कैसी ये तेरी प्रीत ( भाग 4)

आशुचा मूड कधी चांगला तर कधी खराब असायचा. आज स्मिताला एक अर्जंट काम होते ते ती लॅपटॉपवर करत बसली होती. आशु बेडवर मोबाईलवर गेम खेळत होता. स्मिता काम बंद कर तो म्हणाला. अरे अर्जंट आहे काम उद्या सकाळी द्यायचे आहे. स्मिताने स्लीवलेस ड्रेस घातला होता. आशु उठून तिच्या मागे चेयर जवळ उभा राहिला. तिच्या गोऱ्या दंडावरून आपली बोटे फिरवत राहिला. तिला मानेला किस करत राहिला. आशु प्लिज मला काम करू दे ती बोलली. पण तो ऐकायला तयार नव्हता तसाच तिच्या सर्वांगावर आपला हात फिरवत राहिला तिने रागात त्याचा हात बाजूला केला. तसा तो चिडला मला नाही म्हणतेस असलं कसलं महत्वाचे काम आहे तुझे म्हणत त्याने लॅपटॉप बंद केला तिला ओढून बेडवर ढकलून दिले. तिचे कपडे ओरबाडून काढले आणि मनसोक्त तिला ओरबाडत स्वतःची भूक शमवत राहिला. स्मिताच्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते. रडत रडतच ती झोपी गेली. सकाळी उठली आणि कामाला लागली. आशु उठला तो नाष्टा करायला आला. तिने निमूटपणे नाष्टा त्याच्या समोर ठेवला. त्याने एक घास खाल्ला हे काय कसले बेचव बनवले आहेस मला दुसरे काहीतरी बनवून दे. आशु जे आहे ते खा मला आता वेळ नाही. ये कोणाला दम देतेस म्हणत त्यान...