तिचा नकार
त्याला नकार नाही सहन होत.तू मात्र हीच एक चूक केलीस आणि हकनाक बळी गेलीस.मुलगी म्हणून जन्माला येणं खरच चुकीचे आहे का ओ? दर्शना पवार तुझी कर्म कहाणी कित्येकांना हादरून गेली.काळीज चिरत गेली.तू हुशार निपजलीस आणि उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न तू उरी बाळगले. पण या पुरुष स्त्ताक समाज व्यवस्थेत तू त्याच्या वरचढ होण त्याला थोडीच खपणार होते? सन्मानाने जगण्याचा हक्क तर मुलांना आहे,तू मुलगी म्हणून जन्माला आलीस हीच तुझी चूक झाली.उच्च शिक्षण घेवून तू या समाजात ताठ मानेने जगणार होतीस. एमपी एससी ची अवघड परीक्षा तू सहज तिसऱ्या क्रमांका ने उत्तीर्ण झालीस.आर्थिक स्वार्था पोटी तिने बाहेर पडून नोकरी करावी या बद्दल त्याचा आक्षेप नाहीच पण स्वतः च्या हिमतीवर तू पुढे गेलीस काहीतरी मिळवलेस याची चीड त्याच्या मनात होती.तू अधिकारी पदा वर बसून त्याला ऑर्डर देणार होतीस.केबिन मध्ये बसून ताठ मानेने काम करणार होतीस.मग विचार कर किती जणांचा इगो तू दुखावणार होतीस? तूच विचार कर असे किती दुखावलेले जीव त्यांचा इगो दुखावला म्हणून मनातल्या मनात तुझा किती वेळा त्यांनी खून केला असता ! पुढे एका पुरुषाला तू लग्नाला नकार द...