है तुझे भी इजाजत(भाग 12 अंतिम)

आर्वी म्हणाली सर तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते तर तसे सांगायचे होते तुम्ही मला फसवलत तसे जान्हवी ला ही फसवलत. आर्वी मी कोणालाही फसवले नाही . जान्हवी आणि मी लहानपणापासून एकत्र मोठे झालो आमचे घरचे रिलेशन आहे. आणि तुला फसवले म्हणतेस तर मला सांग मी तुला कधीतरी लव यु बोललो का ? म्हणजे सर तुम्ही मला लाईक करत होता ते काय होत? आर्वी लाईक अँड लव आर टू डिफ्रंनट वर्ड्स अँड बोथ आर डिफ्रंनट मिनींग . तू गफलत करतेस आवडणे आणि प्रेम असणे या वेगवेगळ्या भावना आहेत. पण सर मी तर हे प्रेमच समजत होते. आर्वी मी तुला गोव्याला हेच बोललो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तिचा सहवास आवडतो म्हणजेच त्या व्यक्ती वर आपले प्रेम आहे अस होत नाही बस्स आवडते कोणीतरी दयाट्स इट. तेव्हा तू ही म्हणाली हो सर मला पण असच वाटत मग मला वाटले तू ही मला लाईक करतेस सो काय हरकत आहे थोडा वेळ एकत्र घालवू एन्जॉय करू त्यात इतकं मनाला का लावून घेतेस? मी आज ही तुला लाईक करतो. बास सर आता एंगेजमेंट झालीय तुमची आणि अस बोलता तुम्ही? आर्वी कुठल्या मेंटयालिटी मध्ये जगतेस तू आज चा काळ जमाना असाच आहे मस्त रहा एंजॉय करा उगाच इमोशनल फुल होऊन काही ही मिळत ...