खव्ययेगिरी...,,

खव्य्येगीरी, हॉटेल"नुसते नाव घेतले तरी तोंड़ाला पाणी येते ना!!मग लहान मूल असो ,गृहिणी असो हॉटेल म्हन्टल की भारी खुश होतात,हॉटेल चे चविष्ठ जेवण,तिथले इंटीरियर प्रत्येकाला मोहात पाडत.आपल्या भारतीय खाद्य संस्कृति मध्ये विविध प्रकार चे पदार्थ पाहावयास मिळतात,रूचकर ,चविष्ठ पदार्थ ही आपली खासियत आहे.ती पुरातन काळा पासून सुरुच आहे.तरी देखील हॉटेल ची सवय किवा हॉटेल चा मोह आपल्याला सोडवत नाही.मध्यमवर्गीय कुटुंबा मध्ये तर वीक एन्ड ला जेवायला बाहेर जायचे हा पायंडाच पडला आहे.मुलांना थोड़ा खान्यात चेंज तर घरच्या गृहिणी ला एक दिवस आराम!! रस्त्या वरच्या वडा पाव पासून ते फाइव स्टार हॉटेल पर्यन्त चा हा प्रवास भारतीय संस्कृतीत उल्लेखनीय च म्हणावा लागेल.ज्याला जे परवडते,मग तो वडा पाव असो,ढाबया वरचे जेवण असो,किवा फाइव स्टार मधले जेवण असो,प्रत्येक जण हॉटेल ची चव चाखतच असतो.फार पूर्वी हॉटेलची सुरवात ही बाहेरगावी जाणाऱ्या साठी खान्याची सोय व्हावी या उद्देशाने झाली.कामा निमित्ताने बाहेरगावी जाणारे लोक,त्यांची खाणयाची ,राहण्याची सोय म्हणून हॉटेल कड़े पाहिले जायचे.त्यामुळे प्रत्येक शहरात हॉटेल्स ची साखळ...