यु अँड मी ( you & me)

यु अँड मि मितेश एक वर्षांनी आलो असु आपण सिंहगडावर ,,हो ना? संयुक्ताने विचारले,,हो संयु मितेश म्हणाला. कॉलेज मध्ये असताना किती वेळा यायचो आपण ,आता तू आणि तुझे काम ,टेन्शन बस्स,,माझ्या साठी पण तुला वेळ नसतो मितु, मितेश ने तिला आपल्या जवळ बसवले ,तिचा हात हातात घेत म्हणाला,काय करू ग कामाचा इतका ताण असतो की बाकी काही सुचत नाही.आपल्या लग्नाला 2 वर्ष कशी झाली हे ही समजले नाही. हवेत गारवा पसरला होता,आभाळ ही भरुन आलेलं होत,पाऊस कोणत्या ही क्षणी बरसणार होता, संयुक्ता त्याला म्हणाली,मितेश कामात इतका पण बिझी राहू नकोस की मला ही विसरून जाशील. नाही ग,तुला कसा विसरेन,,बस थोडं कामातून वेळ मिळत नाही इतकंच. मितु तुला आठवत का रे,,याच गडावर बेधुंद पावसात तू मला प्रपोज केलं होतंस, हो संयु तुला पाऊस प्रिय आणि मला तितकासा नाही आवडत पाऊस,पण तुझा हट्ट होता ना की भर पावसात मी तुला प्रपोज करावं, हो,किती मस्त मजा करायचो आपण त्या दिवसात,एकमेकांच्या प्रेमात आंकंठ बुडालेलो आपण,,जगाची, लोकांची पर्वा न करता मनसोक्त फिरायचो ,तू आणि मी इतकं छोटं जग होत ना आपलं. आणि आता मी सोडून बाकी सार जग तुझं आहे मितेश ,,संयुक्ता लटक्...