माणसातला देव्

पुण्यात कोरोना चा कहर माजला होता. नोकरी चे ही काही खरे नव्हते. वर्क फ्रॉम होम सुरु होते . पगार ही पुर्ण हातात येत नव्हता. दिनेश ने बायको आणि 2 मुलां सह गावी कर्नाटक ला जाण्याचा निर्णय घेतला. पावसाचे दिवस सुरु होते. लागेल तेवढे सामान सोबत घेऊन कार घेवून निघाला. दीपाली पुढे आणि मुले मागच्या सिटवर बसली होती. पाऊस थांबायचा नाव घेत नव्हता. रात्री चा त्यांचा प्रवास सुरु होता. पुणे कोल्हापुर हाय वे वर धुंवाधार पाऊस चालू होता. हळू हळू कार ड्राइव्ह करत दिनेश चालला होता.याच हाय वे वर कोरोना नामक सैतान दबा धरुन बसला असेल हे त्याच्या गावी ही नव्हते. जेमतेम सातारा क्रॉस केले आणि दीपाली ला अचानक थंडी वाजुन अंगात ताप भरला आणि तिला उलटया सुरु झाल्या. तिला श्वास घ्यायला ही त्रास होऊ लागला. मग मुले पुढच्या सीट वर बसली आणि दीपाली मागे सीट वर झोपली.दिनेश ने एक सरकारी हॉस्पिटल बघुन गाड़ी तिथे नेली. दीपाली ला डॉक्टरानी चेक केले खूप शिकस्तीचे प्रयत्न त्यांनी केले पण शेवटी त्याच्या हातात तिचं डेथ सर्टिफिकेट दिलं ज्यावर लिहलं होत sudden death due to Corona virus. दिनेश ला काहीच सुचत...