शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात

1 ) स्थळ --- आमदार दादासाहेब यांचे घर आज दादा साहेबांच्या घरी सकाळ पासूनच लगबग सुरू होती,त्यांचा एकुलता एक मुलगा हरीश अमेरिके हुन एम एस करून भारतात परत येणार हॊता. त्याच्या स्वागता ची जोरदार तयारी सुरू होती. आई साहेब मुलाच्या येण्याने खूप खुश होत्या. थोड्या वेळात हरीश आला. त्याचे जंगी स्वागत झाले. आमदार साहेबांचे मित्र ,मोठं मोठे उद्योगपती,हरीश चे मित्र सगळेच आले होते. गप्पा मारत मजेत सगळे मेजवानी चा आनंद घेत होते. दादा साहेब प्रत्येकाला आपला मुलगा किती हुशार आहे आणि आज तो इतका मोठा सर्जन झाला आता मोठे हॉस्पिटल त्याला काढून देणार असेच सांगत होते,मुलाचे कौतुक करत होते . मुलगा कायम आपल्या आज्ञेत असल्या मुळे आज तो या उंची वर आहे हेच ज्याला त्याला सांगत होते. हरीश ने ही गोष्ट नोटीस केली. त्याने मनातच ठरवले एकदा बाबांशी बोलायला हवे. रात्र फार झाली होती. दादा साहेब हरीश ला म्हणाले हरीश आता तू आराम कर जा. दमला असशील . नाही बाबा पण मला थोडे बोलायचे होते. अरे आता खूप उशीर झाला आहे उद्या बोलू म्हणत ,त्यांनी हरीश ला गुड नाईट केले. सकाळी नाष्टा च्या वेळी हरीश ने विषय काढला ...