. रात्री आर्वी जेवण करून अशीच फोन चेक करत बसली होती. तेव्हा हिमांशू चा कॉल आला हे बेबी व्हाट आर यु डुइंग ? काही नाही जस्ट जेवण झाले. ती म्हणाली. कॅन यु मिस मि..आय मिस यु अ लॉट डियर. तशी ती लाजत होती . येस आय अल्सो मिस यु . रियली ?हिमांशू ने विचारले. हो . मग तुझ्या रूम च्या विंडो मध्ये येऊन बघ जरा बाहेर. आर्वी विंडो पाशी आली. तिने पाहिले हिमांशू खाली रोडवर उभा होता त्याच्या कार ला टेकून आणि आर्वी ला त्याने खाली ये असा इशारा केला. आर्वी खुश झाली. तिने घरात सांगितले की बाहेर तिच्या मैत्रिणी आल्या आहेत आम्ही आईसक्रिम खाऊन येतो. ती पटकन आवरून खाली आली. सर तुम्ही या वेळेला इथे काय करताय.  तसे हिमांशू तिचा चेहरा आपल्या बोटांनी उचलून तिच्या डोळ्यात पहात म्हणाला मिस आर्वी  आय मिस यु सो आलो इथे.चल लॉंग ड्राइव्ह ला जाऊ. हा आर्वी बोलली. मग दोघे कार मधून निघाले हिमांशू ने तिला आवडते म्हणून एफ एम सुरू केले.. मस्त गाणं लागले होते..

सचियाँ मोहब्बतन निभावांगीहीरिये मैं तेरी कहलावांगीइक वारी दिल लग जाणे देदिल दा करार बण जावांगी
इल्तेजा दिल दी हैइक पहल इश्क़ की, होने दे
दिल जानिये मैनु जी लैण देदो लफ्ज़-ए-मोहब्बत कह लैण देदिल जानिये मैनु जी लैण देदो लफ्ज़-ए-मोहब्बत कह लैण दे
दिन रात तुझे मैं देखा करूँआँखों की यही बस चाहत है
दिन रात तुझे मैं देखा करूँआँखों की यही बस चाहत हैमैं क़ैद हूँ तेरी लक़ीरों मेंतेरे साथ ही मेरी क़िस्मत है
जीत की हार कीइक पहल प्यार की होने दे
दिल जानिये मैनु जी लैण देदो लफ्ज़-ए-मोहब्बत कह लैण देदिल जानिये मैनु जी लैण देदो लफ्ज़-ए-मोहब्बत कह लैण दे
मेरा रब तुझमें ही वसदा ऐदिल करता तेरी इबादत है
मेरा रब तुझमें ही वसदा ऐदिल करता तेरी इबादत हैनज़दीक़ है लेकिन कह ना सकेमुझको तेरी ही आदत है
बेवजह जीने कीहौले हौले से दिल खोने देदिल जानिये मैनु जी लै दो लफ्ज़-ए-मोहब्बत कह लैण दे
आर्वी हिमांशू कडे पहात हसत होती. तो ही तिला स्माईल देत होता. हे स्वप्न की सत्य हेच तिला समजेना. हिमांशू तिला लाईक करेल असे तिला स्वप्नात पण वाटले नव्हते. हिमांशू म्हणाला,आर्वी माझ्या सोबत फिरायला येशील ? कुठे सर  ? वूइ विल गो फॉर 2 डेज पिकनिक इन गोवा. मी घरी विचारून  सांगेन . ओके आर्वी. मग एका आईस्क्रीम शॉप जवळ हिमांशू ने कार थांबवली. आर्वी चल आईस्क्रीम घेऊ तो म्हणाला. ते दोघे आईस्क्रीम घेऊन तिथंच कार जवळ खात उभे राहिले. हिमांशू म्हणाला, आर्वी तुला काय वाटत व्हाट इज लव? म्हणजे काय सर? प्रेम म्हणजे नक्की काय अस तुला वाटत. माझ्या साठी प्रेम म्हणजे आपण ज्याच्या वर प्रेम करतो जो आपल्याला आवडतो त्याची काळजी घेणं,त्याला जपणं,त्याचे प्रॉब्लेम सोडवणं,त्याला समजून घेण. हेच प्रेम असत ना? आर्वी मी असा नाही विचार करत एखादी व्यक्ती  तुम्हाला फक्त आवडू पण शकते बट नॉट फॉर लाईफ लॉंग . तिच्या सोबत तुम्हाला वेळ घालवणं छान वाटतं,तीच हसन,बोलणं आवडत म्हणून तिच्या वर आपलं प्रेम आहे असा अर्थ नाही होत ना? म्हणजे सर तुम्हाला म्हणायचे आहे की प्रेम अस सहजासहजी होत नाही . मात्र एखादा आवडू शकतो पण त्याचा बद्दल प्रेम नाही वाटत असच ना? हो मी असच पाहतो प्रेमा कडे आणि आयुष्य आपलं आहे सो आपल्या टर्मस आणि कंडिशन वर मला जगायला आवडत. माय लाईफ माय रुल. हो सर मला ही असेच आवडते.  दोघे कार मध्ये बसले हिमांशू ने तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठाचे दीर्घ चुंबन घेतले .ती ही त्याला किस करू लागली .मग दोघ  घरी आले. आर्वी विचारात पडली की हिमांशू असा का बोलला प्रेमा बद्दल त्याला एक्झायटली काय सुचवाचे होते. खरच तो माझ्या वर प्रेम करत असेल का. पण तो बोलला ना मागेच की हि अल्सो  लाईक मी. मग मला असे फिरायला किंवा डेट वर का बोलवले असते त्याने. जाऊ दे नको जास्त विचार करायला तो असच बोलला असेल असा विचार करून आर्वी झोपून गेली.   आज नुपूर च्या शाळेत पालकांसाठी एक सेमीनार भरवले होते. एक नामवंत मानसोपचार स्पेशालिस्ट   डॉ.नम्रता बोरवणकर येणार होत्या. वयात येणाऱ्या मुली त्याचे प्रॉब्लेम,त्याचा     आहार,व्यायाम,हार्मोनलं चेंजेस,मूड स्विंगस या सर्व गोष्टी बद्दल त्या बोलनार होत्या सो संयु ऑफिस ला सुट्टी टाकून शाळेत नुपूर सोबत आली होती. डॉ नी खूप छान सगळ्या विषयावर माहिती दिली. पालकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या म्हणाल्या जे काही कारणास्तव आज सिंगल पँरेंट्स  आहेत त्याना आपल्या पाल्याला मोठं करताना ,घडवताना  अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मुलाच्या मनाचा विचार करून त्याला योग्य ते मार्गदर्शन करावे लागते. त्याच्या उजवल्ल भविष्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. या साठी स्वहता सक्षम असणे गरजेचे आहे. चांगले आचार विचार आणि संस्कार मुलां वर होणे गरजेचे आहे. मुलाचे पालक हेच मुलाचे आयडॉल असतात त्या नुसार आपले वर्तन असणे गरजेचे असते. असे डॉ. नम्रता बोलल्या. सेमिनार संपल्यावर संयु आणि   नुपूर  एका हॉटेलमध्ये नाष्टा करायला गेल्या असे पण दुपार झाली होती. त्या दोघींनी डोसा  ऑर्डर केला. ऑर्डर येईपर्यंत त्या दोघी बोलत बसल्या होत्या. इतक्यात कोणि तरी आवाज दिला हाय संयु तसे संयु ने मागे पाहिले तर चेतन तिच्या कडेच येत होता. चेतन त्यांच्या टेबल पाशी आला. संयु कशी आहेस? आणि नुपूर कडे पाहून म्हणाला,तू नुपूर आहेस हो ना? मी ठीक आहे चेतन आणि हा ही नुपूर माझी मुलगी. संयु ने नुपूर ला चेतन ची ओळख करून दिली हा माझा फ्रेन्ड चेतन. आज ऑफिस नाही का तुला संयु? नाही आज रजा टाकली हिच्या शाळेत कार्यक्रम होता. ओके मी ही एका मिटिंग ला आलो होतो,भूक लागली म्हणून आलो इथे. संयु त्याला म्हणाली,चेतन आमच्या सोबत च बस ना एकटा कुठे खातो. ओके नुपूर ला चालणार असेल तर. तो म्हणाला. नुपूर ठीक आहे बोलली. पण चेतन ला पाहून संयु चा खुललेला चेहरा नुपूर आब्झर्व करत होती. त्यांची ऑर्डर आली. चेतन ने पाव भाजी घेतली. खाताना ही दोघ एकमेकांकडे पहात हसत खात होते. हे सगळं नुपूर पहात होती अगदी बारीक लक्ष देऊन. हा माणूस आई चा फ्रेन्ड आहे की अजून कोणी असा ती विचार करत होती ..
क्रमश.....


No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...