Friday, June 25, 2021

कैसी ये तेरी प्रीत (भाग 1)

हॅलो विक्रांत कुठे आहेस तू?  ऑफिसला आहे ग काही काम होत का स्मिता? आय निड युवर हेल्फ अस बोलून स्मिता फोनवर रडू लागली. स्मिता रडतेस का काय झाले. तू कुठे आहेस मी लगेच येतो तिकडे. स्मिताने विक्रांतला पत्ता सांगितला. दहा मिनिटात विक्रांत स्मिताकडे आला. एका मंदीराबाहेर स्मिता उभी होती. कार तिच्या जवळ विक्रांतने उभी केली. स्मिताला बघून झटकन बाहेर आला.

स्मिता अरे काय झाले तुला तिच्या डोक्याला जखम झाली होती त्यातून रक्त येत होते. मानेवर काळे वळ दिसत होते. त्याला बघून स्मिताने घट्ट मिठी मारली रडू लागली. काय झाले सांग तरी अपघात झाला का तू पडली कुठे बोल ना स्मिता. विक्रांत कारमध्ये जाऊ चल ती बोलली. विक्रांतने तिला कारमध्ये बसवले. स्वतःही बसला आणि बॉटल मधले पाणी तिला दिले. स्वतःचा रुमाल कपाळावर बांधला. स्मिता दवाखान्यात जाऊया आपण. नको विक्रांत तुझ्या घरी जाऊ. ओके पण आशुतोषला माहित आहे का तुझ्याबद्दल. हे काय झाले ते. विक्रांत त्याच नाव सुद्धा घेऊ नकोस. म्हणजे? तू चल घरी मी सांगते.

दोघे विक्रांतच्या घरी आले. त्याचा फ्लॅट होता एकटा राहत होता तो. स्मिता तो आणि आशु कॉलेजमेट होते. विक्रांतचे पहिल्यापासून स्मितावर प्रेम होते. पण स्मिता विक्रांतला आपला बेस्ट फ्रेंडच मानत होती. पण आशुवर खूप प्रेम करत होती. तिच्या आनंदासाठी विक्रांतने आपल्या भावना मानतच ठेवल्या कधी स्मिताला आपले प्रेम जाणवून दिले नाही. मात्र खास जवळचा मित्र म्हणून कायम तिला मदत करायचा सपोर्ट करायचा.

आशुतोष कॉलेजमध्ये असताना साईड बाय साईड अँकटिंगही करत होता. त्याला अभिनयाची आवड होती. नावाला त्याने एम बी ए केले होते. मात्र नाटका मध्ये अभिनेता म्हणून बराच नाव लौकिक त्याने मिळवला. मग काय बाकी नोकरी वैगेरे करण्याच्या भानगडीत तो पडला नाही. स्मिताही त्याला आवडत होती. तिला त्याचे नाटकात काम करणे आवडत होते ती कायम त्याला प्रोत्साहन देत असे. एम बी ए करून ती जॉब करत होती.

दोघेही प्रेमात होते मग लग्नही झाले. आता जस्ट दोन वर्ष होणार होती त्यांच्या लग्नाला. आशुला कधीतरी वाटून जायचे की विक्रांतचही स्मितावर प्रेम आहे. पण स्मिता आशुसाठी किती वेडी होती हे त्याला माहित होतं सो ही गोष्ट त्याने इग्नोर केली. विक्रांतने स्मिताला सोफ्यावर बसायला सांगितले आणि फर्स्ट एड बॉक्स आणायला गेला. स्मिताची कपाळावरची जखम त्याने साफ केली आणि पट्टी बांधली. ओठाला थोडं लागलं होतं तिथेही औषध लावले. स्मिता तू काही खाल्ले आहेस का? नाही अशी तिने मान हलवली.

सध्या लॉकडाऊन चालू होते सो बाहेरून काही मागवणे शक्य नव्हते. त्याने पटकन मॅगी बनवली आणि स्मिताला खायला दिले दोघांसाठी कॉफी बनवली. त्यांनतर एक क्रोसीन स्मिताला दिली. स्मिता काय झाले सांगशील का? तशी ती पुन्हा रडू लागली. प्लिज रडू नकोस. ओके हे बघ स्मिता तू आता थोडी रेस्ट घे आपण नंतर बोलू ओके. मग त्याने त्याच्या बेडरूममध्ये तिला झोपवले ती खूप दमली होती. विक्रांत बाहेर बसला आणि विचार करू लागला की नेमके काय घडले असेल स्मिता सोबत. तिला अस बघून खर तर त्याच्या हृदयाचे पाणी पाणी झाले होते. स्मिता बोलली की आशुच नाव सुद्धा घेऊ नकोस म्हणजे आशुने हे केले सगळे ? हॉंऊ ईट इज पॉसीबल?


क्रमश...


No comments:

Post a Comment

हारजीत

             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्ष...