आम्ही आजच्या दुर्गा

सर्व मंगल मांगल्ये,शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते,!! नवरात्री हा नऊ दिवस आणि नऊ रात्रींचा उत्सव आहे,जो आश्विन शुद्ध प्रतिपदे पासून सुरु होतो.दुर्गा देवी ची नऊ रुपे आणि या नऊ रूपांची पूजा म्हणजे नवरात्र होय,हिन्दू धर्मात् साडे तीन मुहूर्ताला खुप महत्त्व आहे,त्याच प्रमाणे साडे तीन पीठे ही महत्वाची आहेत,त्यातील पहिले तूळजापुर ची अम्बाभवानी माता,दूसरे कोल्हापुर ची अंबाबाई,आणि तीसरे माहुरगड ची माता रेणुका,व अर्धे शक्तिपीठ म्हणजे वणी गडाची सप्तश्रृंगी माता होय.नवरात्री च्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते,जेथे घटाची स्थापना करायची ती जागा स्वच्छ करुन् त्यावर रांगोळी काढली जाते,एक दुरडी घेऊन त्यात काळी माती भरली जाते,त्या मातीत सात प्रकार चे धान्य पेरले जाते,त्यावर माती च्या किवा धातु च्या कलशा ची स्थापना केली जाते,त्यातील पाणया मध्ये चंदन,गंध,अक्षता,दूर्वा,दक्षिणा टाकतात.तसेच विडयाची पाने आम्बयाची पाने खोचली जातात,त्यावर नारळ ठेवला जातो,कलशा च्या बाजूला देवी च्या मूर्ति ची स्थापना केली जाते,यालाच "घट बसने" असे म्हणतात,नऊ दिवस घट...