Wednesday, September 1, 2021

है तुझे भी इजाजत (भाग 4)

​पन चेतन रागातच बाहेर पडला. संयु ला समजेंना  काय आणि कसे वागावे ? चेतन तिला हवा होता पन तिच्या मनाचा निर्णय होत नव्हता.तो तिच्यावर रागवून गेला हे तिला पन नाही आवडले . तिने घरी येऊन आर्वी ला फोन लावला चेतन ला भेटल्याचे सांगितले. आर्वी म्हणाली संयु त्याच बरोबर आहे ग तू अजुन किती वेळ घेणार आहेस ? जग ना जरा सव्हता साठी मोकळा श्वास घे. ओके आर्वी म्हणत संयु ने फोन ठेवला आणि चेतन ला सॉरी चा मेसेज केला. पन त्याने काहीच रिप्लाय केला नाही  फोन ही नाही. दुसऱ्या दिवशी  संयु ऑफिस सुटल्यावर चेतन च्यां फ्लैट कड़े आली. चेतन नुकताच ऑफिस वरुन आला होता कॉफीच घेत होता. बेल वाजली त्याने दार उघडले संयु आली होती अजूनही तो रागात होता.ति त्याच्या बाजूला बसली त्याचा हात हातात घेतला म्हणाली सॉरी चेतन तरी तो बोलायला तयार नव्हता.संयु ने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले .त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि किस केले. मग चेतन ही तिला किस करू लागला तो तिच्या चेहऱ्या वर मानेवर किस करत राहिला . दोघाना ही आपल्या भावनांवर कॅट्रोल ठेवणे अशक्य झाले चेतन तिला घेऊन बेडरूम मध्ये आला. दोघांच्या अंगावरचे कपडे बाजूला झाले आणि ते प्रणयाच्या लाटांवर स्वार झाले . थोडया वेळाने दोघ शान्त झाले . संयु ला मिठीत घेत चेतन म्हणाला,आय लव यु सो मच . लव यु टू चेतन . चेतन मी जाते घरी आता. नुपूर आली असेल घरी. तिच्या गालावर किस करत चेतन बोलला,नको जाऊ यार यु मेक मी सो हॅपी टूडे . चेतन प्लिज नंतर भेटू . हम्मम मी रोज असा तुझ्यावर चिडायला हवे ना संयु मग तू असा छान पैकी माझा रुसवा घालवशील . हो का वाट बघ असे म्हणत संयु जायला निघाली तसे चेतन ने पुन्हा तीला आपल्या जवळ ओढले आणि किस केले. चेतन बाय निघते आता मी आणि संयु घरा कडे निघाली. घरी आल्यावर तिला चेतन सोबत चा सहवास आठवत राहिला आपण हे बरोबर केले की चूक तिला कन्फ्यूजन झाले. सौम्या प्रतीक ला भेटायला आली एका रेस्टॉरंटमध्ये ते  दोघे आले. प्रतीक काय चालयय तुझं अरे मी किती मेसेज केले कॉल केला तू कशाचाच रिप्लाय केला नाहीस. सौम्या मी कामात बिझी होतो वर्क लोड आहे त्यामुळे तुझेच नाही बाकी इतरांचे ही मेसेज मी पाहिले नाहीत. प्रतीक मी इतर लोकां मध्ये येते का ? का असा वागतोस अलीकडे ? आपण भेटलो तेव्हा सुरवातीला किती वेळ  द्यायचास तू  फिरायला,मुव्ही ला सारख जायचो आपण. सौम्या काम सोडून तुला वेळ देन मला नाही जमत. अरे पण रोज मला वेळ दे अस कुठे म्हणतेय मी ! अँटलिस्ट विक डेज ला तरी भेट ना! . सौम्या हे बालिश वागणं  मला आवडत नाही. म्हणजे आपलं हे रिलेशनशिप म्हणजे तुला बालिश पना वाटतो 2वर्ष होतील प्रतीक आता आपल्याला भेटून आणि पुढे काय विचार केला आहेस का तू ? कसला विचार सौम्या? प्रतीक आपण लग्न कधी करायचे त्या बद्दल काही ठरवले आहेस का? सौम्या या आधी ही मी तुला बोललो होतो की मला माझे करियर सेट करू दे . मला आता लगेचच कशात अडकून राहायचे नाही. मला बंधन नको आहे मनासारख मला सेटल्ड होऊ दे. प्रतीक लग्न आणि करियर याचा काय संबंध? अरे तुला समजत कसे नाही की मी तुझ्यात  इव्हन दुसऱ्या कोणत्याच  मुली मध्ये गुंतून नाही राहू शकत. आय वॉन्ट माय ओन स्पेस ऍण्ड फ़्रीडम. म्हणजे तुझे माझ्यावर प्रेम नाही प्रतीक ? इतके दिवस तू फक्त टाइमपास केलास? मला नाही समजले त्यावेळी काम आणि करियर चे महत्त्व सौम्या इट जस्ट अ अट्रॅक्शन अबाऊट यु. वा प्रतीक खूप लवकर समज आली रे तुला.गुड बाय अँड नेव्हर कॉन्टॅक्ट मि अगेन एन्जॉय युवर लाईफ प्रतीक. सौम्या तिथून बाहेर पडली. खूप हर्ट झाली होती ती ओरडून रडावेसे वाटत होते तिला.तीने कैब बुक केली घरी जायला. कैब आली लगेचच. ती सिटवर मान मागे टाकून आता पर्यंत चा प्रतिक आणि तिचा प्रवास आठवत राहिली. डोळ्यातुन अश्रु वहात होते. त्यातच कैब मध्ये गान लागले होते..

तेरे बिन सांस ना ले मेरे दिन रातखाली खाली लगते हैं लकीरों वाले हाथसाथ मेरे चलते चलते.. हायसाथ मेरे चलते चलते रस्ते ना मोड़ीं
नैन ना जोड़ी कित्ते नैन ना जोड़ींनैन ना जोड़ी कित्ते नैन ना जोड़ीं
तेन्नु वास्ता खुदा दाहायतेन्नु वास्ता खुदा दा मेरा दिल ना तोड़ीं
बिरहा दे रंग जिसु लग जावन
अंखियन विचों बरसे सावन
लग के जिसदी टूट गई यारी
राहवाँ तकड़े रह जान साजन
जिसनु इश्क़ दे ग़म लगदे ने
रह जांदी जिन्दड़ी थोड़ी

नैन ना जोड़ीं किते नैन ना जोड़ीं
नैन ना जोड़ीं किते नैन ना जोड़ीं    

हे गाने ऐकून सौम्या अजुनच रडू लागली तिने प्रतिकवर खर प्रेम केले होते. ती घरी आली तिने खुप ड्रिंक केले आणि तशिच झोपी गेली. सकाळी तिचे डोक खुप दुखु लागले मग तिने ऑफिस ला सुट्टी टाकली. आता प्रतीक साठी नाही रडायचे हे तिने ठरवले. आर्वी ला फोन लावला आणि काल जे घडले ते तिला सांगितले. आर्वी पन म्हणाली त्याची इच्छा नाही तर जबरदस्ती त्याला तू बांधून नाही ठेवू शकणार. त्याचे प्रेम नहवते तुझ्यावर सौम्या. आता जास्त विचार नको करू तुझ आयुष्य तुला हवे तसे जग. आर्वी चे बोलने सौम्या ला पटले. 

क्रमश.... 

No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...