Posts

Showing posts from February 3, 2020

आरवी..

Image
आरवी.. मिलिंद आणि रेवती आरवी ला घेवून डॉ,शैलेश माने सुप्रसिद्ध मानसोपचार स्पेशालिस्ट यांच्या कड़े आले होते. आरवी आता ही त्या क्लिनिक मध्ये असून नसल्या सारखीच शून्यात नजर लावून बसली होती. डॉ कड़े आता एक पेशंट बसले होते. त्या पेशंट नन्तर आरवी चा नंम्बर होता. रेवती आपल्या लाडक्या मुलीं कड़े केविलवान्या नजरेने पहात होती . लहान पणा पासून प्रत्येक गोष्टीत् हुशार,चौकस,हसमुख अशी आरवी आता अवघ्या सोळा वर्षातच आयुष्य संपून गेल्या सारखी भकास झाली होती. याला कुठे ना कुठे रेवती आणि मिलिंद जबाबदार होते. फक्त काम आणि पैसा याच्या मागे लागुन् त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीं चे आयुष्य वेगळ्याच वळणावर आणून ठेवले होते. पाच मिनिटात आतील पेशंट बाहेर आला. तसे ते तिघे आत गेले. डॉ नी आपल्या समोरच्या खुर्ची वर त्यांना बसायला सांगितले आणि म्हणाले बोला मि. मिलिंद काय प्रॉब्लेम आहे. तसे रेवती म्हणाली,डॉ ही आरवी आमची मुलगी ,एकदम ब्रिलियंट स्टुडेन्ट आठवी इयत्ते पर्यन्त खुप छान अभ्यास करायची . बडमिंटन् खेळायला ग्राउंड ला जायची . पन गेल्या वर्षा पासून ती खूपच स्वभावाने हायपर बनली आहे. अभ्यासात अजिबात लक्ष नाही सतत मोबाईल...