21 मार्च जागतिक कविता दिन
कविता म्हणजे काय कविता का लिहिली जाते याच एका शब्दात उत्तर नाही देता येणार कविता कागदावर लिहून काय समाधान मिळते हे ज्याचे त्यालाच माहीत कविता म्हणजे आपले विचार आपल्या भावना मग त्या प्रेम भावना असोत नाहीतर मनातला उद्रेक असो काही सामाजिक घटना असो ते ते आपल्या परीने शब्दात मांडण्याचा प्रयत्न म्हणजे कविता. प्रत्येका साठी वेगवेगळा असा कवितेचा अर्थ असू शकतो जे मनात दडलेले असते जे पटकन बोलता येत नाही असे काहीसे भाव कागदावर नकळतपणे उमटले जातात मग त्या ओळीं मधून कविता जन्माला येते . प्रेम रस कारुण्य रस शृंगार रस,रौद्र रस,भक्ती रस अशा अनेक भावनेतून कविता जन्माला येते जे आव्यक्त आहे ते व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे कविता .जसे उत्तम लेखक होण्यासाठी चांगले लिखाण जमणे गरजेचे असते तसेच कविता समजने ही सुद्धा एक कला आहे कवितेतील शब्द वाचून अंगावर शहारे येत नाहीत तो पर्यंत ती कविता समजली नाही .त्यातला भाव मनाला भिडायला हवा तर कविता समजते . कविता जगता आली पाहिजे . कविता लिहिली जात नाही तर ती आपोआप कागदावर मांडली जाते. आज 21 मार्च हा दिवस जागतिक कविता दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमि...