Friday, June 25, 2021

कैसी ये तेरी प्रीत (भाग 2)

स्मिता बोलली की आशुच नाव सुद्धा घेऊ नकोस म्हणजे आशुने हे केले सगळे ? हॉंऊ ईट इज पॉसीबल? स्मिताला छान झोप लागली होती. संध्याकाळी स्मिता उठली गोळी घेतल्याने तिला जरा बरे वाटत होते. विक्रांतने तिच्यासाठी पोहे बनवले होते. अरे पोहे कशाला केलेस विक ती कधीकधी त्याला विक असे शॉर्ट नावाने बोलवत असे. दुपारी काही नाही खाल्ले तू असू दे खा मी मस्त चहा बनवतो विक्रांत बोलला.

स्मिताने पोहे खाल्ले वा विक्रांत छान झालेत पोहे. विक्रांतनेही पोहे घेतले चहा घेतला. स्मिता जवळ विक्रांत बसला म्हणाला, बोल स्मितु काय झाले आशुने मारले तुला खरे ना? हु स्मिता बोलली. व्हाट रबिश आशु अस कस वागू शकतो? कशावरून भांडण झाले तुमचे. विक गेल्या वर्षापासून म्हणजे जसा हा कोरोना काळ सुरू झाला तस आशुच्या वागण्यात फरक पडू लागला.

गेल्या वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊन या शब्दांनी जणू काय दहशतच निर्माण केली बघ. कोरोनामुळे नाटक सिनेमा सगळ काही बंदच झाले. आशुची कितीतरी नवीन नाटकं पेंडिंग आहेत. चार सहा महिन्यांपूर्वी परत शुटिंग नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. एक दोन नाटकं आशुची चांगली झाली. पण आता परत हे लॉकडाऊन लागले आणि आशु घरातच बसून आहे. स्मिताला सगळं काही तिच्या नजरेसमोर दिसू लागले.

आशु मला आठवड्यातुन फक्त दोन दिवस ऑफिसला जावे लागेल. बाकीचे दिवस वर्क फ्रॉम होम आहे. चहाचे दोन मग टेबलवर ठेवत आशु बोलला तुमचे बरे आहे ग घरून काम तरी होते आमच्या सारख्यांच कामच बंद झाले. हा कोरोना कसले कसले दिवस दाखवणार आहे देव जाणे. आशु हे ही दिवस जातील आणि काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्या सोबत. हम्मम इतकंच तो बोलला.

स्मिता दोन दिवस ऑफिसला जायची तेव्हा आशु घरातच बसून असायचा. कोरोनामुळे बाहेर जाण्यालाही बंदी होती. संध्याकाळी स्मिता येण्याआधी कुकर लावून ठेव भाजी चिरून निवडून ठेव अशी कामेही करायचा. स्मिता त्याला म्हणायची आशु तू नको काही करु मी करेन आल्यावर. असू दे ग असे पण घरी बसून बोर होत तेवढाच वेळ जातो माझा. मग स्मिताही काही बोलत नसे. हळूहळू आशुला जाणवू लागले की त्याला काम नाही तो रिकामटेकडा घरी बसतो बायको मात्र घरी बसून पण कमवते आणि मी पुरुष असूनही घरची बायकी कामे करतो असा पुरुषी अहं त्याचा वाढू लागला. मग त्याची चिडचिड होऊ लागली.

एक नावजलेला अभिनेता आज चक्क घरी बसून घरकाम करतो. हे त्याला खटकु लागले. आज जरा स्मिताला उशीरच झाला घरी यायला. आशु चहा ठेव ना मस्त आल्याचा. ती आल्या आल्या बोलली तसा आशु बोलला या राणी सरकार आपण कधीही या घरात या बाहेर जा. तुम्हाला काम असते आणि मी मात्र आहे घरगडी तुमच्या सेवेला सदैव तत्पर. मी काय रिकामटेकडा बायकोच्या जीवावर बसून खातो. आशु काय झाले अस का बोलतोस? तसा आशु अजून चिडला स्मिताचा चेहरा हातात धरत बोलला, हे बघ तू कमवून आणतेस म्हणून मला ऑर्डर नाही द्यायची समजले मी ही कमवून ठेवले आहे. आशु हात बाजूला घे मला दुखते आहे. त्याने रागाने हात तिच्या चेहऱ्यावर आवळला होता. दुखते आहे ना मग मला इथे किती दुखत असेल विचार कर म्हणत आशुने आपल्या छातीवर हात ठेवला होता. आशु अरे आज नाहीतर उद्या सगळं चालू होईल तुझे नाटकाची तालीमही सुरू होईल.

क्रमशः

No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...