मेनोपौज आणि ती

आज सकाळ पासूनच स्मिताला कसे तरी वाटत होतेखूप बैचेन अस्वस्थ काही ही काम करू नये नुसतं बसून राहावे वाटत होते पण इशा आणि अनय चे कॉलेज आहे विक्रांत चे ऑफिस आहे मग काय इच्छा नसताना ही स्मिता उठली. एक एक काम आवरू लागली. दूध गॅसवर तापवायला ठेवले आणि लक्ष; तिचेदुसरीकडे गेले दूध उतू सगळी गॅस शेगडी खराब झाली. चरफडत तीने; दुधाचे पातेले खाली ठेवले. आई नाष्टा झाला का ग मला लवकर जायचे आहे इशा रूम मधूनच बोलली. स्मिता माझा टिफिन पण लवकरकर जरा मला अर्जेन्ट मीटिंग आहे. विक्रांत हीबोलला. अरे मी एकटीच काम करते मला दोनच हात आहेत जरा तुम्ही पण येऊन मदत करा. स्मिता चिडून बोलली. विक्रांत किचनमध्ये आला. स्मिता काय झाले आहे का सकाळ सकाळ चिडचीड करते आहेस. रोजच तर करतेस ना सगळं मग आज काय झाले. का मला कंटाळा नाही येऊ शकत का? किती करायचे रे मी काम ? स्मिता तुला बर वाटत नाही का काही होतय का प्रेमाने विक्रांत ने विचारले. नाही काही होत नाही मला. ओके आज नको काही बनवू तू मी बाहेर खाईन. इशा आणि अनय ही आले आवरून आई तू आराम कर आम्ही खातो कँटीन ला . अरे नको थांबा मी...