प्रेम म्हणजे प्रेम असत

प्रेम म्हणजे प्रेम असत,,,,, "प्रेम म्हणजे प्रेम असत,तुमच आणि आमच अगदी सेम अस्त.या कविते मधून मंगेश पाड़गांवकरांनी प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. आपण कोणावर तरी प्रेम करतो हे सांगण्यासाठी एखाद्या विशिष्ठ दिवस असावा असे नाही.प्रेम ही भावना उपजत असते. ती एकमेकांच्या हृदया पर्यन्त नकळत् पोहचत् असते. परंतु आजच्या धकाधकी च्या जीवनात आपण एकमेकांना पुरेसा वेळ नाही देवू शकत. तेव्हा आपल्या प्रिय व्यक्ति वरील प्रेम सेलिब्रेट करण्या साठी "वेलेंनटाइन डे" सारखा एखाद्या दिवस असला तर काय बिघडले? पण आपल्या सेलिब्रेशन मुळे इतरांना त्रास होऊ नये याची जरूर काळजी घ्यावी. आपले सेलिब्रेशन आपल्या पुरतेच मर्यादित असावे.. प्रेम ही एक सुंदर भावना आहे. मग ते प्रेम आई मुले,भाऊ,बहिन ,मित्र मैत्रिण,पति पत्नी यांच्या पैकी कोणाचे ही असू दे,प्रेम हे प्रेमच असते. याची ठराविक व्याख्या नाही करता येत. एखाद्या व्यक्ति बद्दल वाटणारी ओढ़,आपुलकी,माया,ममता,काळजी याला प्रेम म्हणतात. पण आज आजुबाजुला पाहिले की असे आढळते की यालाच प्रेम म्हणतात का,असा प्रश्न पडतो!! कॉलेज,शाळेला जाणाऱ्या मुलिंना वाटेत् आड...