तिचा नकार
त्याला नकार नाही सहन होत.तू मात्र हीच एक चूक केलीस आणि हकनाक बळी गेलीस.मुलगी म्हणून जन्माला येणं खरच चुकीचे आहे का ओ?
दर्शना पवार तुझी कर्म कहाणी कित्येकांना हादरून गेली.काळीज चिरत गेली.तू हुशार निपजलीस आणि उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न तू उरी बाळगले. पण या पुरुष स्त्ताक समाज व्यवस्थेत तू त्याच्या वरचढ होण त्याला थोडीच खपणार होते?
सन्मानाने जगण्याचा हक्क तर मुलांना आहे,तू मुलगी म्हणून जन्माला आलीस हीच तुझी चूक झाली.उच्च शिक्षण घेवून तू या समाजात ताठ मानेने जगणार होतीस. एमपी एससी ची अवघड परीक्षा तू सहज तिसऱ्या क्रमांका ने उत्तीर्ण झालीस.आर्थिक स्वार्था पोटी तिने बाहेर पडून नोकरी करावी या बद्दल त्याचा आक्षेप नाहीच पण स्वतः च्या हिमतीवर तू पुढे गेलीस काहीतरी मिळवलेस याची चीड त्याच्या मनात होती.तू अधिकारी पदा वर बसून त्याला ऑर्डर देणार होतीस.केबिन मध्ये बसून ताठ मानेने काम करणार होतीस.मग विचार कर किती जणांचा इगो तू दुखावणार होतीस?
तूच विचार कर असे किती दुखावलेले जीव त्यांचा इगो दुखावला म्हणून मनातल्या मनात तुझा किती वेळा त्यांनी
खून केला असता !
पुढे एका पुरुषाला तू लग्नाला नकार दिलास,हीच मोठी चूक झाली.तो तुझ्या योग्यतेचा होता की नव्हता,तुझी लग्नाची इच्छा होती का नव्हती हे सगळ ठरवण्याचा अधिकार फक्त तुलाच होता.नकार देणं म्हणजे किती भयानक चूक होती ती.
त्याच्या हो ला हो म्हणण,त्याच सगळच बरोबर,त्याचा इगो मोठा ,त्याच्या पुढे तू जायचेस नाहीस हेच तू विसरलीस म्हणून जिवानिशी गेलीस.
"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः "असं म्हणणाऱ्या आपल्या तथाकथित महान संस्कृतीने त्याला जन्मतच स्त्रीचा मालक असण्याचेच अधिकार दिले आहेत, हे तुला माहीत नव्हते का?
याचा अर्थ काय तर मुलींना जन्माला येवू द्यायचे नाही का? तिला प्रत्येक गोष्टीत गप्प रहा आवाज उठवू नको,मुलगी आहेस सहन कर अस शिकवायचे की तिच्या रक्षणा साठी तिला कराटे,मार्शल आर्ट चे ट्रेनिग द्यायचे ? स्वरक्षणाचे धडे द्यायचे?
काय वाटते तुम्हाला अशा घटना वाचून.?
समाप्त
©® Sangiet Devkar,@2017
Comments
Post a Comment