Friday, October 1, 2021

है तुझे भी इजाजत (भाग 6)

​आय आल्सो लाइक यू चँबी गर्ल. तसे ती अजुनच लाजत होती पन तिला विश्वास बसत नव्हता की याला मि खरच आवडत असेन का? मग डिनर संपवून ते निघाले .आर्वी खुश होती . हिमांशु ने कार स्टार्ट करण्या आधी आर्वी ला म्हणाला, आर्वी आता तुझ्या बद्दल मि जे काही बोललो ते बाहेर कोनाला सांगू नकोस. नाही सर मि बाहेर यातल काहिच बोलणार नाही. गुड़ गर्ल म्हणत त्याने तिच्या चेहरया वर आलेले केस तिच्या काना मागे घेतले आणि तिच्या डोळ्यात पहात तिच्या ओठां वर आपले ओठ ठेवले खुप पँशीनेटली तो तिला किस करु लागला मग ति ही त्याला प्रतिसाद देवू लागली . बराच वेळ त्यांचे किसिंग सुरु होते मग थोड्या वेळाने तो बाजूला झाला. आर्वी यू आर सो स्वीट म्हणत त्याने सीट बेल्ट लावला आणि कार सुरु केली.तिच्या घरा जवळ तिला सोडून तो निघुन गेला. आर्वी हवेत तरंगत तरंगत घरी आली . अजुन ही ती त्याच्या स्पर्शात धूंद होती. कधी हे सगळ संयु रिया सौम्या ला सांगते असे तिला झाले. रात्री मग आपल्या फ्रेंडस ना तिने हे सगळ सांगितले. पण रिया म्हणाली आर्वी जर हिमांशु ही तुला लाइक करतो तर मग या बद्दल बाहेर काही बोलू नकोस असे का म्हणाला. अग उगाच लोकां मध्ये चर्चा नको म्हणुन म्हणाला असेल तो खुप श्रीमंत आहे त्याच स्टेटस आहे काहितरी म्हणून बोलला असेल. आर्वी त्याच स्टेटस आहे म्हणजे तुला कीमत नाही का. ?प्रेम करतो तर मग लपवतो का? जगा समोर तुला स्विकारायला त्याला लाज वाटते का? रिया अग असे काही असते तर त्याने मला आज डिनर ला इन्वाइट केले असते का? आर्वी मी जास्त काही नाही बोलत तू समंजस आहे सो बी केयरफूल इतकच सांगते. ओके रिया म्हणत आर्वी झोपायला गेली.सौम्या खूप डिस्टर्ब झाली होती प्रतीक असा वागेल याची तिला कल्पना नव्हती. प्रतीक चे खरंच प्रेम आहे आपल्यावर याच भ्रमात होती ती. पण ते सगळं दिखावा होता तो त्याच प्रेम सगळं खोट होत. ती खूप उदास झाली. दुसऱ्या दिवशी ऑफिस ला रजा टाकून ती आठ दिवसा साठी तिच्या गावी घरी आली तिला थोडा चेंज हवा होता प्रतीक पासून त्याच्या आठवणी पासून तिला दूर जायचे होते. गावी आली तर घरी सर्वाना आनंद झाला. निवांत राहिली तिथे. संध्याकाळी ती बाहेर पडली फिरायला गावातील गणपती मंदिराकडे जायला. वाटेत शेतात काम करणारे शेतकरी,लहान मुले बघून तिला छान वाटत होते किती कष्ट करतात हे शेतकरी दिवस रात्र पण कष्ट,दुःख याचा विचार न करता घाम गाळत राहतात. असा विचार तिच्या मनात आला. मंदीरात ती गेली दर्शन घेवून तिथे थोडा वेळ बसली. अरे सौम्या कधी आली तू घरी ? त्यांचाच गावातल्या काकू तिला विचारत होत्या. कालच आले,थोडा कंटाळा आला होता मग सुट्टी टाकून आले. काकू तुम्ही काका कसे आहात. आम्ही दोघ मजेत राहतो . एकुलता एक मुलगा फॉरेन ला नोकरी ला गेला आणि तिथेच लग्न करून सेटल झाला. पैसे पाठवतो दर महिन्याला. त्याला आमची काळजी वाटत नाही तर मग आम्ही पण आता त्याची वाट बघत नाही. कसलीच अपेक्षा नाही बघ. एकमेकांना सोबत करत राहतो . मुलगा असून नसल्या सारखाच! काकू बोलत होत्या पण त्या मागचं दुःख स्पष्ट त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. काकू तुम्ही जा ना तिकडे मग. नाही ग आपला गाव आपला देश सोडून नाही करमत आता या वयात. आणि कशाला दुःख करत बसायचं आजचा दिवस आपला म्हणत छान आनंदात जगायचं. त्याला वाटेल तर तो येईल परत भारतात. चल अंधार पडेल मी जाते . काकू गेल्या सौम्या विचार करत बसली. मुलगा इतका दूर आहे तरी काका काकू त्याच दुःख न मानता आनंदात जगत आहेत या  उतारवयात . आणि आपण नुसतं ब्रेकअप काय झालं तर डिप्रेस झालो. सौम्या ही घरा कडे निघाली. वाटेत तिला मंदा भेटली.  तिची शाळेतील मैत्रीण अग सौम्या तू कधी आली? कालच आले कशी आहेस तू? मी ठीक आहे . तुझं लग्न झाल्याचे समजले होते मंदा मग मिस्टर काय करतात कुठे असतात? मंदा म्हणाली,लग्न झालं आणि वर्षात मोडलं पण. का काय झालं? सौम्या हुंड्यासाठी मला सासरी खूप त्रास दिला छळ केला. मग आले ते घर सोडून त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली पण ते पैसे वाले लोक,पैशाच्या जोरावर सुटले ते. आता मी राहते आई वडीलां सोबत भाऊ आहे लहान. काम करते मी इथे पतसंस्थेत . गेला भूतकाळ विसरून छान जगते ग. आनंदी राहते. अशीच रहा मंदा आणि काही मदत् लागली तर सांग मला नक्की. हो सौम्या. सौम्या घरी आली मंदाच कौतुक वाटत होतं तिला. सासर चा त्रास छळ सहन करून आता स्वहताच्या पायावर उभी आहे . खरच आयुष्य एकदा मिळत ते कसं जगायचं आपणच ठरवायला हवं. कोणाच्या असण्या नसण्याने काही फरक नाही पडला पाहिजे शो मस्ट गो ऑन.असे वागले तरच आयुष्य सुंदर बनेल. सौम्या ला खूप हलके मोकळं वाटत होत. तिची उदासीनता कुठल्या कुठे गायब झाली. निवांत आठवडा भर गावी राहून ती परत पुण्याला आली. आज रविवार होता संयु रिया आर्वी सौम्या भेटणार होत्या खुप दिवस झाले त्या भेटल्या नव्हत्या. मस्त एका हॉटेल ला त्या जेवायला आल्या. रिया ने विचारले सौम्या अशी मधूनच का गावी गेली होतीस काही प्रोब्लेम ? नाही ग प्रॉब्लेम नाही पण प्रतीक ने ब्रेकअप केले . म्हणजे आर्वी बोलली. तसे सौम्या ने त्या दिवशी प्रतीक आणि तिच्या मध्ये काय काय बोलणे झाले ते सांगितले. मी खूप डीप्रेस झाले होते ग प्रतीक इज माय लाइफ पण त्याला माझ्या बद्दल काहीच फिलिंग नाही हे मला सहन नाही झाले. हॉऊ यु फील नाऊ सौम्या. संयु बोलली. आता मी मस्त आहे मी कोणासाठी रडत कुढत नाही बसणार माझं आयुष्य आहे मला हवं तसं जगणार.आणि प्रतीक ही डोन्ट डीझर्व मि. सो आय डोन्ट केयर. येस सौम्या तो तुझ्या लायक नाही रिया म्हणाली. संयु व्हाट अबाउट यु डियर  आर्वी म्हणाली. तशी संयु ब्लश करू लागली ओहह म्हणजे तुमची प्यार की  गाडी पुढे गेली म्हणायची. रिया म्हणाली. हा तसेच काही तरी संयु बोलली. आणि आर्वी मॅडम तर काय हिमांशू ला डेट करत आहेत. ...

क्रमश.....कसा वाटला हा भाग नक्की कमेंट करा..
 


No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...