Friday, June 25, 2021

कैसी ये तेरी प्रीत (भाग 3)

आशु अरे आज नाहीतर उद्या सगळं चालू होईल तुझे नाटकाची तालीमही सुरू होईल. पण तोपर्यंत ते ऑनलाइन थिएटरसाठी विचारले आहे तुला ते तरी कर. ये मला अक्कल नको शिकवू आणि सल्लेही देऊ नकोस. मला समजते काय करायचे अस बोलून आशु बेडरूममध्ये गेला ड्रिंक घेतले प्यायला. त्याने आणि सोबत सिगारेट सुद्धा! हल्ली त्याच ड्रिंकही वाढले होते.

स्मिताच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिला समजेना की आशुला अचानक काय झाले असा का वागत आहे तो? ती फ्रेश होऊन आली आणि चहा घेतला. रात्रीचा स्वयंपाक केला. आशु चल जेवायला त्याला बोलवले तिने. खूप ड्रिंक केले होते त्याने कसे बसे तो जेवला. स्मिताला आशुबद्दल खूप वाईट वाटत होते हा दारूपायी स्वतःचे नुकसान तर नाही ना करून घेणार ही चिंता तिला सतावू लागली.

ती खूप दमली होती ऑफिसमध्ये काम खूप होते. ती बेडवर आली तसे आशुने तिला जवळ ओढले आशु मी दमलेय रे खूप प्लिज मला झोपू दे. उगाच नखरे करू नकोस तू दमतेस अस काय काम करतेस ऑफिसमध्ये? मी मूर्ख आहे का घरी बसून तुझ्या जिवावर खातो. आशु मी बोलले का तस काही. बोलायला कशाला पाहिजे दिसते तुझ्या वागण्यातून आता मी तुला जवळ पण नको आहे कारण मी बेरोजगार आहे. आशु तसे नाही तू झोप खूप ड्रिंक केलेस तू उद्या बोलू.

ड्रिंक केले ना मी मग बघच म्हणत आशुने तिला जबरदस्तीने आपल्या जवळ ओढले तिच्या अंगावर स्वतः पडून तिला जोरात किस करू लागला. बघ किती पिलो आहे मी वास येतो ना दारूचा. अस म्हणत तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. स्मिता निमूटपणे त्याचा त्रास सहन करत होती. त्याची मानसिकता तिला समजत होती. काम नसल्याने तो सैरभैर झाला होता अस घरी बसून दिवस काढणे त्याला जड जात होते. तो पूर्णपणे शान्त झाला तेव्हाच तो बाजूला झाला.

सकाळी उठल्यावर आशुने तिची माफी मागितली. स्मिता काहीच बोलली नाही. आता तीन दिवस तिला घरूनच काम होते. दिवसभर ती आशुशी एका शब्दाने बोलली नाही. आशुही न्यूज बघत सोबत ड्रिंक करत बसला होता. कलाकारांचे कसे हाल चालले आहेत सिनेमा नाटक बंद होण्याच्या मार्गावर आहेत अजून किती दिवस लागतील नाटक सिनेमा सुरू व्हायला हे काही सांगता येत नाही सगळंच अनिश्चित अस न्युजला सांगत होते. आशुला तस तसे डिप्रेशन येत होते. त्याला ऑनलाइन थियटरसाठी विचारले होते काम करणार का पण आशुला ते पटले नाही.

नाटक लोकांसमोर प्रत्यक्ष झाले पाहिजे त्यात जिवंतपणा आहे. ऑनलाइन नाटक करण्याला अर्थ नाही असं त्याचं म्हणणं होतं. पण घरी बसून तो डिप्रेशनमध्ये जात होता आणि सहन सगळं स्मिताला करावे लागत होते. आपण तिच्या जीवावर जगतो यामुळे त्याचा पुरुषी अहंकार दुखवला जात होता. दुसरे एखादे काम करणे त्याला पसंत नव्हते. मी एक अभिनेता आहे मी अभिनयच करणार अस त्याच मत होतं.

स्मिता घरी ऑफिसचे काम करत होती. घरचे सर्व काम तिने आवरले होते. पण मुद्दाम आशु तिला हे करून दे ते दे अस काम सांगत होता. स्मिताची दुपारी एक मिटींग होती. त्याची ती तयारी करत होती. ऑनलाइन लाइव्ह मिटींग होती. तिने दुसरा ड्रेस घातला कारण घरचे काम करून ड्रेस खराब झाला होता. केस क्लिपला लावून मोकळे सोडले थोडा मेकअपही केला. तिला बघून आशु म्हणाला, ऑनलाइन मिटिंग आहे ना मग इतकं तयार व्हायची काय गरज आहे? कोण खास तुला बघणार आहे का? आशु काहीतरी काय बोलतोस अरे थोडं व्यवस्थित दिसायला नको का? का घरच्या मळलेल्या कपडयातच मी राहू? काय बिघडले मग त्यात. आशु मूर्खासारख बोलू नकोस अस ती अनवधानाने बोलून गेली.

तिच्या जवळ येत आशुने तिचे केस पकडले काय म्हणालीस मी मूर्ख आणि तू मारे खूप हुशार का? तुझ्या जीवावर मी खात नाही समजले. तिचे केस दुखत होते आशु प्लिज सोड चुकून बोलून गेले मी. चुकून नाही तू मुद्दाम अस बोललीस कारण मला काम नाही मी घरात बसून आहे आणि तू काम करुन मला रुबाब दाखवतेस काय म्हणत आशुने तिला ओढत बेडरूममध्ये आणले. बेडवर तिला ढकलून दिले आशु प्लिज आता मिटिंग आहे रे माझी जाऊ दे मला ती बोलली. पण त्याच्या अंगात सैतान शिरला होता. मेकअप करतेस नटून थटून राहतेस कोणासाठी सांग काय नाव त्याच. आशु अरे अस काही नाही.

चूप म्हणत त्याने तिच्या अंगावरचे कपडे अक्षरशः ओरबाडून काढले तिचा प्रतिकार कमी पडत होता. ही लिपस्टीक काय म्हणत त्याने जोरात तिचे ओठ चावले ही पावडर म्हणत तिचे गाल चावले मग स्वतःचे मन भरेपर्यंत तो तिला ओरबाडत राहिला. तिच्या डोळ्यातुन अश्रू वाहतच चालले होते. लग्नानंतरही बलात्कार होतात हे तिने फक्त ऐकले होते आज स्वतः तो अनुभव घेत होती. तीच काम मिटिंग सगळंच बारगळले.

आशु दिवसें दिवस असा बदलत चालला होता तिला समजत होते की काम नसल्याने तो असा डिप्रेस होत होता आणि तिच्याशी क्रुरतेने वागत होता पण त्याला कोणीतरी समजावून सांगणे गरजेचे होते. विक्रांतशी बोलू का असे तिने ठरवले पण राहू दे थोडे दिवस वाट बघू मग बोलूया असा तिने विचार केला. एक बहीण होती तिला ती अमेरिकाला होती. आई वडील थकले होते त्यांना या वयात आपले टेंशन कशाला द्यायचे असा विचार करून ती गप्प बसली. आशुचा मूड कधी चांगला तर कधी खराब असायचा.

क्रमशः

No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...