Posts

100 शब्दांची गोष्ट

Image
 अरु अग प्रॉब्लेम कोणाच्या आयुष्यात नसतात? म्हणून काय जगणं सोडून द्यायच असत का? तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं पटत नाही तो तुला किंमत देत नाही मग तू तुझं आयुष्य जग तुझ्या मनासारखं आणि बाकी सगळं इग्नोर कर. निषाद अरु ला समजावत होता.आज ते कॉलेज च्या रियुनियन ला एकत्र आले होते. निषाद म्हणाला,आठवत का तुला अरु तू किती छान पेंटीग्ज करायचीस . हो ते तर मी विसरूनच गेले. मग आता पुन्हा नव्याने सुरवात कर नवनवीन रंगानी आयुष्य भरून टाक मग दुःखाचा कोणताच रंग तुला उदास नाही करणार. पुन्हा त्या जुन्या अरु ला जिंवत कर आणि नवीन वर्षांचे स्वागत तुझ्या अनोख्या रंगांनी कर.

तिचे अवकाश

Image
 सीमा स्वहताचे आवरून जेवण उरकून अक्षय ची वाट पहात डायनींग टेबल वरच बसली होती. रोज अक्षय ला घरी यायला उशीर व्हायचा कधी तो जेवून यायचा कधी घरी जेवायचा म्हणून सीमा रिया आणि वरुण सोबत मुलां सोबत जेवून घ्यायची. अक्षय एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये कामाला होता. कामा मुळे तो परदेशी ही वारंवार जायचा.दिसायला स्मार्ट कामात हुशार त्यामुळे त्याला स्वहता बद्दल अहंकार पण जास्तच होता. सीमाही डबल ग्रॅज्युएट झाली होती. पण अक्षय च्या इगो मुळे त्याने तिला जॉब करू नाही दिला. त्याच्या प्रेमा खातर तिने घर सांभाळणे आनंदाने स्वीकारले. सुरवातीचे नवीन नवलाई चे दिवस पटकन निघून गेले पण कायम एक गोष्ट खटकायची की अक्षय तिला नेहमी स्वहता पेक्षा कमी लेखायचा पण ती ही गोष्ट सुद्धा इग्नोर करत असे. नतर तिला रिया आणि वरुण ही दोन गोड मुलं झाली त्याच्या सोबत ती खुश राहायची. अक्षय मात्र त्याच्यात असूनही नसल्या सारखा असायचा . रात्री खूप उशीर अक्षय घरी आला. सीमा कंटाळून तिथेच झोपी गेली होती. दाराच्या लैच च्या आवाजाने तिला जाग आली . तिने पटकन त्याला विचारले अक्षय जेवायला वाढू का ? काही नको मी जेवून आलो आहे  असे म्हणत तो बेड...

दर्द ए दिल

Image
दर्द ऐ दिल,,,     टेकडी वर मस्त थंड हवा होती,सूर्य अस्ताला निघाला होता. दूरवर नजर जाईल तिकडे सूर्याचा केशरी रंग आभाळभर पसरला होता,बरीच लोक टेकडी वर वॉक साठी आले होते कोणी ग्रुप करून गप्पा मारत बसले होते. खूप प्रसन्न असे ते संध्याकाळ चे वातावरण होते.  मीरा आणि देवांश तिथे बराच वेळ शांत बसले होते. ते दोघे एकाच ऑफिस मध्ये काम करत होते. दोघां मध्ये मैत्री कधी झाली,ते बेस्ट फ्रेंड कधी बनले  हे त्यांनी ही कळले नव्हते.आणि आता ते दोघ एका हळुवार,नाजूक नात्यात गुंतत चालले होते. देवांश पेक्षा  मीरा जास्तच इमोशनली त्याच्यात गुंतत चालली होती. ते त्याला माहित होत आणि जाणवत सुद्धा होत पण एकमेकांना सगळ्या गोष्टी शेयर करणारे ,मनातलं सगळं बोलणारे या विषयावर मात्र काहीच बोलत नव्हते.एकमेकांची काळजी,आपलेपणा,जिव्हाळा हे सगळं त्यांना वाटत होतं,तसे ते वागत ही होते. देव च्या मनात खुपदा आले होते ,हो देवांश ला सगळे ऑफिस मध्ये देवच म्हणायचे. तो अगदी  वेडा झाला होता मीरा च्या प्रेमात पण तिला सांगू शकत नव्हता. बीकॉज शी वॉज मॅरिड अँड हँव अ चाईल्ड. पण आज मीरा ने त्याला ऑफिस मध्ये सां...