हारजीत
हारजीत,,, आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्षातील मुख्य सभासदा सोबत हजर राहणार होते. जो तो आपला पक्ष कसा आहे,चांगले काम कोण करत याच प्रेझेंटेशन करणार होता. प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता पूर्ण तयारीनिशी इथे आला होता. आमदार साहेब ,त्यांचा भाचा सुमित आणि त्यांच्या प्रवक्त्या प्रीती त्यांची सेने ची संपूर्ण टीम अगदी पूर्ण तयारीने आले होते. पण प्रीती ची बाहेर इतक्या लोकांसमोर बोलण्याची ही पहीलीच वेळ होती. त्यामुळे तिला थोडे टेन्शन आले होते. पण सुमित होता तिच्या सोबत सो ते दोघ प्रेझेंटेशन देणार होते. अकरा वाजता मिटिंग सुरु होणार होती. प्रीती नोट्स काढून ते वाचण्यात मग्न होती. तेव्हा सुमित तिला पाहून म्हणाला,प्रीती डोन्ट बी टेन्स,,रिलॅक्स ती म्हणाली,अरे इतक्या लोकांसमोर मी फर्स्ट टाइम् बोलणार ना म्हणून थोड टेन्शन आले आहे. अग,मी आहे ना का काळजी करतेस? ठेव ते पेपर बाजूला आपण काही परीक्षा द्यायला नाही आलो असं म्हणत सुमित ने तिच्या समोरचे न...