Friday, June 25, 2021

कैसी ये तेरी प्रीत ( भाग 4)

आशुचा मूड कधी चांगला तर कधी खराब असायचा. आज स्मिताला एक अर्जंट काम होते ते ती लॅपटॉपवर करत बसली होती. आशु बेडवर मोबाईलवर गेम खेळत होता. स्मिता काम बंद कर तो म्हणाला. अरे अर्जंट आहे काम उद्या सकाळी द्यायचे आहे. स्मिताने स्लीवलेस ड्रेस घातला होता. आशु उठून तिच्या मागे चेयर जवळ उभा राहिला. तिच्या गोऱ्या दंडावरून आपली बोटे फिरवत राहिला. तिला मानेला किस करत राहिला.

आशु प्लिज मला काम करू दे ती बोलली. पण तो ऐकायला तयार नव्हता तसाच तिच्या सर्वांगावर आपला हात फिरवत राहिला तिने रागात त्याचा हात बाजूला केला. तसा तो चिडला मला नाही म्हणतेस असलं कसलं महत्वाचे काम आहे तुझे म्हणत त्याने लॅपटॉप बंद केला तिला ओढून बेडवर ढकलून दिले. तिचे कपडे ओरबाडून काढले आणि मनसोक्त तिला ओरबाडत स्वतःची भूक शमवत राहिला.

स्मिताच्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते. रडत रडतच ती झोपी गेली. सकाळी उठली आणि कामाला लागली. आशु उठला तो नाष्टा करायला आला. तिने निमूटपणे नाष्टा त्याच्या समोर ठेवला. त्याने एक घास खाल्ला हे काय कसले बेचव बनवले आहेस मला दुसरे काहीतरी बनवून दे. आशु जे आहे ते खा मला आता वेळ नाही. ये कोणाला दम देतेस म्हणत त्याने तिचे केस पकडले आशु केस सोड. नाही सोडत आणि कोणाला रुबाब दाखवतेस मला. किती कमवतेस तू? मी काय फुकट तुझ्या जीवावर खातो काय? मला दुसरे खायला बनव. नाही मिळणार ती बोलली तसे आशुने तिला कानफटात लावली तिच्या ओठांतुन रक्त आले.

मग त्याने तिचे डोके धरून भिंतीला आपटले. तिला त्याने खूप मारले आणि घराबाहेर पडला. स्मिता उठली कपडे ठीक केले. छोट्या बॅगमध्ये थोडे कपडे घेतले आणि बाहेर पडली मग एका ठिकाणाहून तिने विक्रांतला कॉल केला. स्मिता इतकं सगळं तू सहन केलेस मला एकदा तरी सांगायचे ग. विक मला वाटले आशु बदलेल थोडा चिडचिडा झाला आहे होईल ठीक. पण तो बदलण्याची काहीच शक्यता वाटत नव्हती. आज तर त्याने कहरच केला. स्मिता आशुला आपणच समजावून घेतले पाहिजे तो डिप्रेस झाला आहे त्यामुळे असा वागत आहे नाहीतर आशु असा वागणे इम्पोसीबल! हो विक मलाही असच वाटते.

त्याला कॉनसेलिंगची गरज आहे. पण तो डॉक्टर कडे येणार नाही. त्याचा इगो हर्ट होईल. दाराची बेल वाजली तसा विक्रांत दार उघडायला गेला तर दारात आशु अरे आशु ये आत ये विक्रांत बोलला. आशु फुल पिऊन आला होता मला वाटलेच स्मिता तू तुझ्या याराच्या घरीच असशील. आशु तोंड सांभाळून बोल. का मी खोटं बोलतो आहे का विचार याला तो प्रेम करतो तुझ्यावर विचार. आशु तू बस आधी मग आपण बोलू अस म्हणत विक्रांतने त्याला सोफ्यावर बसवले. पण तो तिथेच पडला. स्मिता आजची रात्र आशुला इथेच झोपू दे मीही इथे खाली झोपतो सकाळी बोलू आपण त्याच्याशी. ओके म्हणत स्मिता बेडरूममध्ये गेली.

सकाळी आशु उठला प्रथम त्याला समजेना की आपण कुठे आहोत. तो उठून बसला. तेवढ्यात विक्रांत आला हे आशु गुड मॉर्निंग तो बोलला. पण आशु काहीच बोलला नाही. स्मिता आताच्या आता घरी चल तो स्मिताला म्हणाला. आशु तू काल जे वागलास ना त्यानंतर मी घरी येईन ही कल्पनाच करू नकोस. अरे वा म्हणजे माझी शंका खरी होती तर तुला याच्यासोबत राहायचे आहे विक्रांतकडे बोट दाखवत तो म्हणाला.

आशु आता तू निघून जा इथून नाहीतर मी पोलिस कंपलेंट करीन. स्मिता काहीतरी बोलू नकोस शांत हो आणि दोघांनी बसून चर्चा करा विक्रांत म्हणाला. काही गरज नाही बोलायची जातो मी म्हणत आशु निघून गेला.स्मिता आशुला आपणच समजून घेतले पाहिजे तो खूप डिप्रेस झाला आहे. विक तो तुला वाटेल ते बोलला तरी तू त्याची बाजू घेतोस? हो कारण आशु माझा चांगला मित्र आहे त्याला अस डिप्रेशनमध्ये मी एकट्याला नाही सोडू शकत. आता तो जे वागतो आहे ते त्यालाही समजत नाही.

विक थँक्यू ती बोलली. आता आशु घरी एकटाच होता. पदोपदी त्याला स्मिताची कमतरता जाणवत होती. तिचे प्रेम तिची कदर समजत होती. न्युज मध्ये आशु बघत होता की कोरोनामुळे कितीतरी लोकांचे आयुष्य उध्वस्त होत होते. काही जणांचे जिवलग क्षणात त्यांना सोडून जात होते. हे सगळं बघून आशुला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला.

स्मितानेही त्याला एकही कॉल किंवा मेसेज केला नव्हता. आशुला त्याची चूक समजली होती तो तडक स्मिताला भेटायला आला. तिच्यापुढे हात जोडून माफी मागितली त्याने. स्मिता मी खूप त्रास दिला आहे तुला प्लिज मला माफ कर मी पुन्हा अस वागलो तर त्या क्षणी मला सोडून जा. आशु मी तुला एका अटीवर माफ करेन बघ मान्य असेल तर. तू जी अट सांगशील ती मान्य आहे स्मिता. आशु तू तुझे काँसीलिंग करून घ्यायचे. मी एका मानसोपचार तज्ञाची अँपॉईंटमेन्ट घेते.

चालेल स्मिता मी तयार आहे. मग आशुचे एका डॉकटर कडून कॉनसिलिंग केले गेले. डॉक्टर त्याला म्हणाले आता तुझे काम बंद आहे पण त्या ऐवजी तू ऑनलाइन अँकटिंग क्लासेस घेऊ शकतोस. कथा, पटकथा आणि संवादलेखन हेही सुरु करू शकतोस. आज सगळेजण ऑनलाईन शिक्षणावर भर देत आहेत. विविध क्रिएटिव्ह ग्रुप तू जॉइन करू शकतोस तिथे चर्चासत्र सेमिनार आणि गेस्ट लेक्चरही होतात तिथे तू सहभागी होऊ शकतोस. आशुला त्यांचे म्हणणे पटले. चार पाच दिवस डॉक्टर त्याचे कौन्सिलिंग करत होते. आशु आता पूर्णपणे बदलला होता. स्मिताही खुश होती. या दोघांना आनंदात बघून विक्रांतही खुश होता. कोरोनाच्या सावटाखाली एक कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचले होते.

समाप्त

गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली आपण सर्वजण जगत आहोत. काही ठिकाणी अनेक महिला घरगुती अत्याचाराला बळी पडल्या. घरगुती हिंसाचार वाढला. लोक डिप्रेशनमध्ये गेले. आज ही परिस्थिती बिकट आहे पण आपण सकारात्मक विचार करून आपल्यातले नकारात्मक विचार दूर केले पाहिजेत. त्या साठी ध्यानधारणा ,प्राणायम,योगा हे चालू ठेवले पाहिजे. ही परिस्थिती कायम राहणार नाही नक्की बदलेल हा आशावाद बाळगला पाहिजे.

©® sangieta devkar 2017




No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...