तुला पाळी येत नाही
शुभांगी घरात आल्या आल्या म्हणाली आई खूप भूक लागली . खायला दे पटकन. हो हो आधी हात पाय तोंड धुवून ये. उपमा केला आहे मी. आलेच म्हणत शुभांगी फ्रेश व्हायला गेली. शुभांगी इयत्ता आठवीत शिकत होती. मराठी मीडियम च्या शाळेत ती जात होती. सकाळी दहा ते पाच शाळा मग आल्यावर भूक भूक करायची. तिचे आवरून होई पर्यंत आई ने उपमा डिश मध्ये काढून ठेवला वरून बारीक शेव टाकली. बाजूला लिंबाची फोड ठेवली. शुभांगी आली डायनिंग टेबल कडे आणि उपमा खात बोलू लागली आई अग आज शाळेत एक डॉक्टर बाई आल्या होत्या. हो का ? काय सांगितले त्यांनी मग. आई त्या मॅडम वयात येणे म्हणजे काय आणि मुलींना येणारी पाळी याची माहिती त्यांनी दिली. हो छानच माहिती दिली मग त्यांनी तसे ही तुमची फक्त मुलींची शाळा. प्रत्येक घरातून या विषयावर बोलले जातेच असे नाही ना. तुला नीट समजले ना शुभा आणि काही प्रश्न असतील तर मला विचार. हो ग आई पण मला कुठे अजून पाळी सुरू झालीय तेव्हा. हो आता तू आठवीत या वर्षी किंवा पुढच्या वर्षी येईल तुला पण पाळी. शुभा ने मग उपमा संपवला आणि अभ्यासाला गेली. शुभांगी शांत आणि हुशार होती. पहिल्या पाच मध्ये कायम तिचा क्रमांक असायचा. शाळेत ...