आर यु वर्जिन ??

विशाखा च्या घरी आज सगळे खुश होते आनंदात होते एका मोठ्या खानदानी घरातून तिला लग्नासाठी होकार आला होता. 15 दिवसा पूर्वी पाहुणे तिला बघून गेले होते आणि आज निरोप आला मुलगी पसंद आहे. मुलगा राजदीप त्याचे जेमतेम शिक्षण बी कॉम झालेले त्याचे वडील गावचे सरपंच आजोबा जिल्हाध्यक्ष,काका पण राजकारणात सक्रिय गावात खूप मान होता या कुटुंबाला. राजदीप दिसायला स्मार्ट त्याचा बिझनेस होता. विशाखा साधारण मध्यम वर्गीय कुटुंबातील बी.ए झालेली मुलगी नाकेडोळी छान आणि स्वभावाने शांत. लवकरच चांगला मुहूर्त बघून लग्न ठरवले होते. राजदीप गावात रुबाबात फिरायचा त्याच्या मागे मागे अनेक रिकामटेकडी मूल सतत असायची. राजदीप चे लग्न ठरले चे त्याच्या मित्रांना समजले तसे सगळे बोलू लागले त्याला राज ही मुलगी शहरात राहणारी तिचे काही अफेयर वैगरे असेल तर आणि ती अजून ही कोरीच असेल कशावरून? म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला राज ने विचारले. आज काल च्या मुली खूप फॉरवर्ड असतात, लग्नासाठी कुमारी म्हणजेच वर्जीन मुलगी मिळणं कठीणच . तसा राज म्हणाला,नाही विशाखा तशी वाटत नाही . बघ बाबा चांगली चौकशी कर नाहीतर तिलाच विचारून घे. असे काहीसे विचित्र ...