Posts

Showing posts from January 12, 2020

स्पेस मूळे हरवतोय नात्यांचा श्वास

स्पेस मुळे हरवतोय नात्याचा श्वास,,        आजकाल उच्च शिक्षणा मुळे आर्थिक स्वातंत्र्या मुळे मुले आणि मुली यांच्या लग्ना बाबत आणि जोड़ीदारा बाबत च्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत,एकमेकांना त्यांच्या गुणदोषा सकट स्वीकारने किवा कोणा एका साठी तडजोड़ करने हे यांना पटत नाही.प्रेम विवाह असो किवा ठरवून केलेला विवाह असो,मूल मुलीं एकमेकांना लग्ना आधी भेटतात्,बोलतात,,त्यामुळे स्वभाव कसे आहेत हे समजते तरी देखील लग्ना नंतर मि का तडजोड़ करू? असा प्रश्न असतोच,मि आहे अशी आहे किवा मि आहे असा आहे यात बदल नाही होणार हाच दोघांन् मधील वादा चा मुद्दा असतो,मला माझी स्पेस हवी जशी लग्ना आधी होती हा मुलीं चा जास्त हट्ट असतो,पन लग्नानंतर काही जबाबदारी,कर्त्तव्य,पार पाडावे लागतात,,या कड़े दोघे ही कानाडोळा करतात,मना सारखे जगण,प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य,याला स्पेस म्हणत नाहीत,स्वातंत्र्य दोघांना हवे पण त्याला ही काही  लिमिट्स असू शकतात,पति पत्नी म्हणून वावरताना दोन्ही कढील कुटुंबाच्या संस्काराची मूल्ये जपली गेली पाहिजेत,मित्र मैत्रिणी सोबत वेळ घालवने,पार्टीज ना जाणे,,यात दोघांचा ही सहभाग हवा,माझे म...