Tuesday, October 12, 2021

है तुझे भी इजाजत (भाग 11)

चेतन थोडा तरी हर्ट झाला हे तिने ओळखले होते पण तो समंजस आहे मला सांभाळून घेईल इतका विश्वास त्याच्या बद्दल तिला नक्कीच होता हो आणि चेतन होताच तसा केयरिंग अँड अँडरस्टँडिंग!
  आज हिमांशू चा वाढदिवस होता. आर्वी ने त्याला आदल्या रात्रीच 12 ला विश केले होते. त्याला घेतलेले गिफ्ट घेऊन ती ऑफिस ला आली. आल्या आल्याच ती त्याच्या केबिन कडे गेली. मे आय कम इन सर. येस आर्वी कम इन म्हणत हिमांशू ने तीला बसायला सांगितले. तिने त्याला शेकहॅण्ड करत पुन्हा एकदा बर्थडे विश केले. त्याला गिफ्ट दिले . ओहह आर्वी हे कशाला आनलेस गिफ्ट वैगरे. असू दे सर म्हणत आर्वी ने त्याला विचारले आवडले का सर गिफ्ट? या इट्स नाइस डियर  बट यु आर द मोस्ट प्रेशियस गिफ्ट फॉर मि. तशी आर्वी त्याच्या कडे पाहून हसत होती. आर्वी आज रात्री माझ्या बर्थडे ची पार्टी आहे तू नक्की ये तसे ही मी सगळ्या स्टाफ ला आता सांगणारच आहे. ओके सर म्हणत आर्वी त्याच्या केबिन मधून बाहेर आली. संध्याकाळी पार्टी ला काय घालावे तिला समजेना खूप मोठी मोठी लोक आसणार तिथे उगाच आपण विचित्र दिसायला नको त्यात आपण असे फॅटी फॅटी . काय घालावे असा विचार करत आर्वी ने एक लॉंग स्कर्ट निवडला आणि त्यावर छानसा असा टॉप घालायचा असे तिने ठरवले. छान मेकअप करून आर्वी तयार झाली. हॉटेल जे डब्लू मॅरियेट मध्ये हिमांशू ने पार्टी ठेवली होती. ती तिची कार घेऊन गेली . इतक्या मोठ्या हॉटेल ला ती फर्स्ट टाइम आली होती सो थोडी गोंधळली होती. हॉटेल मध्ये गेल्यावर तिला तिथल्या रिसेप्शनने विचारले की हिमांशू आरोरा यांच्या पार्टी साठी आला आहात का? हो मॅम ती बोलली. तुम्ही लिफ्ट ने टेरेस वर जा तिथे पार्टी ऑर्गनाइज केली आहे. ओके म्हणत आर्वी लिफ्ट ने टेरेस वर आली ते मस्त हॉटेल चे रुफ टेरेस होते. खुप छान लाईटस ने सगळं डेकोरेशन केले होते. समोर मोठा स्टेज होता. तिथे मोठ्या अक्षरात हॅप्पी बर्थडे हिमांशू असे लिहिले होते. रेड आणि व्हाईट कलरचे बलून वॉल वर लावले होते. त्या बलून च्या मधून लाईटस सोडल्या होत्या . आर्वी ने पाहिले एका बाजूला तिचा सगळा ऑफिस स्टाफ बसला होता,तिथे ती गेली. त्यांना सँनक्स आणि ड्रिंक देण्यात आले.हिमांशू कुठे दिसत नव्हता. आर्वी आणि त्याचा बद्दल कोणाला बोलू नको असे हिमांशू ने तिला सांगितले होते म्हणून ती कोणाला विचारू पण शकत नवहती तरी तिने फक्त बाकीच्याना विचारले सर कुठे दिसत नाहीत. एक कलीग म्हनाली,अजून सर काही आले नाहीत ,आम्हाला पण नाही दिसले. थोड्याच वेळात हिमांशू आला मस्त त्याने थ्री पीस ब्लेझर घातला होता खूप स्मार्ट दिसत होता. त्याच्या सोबत एक सुंदर नाजूक दिसणारी  मुलगी होती . आर्वी ला वाटले असेल त्याची बहिन वगैरे. मग एक मोठा केक आणला तिथे आणि हिमांशू ला कट करायला लावला. सगळ्यानी टाळया वाजवून बर्थडे विश केले. हिमांशू ने  केक कापला. आणि त्या मुलीला केक भरवला तिने ही त्याला केक भरवला. स्टेजवर एक जण आला त्याच्या हातात माईक होता तो म्हणाला,तुम्हा सगळ्याना आज  हिमांशू च्या बर्थ डे पार्टी ला आमंत्रण करण्या मागे अजून एक खास कारण आहे ते म्हणजे आज हिमांशू आणि त्याची बाल मैत्रीण जान्हवी शहा यांची एंगेजमेन्ट सुध्दा आहे हे तुम्हा सर्वांना स्पेशल सुरप्राइज होते सो हिमांशू अँड जान्हवी लेट्स स्टार्ट द एंगेजमेंट सेरेमनी आणि सगळ्यानी टाळया वाजवत त्यांना ग्रीट केले. आर्वी ला समजेना हे काय चाललय. हिमांशू चा साखरपुडा ? तिच्या पाया खालची जमीन सरकली. समोर हिमांशू आणि जान्हवी एकमेकांना रिंग घालत होते आणि आर्वीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वहात होत्या तिला तिथे थांबने आता अशक्य झाले. ती तिथून बाहेर पडली. रडत रडतच ती कार ड्राईव्ह करत घरी आली. हिमांशू ने तिला फसवले होते ,तिचा फक्त वापर केला होता त्याने . तो काही तिच्या वर प्रेम करत नवहता तर त्या जान्हवी वर प्रेम करत होता मग आर्वी ला गोवयाला का घेवून गेला फक्त तिचा उपभोग घ्यायला? आर्वीच डोकं विचार करून करून बधिर होऊ लागले. खूप रडली ती तिच्या डोळ्यासमोर त्याची एगेजमेन्ट दिसत होती. काही सुचत न्हवते तिला.व्हाय यु चिट मि हिमांशू व्हाय असे ती बडबडत होती. रडत रडत तिला झोप लागून गेली. सकाळी ती उठली कालचा प्रसंग पुन्हा आठवू लागला तसे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. खूप हर्ट झाली होती ती . हिमांशू वर डोळे झाकून प्रेम केले विश्वास ठेवला त्याची ही अशी शिक्षा ? याच विचारात ती तयार झाली ऑफिस ला आली. रडून रडून डोळे सुजले होते डोकं जाम झाले होते. ऑफिस मध्ये तिने सांगितले की तब्येत ठीक नाही म्हणून. हिमांशू अजून आला नवहता ऑफिस ला. ती वाट बघत बसली. 10 मिनींटात तो आला. आर्वी त्याच्या केबिन मध्ये न परवानगी घेता गेली. आर्वी अरे ये ये गुड मॉर्निंग हिमांशू म्हणाला. पण ती काहिच बोलली नाही. काल तू पार्टी ला आली नाहीस का? हा आले होते सर खूप छान सरप्राईज दिले तुम्ही मला. आर्वी तू बस आणि मग बोल काय सरप्राईज? आर्वी म्हणाली सर तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते तर तसे सांगायचे होते तुम्ही मला फसवलत तसे जान्हवी ला ही फसवलत. आर्वी मी कोणालाही फसवले नाही . 

क्रमश .....



No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...