21 मार्च जागतिक कविता दिन
- Get link
- X
- Other Apps
देणं..
माहित नाही अवचित, एका वळनावर आपण भेटलो,
ध्यानी मनी नसताना कधीच एकमेकांचे झालो.
पहाटेचे स्वप्न खरच इतकं सुंदर असत,
प्रत्यक्षात तुला पाहिल्यावर,मी ते मानलं होत.
जख्मा सुद्धा भरतात,असं काहीसं प्रेम असत,
तुझं ,माझं काही नसतं,प्रेम हे प्रेमच असत.
सोबत असो,वा नसो,प्रेमात अंतर पडत नसत,
सगळ्याच नात्यानं इथे नाव द्यायचं नसत.
तू आहेस सोबत म्हणून शब्दांना सुंदर अर्थ आहे,
तू आहेस सोबत म्हणून जगण्यात ही तीर्थ आहे.
तुला पटणार नाही कदाचित,माझे श्वास ही तुझं देणं आहे,
थोडे थोडके नाही,हे तर आयुष्य भरच देणं आहे.
-------------------/////------
तू आणि पाऊस --
पाना फुलांवर ,झाड़ा वेलींवर टपटप पडतो पाऊस
तुझ्या सारखाच वेड्या सारख खुदकन हसतो पाऊस.
तापलेल्या जमिनीवर हलकेच बरसतो.
तहानलेल्या धरणीला तृप्त करुन् जातो.
कधी धो धो रस्त्यावर कोसळतो,
तर कधी माझ्या सारखा एकांतात भटकतो.
मी मूक होऊन अश्रु ढाळतो,,
तो ही असाच,कोणाच्या आठवणीत बरसतो?
मी आठवतो ओला स्पर्श तुझा,कधी काळचा,,
त्याला ही माहित असेल का,अर्थ प्रेमाचा?
कवितेत माझ्या मी त्याला,बांधुं पाहतो शब्दाने,,
पण त्याचे ही तुझ्या सारखे,लाखो बहाने.
शोधतो मी पावसात ही माझ्या स्व:ताला,,
तू आणि पाऊस,शेवटी एक सारखेच,,
समजावतो मनाला,,,,,!!!
------- संगीता देवकर,,प्रिंट /मीडिया रायटर,पिम्परी पुणे,,18
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment