सर्व्हायविंग मेन (शोभा डे)
अगदी दिलखुलास,मोकळं आणि भाषेची भीड न ठेवता लेखन करणारी एक माझी आवडती लेखिका म्हणजे" शोभा डे"! स्पष्टवक्तेपणा,निर्भीड अस वास्तव या लेखिकेच्या लिखाणात पाहायला मिळते. आपली पुस्तके वाचून लोक काय प्रतिक्रिया देतील याची पर्वा तिला अजिबात नसते. एक दर्जेदार साहित्य निर्मिती कशी करायची याचे उदाहरण म्हणजे शोभा डे!" शोभा डे"या भारतीय लेखिका आणि स्तंभलेखिका आहेत. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते. स्टारडस्ट, सोसायटी आणि सेलेब्रिटी या संपन्न वाचकांवर्गाच्या मासिकांचे संपादन त्यांनी केले. उद्योग मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने लिहीले. १९८० पासून त्या विविध भारतीय नियतकालिकांतून सातत्याने स्तंभलेखनही करीत आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पाउस...