Posts

शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात

Image
 1 ) स्थळ --- आमदार दादासाहेब यांचे घर    आज दादा साहेबांच्या घरी सकाळ पासूनच लगबग सुरू होती,त्यांचा एकुलता एक मुलगा हरीश अमेरिके हुन एम एस करून  भारतात परत येणार हॊता. त्याच्या स्वागता ची जोरदार तयारी सुरू होती. आई साहेब मुलाच्या येण्याने खूप खुश होत्या. थोड्या वेळात हरीश आला. त्याचे जंगी स्वागत झाले. आमदार साहेबांचे मित्र ,मोठं मोठे उद्योगपती,हरीश चे मित्र सगळेच आले होते. गप्पा मारत मजेत सगळे मेजवानी चा आनंद घेत होते. दादा साहेब प्रत्येकाला आपला मुलगा किती हुशार आहे आणि आज तो इतका मोठा सर्जन झाला आता मोठे हॉस्पिटल त्याला काढून देणार असेच सांगत होते,मुलाचे कौतुक करत होते . मुलगा कायम आपल्या आज्ञेत असल्या मुळे आज तो या उंची वर आहे हेच ज्याला त्याला सांगत होते. हरीश ने ही गोष्ट नोटीस केली. त्याने मनातच ठरवले एकदा बाबांशी बोलायला हवे. रात्र फार झाली होती. दादा साहेब हरीश ला म्हणाले हरीश आता तू आराम कर जा. दमला असशील . नाही बाबा पण मला थोडे बोलायचे होते. अरे आता खूप उशीर झाला आहे उद्या बोलू म्हणत ,त्यांनी हरीश ला गुड नाईट केले. सकाळी नाष्टा च्या वेळी हरीश ने विषय काढला ...

प्रेम म्हणजे प्रेम असत

Image
प्रेम म्हणजे प्रेम असत,,,,, "प्रेम म्हणजे प्रेम असत,तुमच आणि आमच अगदी सेम अस्त.या कविते मधून मंगेश पाड़गांवकरांनी प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. आपण कोणावर तरी प्रेम करतो हे सांगण्यासाठी एखाद्या विशिष्ठ दिवस असावा असे नाही.प्रेम ही भावना उपजत असते. ती एकमेकांच्या हृदया पर्यन्त नकळत् पोहचत् असते. परंतु आजच्या धकाधकी च्या जीवनात आपण एकमेकांना पुरेसा वेळ नाही देवू शकत. तेव्हा आपल्या प्रिय व्यक्ति वरील प्रेम सेलिब्रेट करण्या साठी "वेलेंनटाइन डे" सारखा एखाद्या दिवस असला तर काय बिघडले? पण आपल्या सेलिब्रेशन मुळे इतरांना त्रास होऊ नये याची जरूर काळजी घ्यावी. आपले सेलिब्रेशन आपल्या पुरतेच मर्यादित असावे..      प्रेम ही एक सुंदर भावना आहे. मग ते प्रेम आई मुले,भाऊ,बहिन ,मित्र मैत्रिण,पति पत्नी यांच्या पैकी कोणाचे ही असू दे,प्रेम हे प्रेमच असते. याची ठराविक व्याख्या नाही करता येत. एखाद्या व्यक्ति बद्दल वाटणारी ओढ़,आपुलकी,माया,ममता,काळजी याला प्रेम म्हणतात. पण आज आजुबाजुला पाहिले की असे  आढळते की यालाच प्रेम म्हणतात का,असा प्रश्न पडतो!! कॉलेज,शाळेला जाणाऱ्या मुलिंना वाटेत् आड...

आरवी..

Image
आरवी.. मिलिंद आणि रेवती आरवी ला घेवून डॉ,शैलेश माने सुप्रसिद्ध मानसोपचार स्पेशालिस्ट यांच्या कड़े आले होते. आरवी आता ही त्या क्लिनिक मध्ये असून नसल्या सारखीच शून्यात नजर लावून बसली होती. डॉ कड़े आता एक पेशंट बसले होते. त्या पेशंट नन्तर आरवी चा नंम्बर होता. रेवती आपल्या लाडक्या मुलीं कड़े केविलवान्या नजरेने पहात होती . लहान पणा पासून प्रत्येक गोष्टीत् हुशार,चौकस,हसमुख अशी आरवी आता अवघ्या सोळा वर्षातच आयुष्य संपून गेल्या सारखी भकास झाली होती. याला कुठे ना कुठे रेवती आणि मिलिंद जबाबदार होते. फक्त काम आणि पैसा याच्या मागे लागुन् त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीं चे आयुष्य वेगळ्याच वळणावर आणून ठेवले होते. पाच मिनिटात आतील पेशंट बाहेर आला. तसे ते तिघे आत गेले. डॉ नी आपल्या समोरच्या खुर्ची वर त्यांना बसायला सांगितले आणि म्हणाले बोला मि. मिलिंद काय प्रॉब्लेम आहे. तसे रेवती म्हणाली,डॉ ही आरवी आमची मुलगी ,एकदम ब्रिलियंट स्टुडेन्ट आठवी इयत्ते पर्यन्त खुप छान अभ्यास करायची . बडमिंटन् खेळायला ग्राउंड ला जायची . पन गेल्या वर्षा पासून ती खूपच स्वभावाने हायपर बनली आहे. अभ्यासात अजिबात लक्ष नाही सतत मोबाईल...

सौन्दती ची रेणुका आई

मार्गशीर्ष महिन्यात सौंदत्ती यात्रे नंतर कोल्हापूरकरांना वेध लागतात ते ओढ्यावरच्या आंबिल यात्रेचे. ओढ्यावरची यल्लम्मा अर्थात सौंदत्ती रेणुकेचे कोल्हापूर आणि पंचक्रोशीतले जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान. जयंती नंदी च्या तीरावर रेणुका परशूराम मातंगी आणि मंदिरा पासून दूरवर वसलेलं जमदग्नी अशा मंदिरांचा हा समूह कायमच भक्तांनी गजबजून जातो. या मंदिराशी निगडीत उपासना आहे ती जोगती संप्रदायाची . स्वत:चे जीवन रेणुका चरणी अर्पण करून तीच्या जोगव्यावर जीवन चालवणाऱ्या या वर्गाची सगळी सुखदुःख देवी बरोबर जोडलेली असतात. गेली कित्येक दशके कोल्हापूरातील मानाचे तीन जग म्हणजे देवीचा मुखवटा सजवलेली वेताची परडी घेऊन जोगती मंडळी सौंदत्तीला जातात. ओढ्यावरच्या मंदिरातला सोनाबाई(माई) जाधव रवीवार पेठ टेंबे रोड येथील बायाक्काबाई चव्हाण कसबागेट गंगावेश येथील लक्ष्मीबाई जाधव अशा तीन जगाबरोबर गेलेल्या काही वर्षांपासून बेलबाग येथील आळवेकरांचा जग चंपाषष्ठी दिवशी सौंदत्तीला प्रस्थान करतात. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी निघून गोकुळ शिरगाव येथे मुक्कामी येतात. तिथे जीच्या परवानगी ने यात्रेला गेले त्या त्र्यंबुली देवीची कृतज्ञता म...

यु अँड मी ( you & me)

Image
यु अँड मि मितेश एक वर्षांनी आलो असु आपण सिंहगडावर ,,हो ना? संयुक्ताने विचारले,,हो संयु मितेश म्हणाला. कॉलेज मध्ये असताना किती वेळा यायचो आपण ,आता तू आणि तुझे काम ,टेन्शन बस्स,,माझ्या साठी पण तुला वेळ नसतो मितु, मितेश ने तिला आपल्या जवळ बसवले ,तिचा हात हातात घेत म्हणाला,काय करू ग कामाचा इतका ताण असतो की बाकी काही सुचत नाही.आपल्या लग्नाला 2 वर्ष कशी झाली हे ही समजले नाही. हवेत गारवा पसरला होता,आभाळ ही भरुन आलेलं होत,पाऊस कोणत्या ही क्षणी बरसणार होता, संयुक्ता त्याला म्हणाली,मितेश कामात इतका पण बिझी राहू नकोस की मला ही विसरून जाशील. नाही ग,तुला कसा विसरेन,,बस थोडं कामातून वेळ मिळत नाही इतकंच. मितु तुला आठवत का रे,,याच गडावर बेधुंद पावसात तू मला प्रपोज केलं होतंस, हो संयु तुला पाऊस प्रिय आणि मला तितकासा नाही आवडत पाऊस,पण तुझा हट्ट होता ना की भर पावसात मी तुला प्रपोज करावं, हो,किती मस्त मजा करायचो आपण त्या दिवसात,एकमेकांच्या प्रेमात आंकंठ बुडालेलो आपण,,जगाची, लोकांची पर्वा न करता मनसोक्त फिरायचो ,तू आणि मी इतकं छोटं जग होत ना आपलं. आणि आता मी सोडून बाकी सार जग तुझं आहे मितेश ,,संयुक्ता लटक्...

क्यू..??

Image
जानकर भी क्यू यू अंजान बनते हो हमे तडपता छोड यू महफिल से चले जाते हो आंखोसे सब कुछ बोल जाते हो, बिखरे हुये हमारे दिल को,क्यू समेंटना चाहते हो भुला नही सकेंगे हम ,क्यू वो यादे दे रहे हो आज हम साथ ही सही,,मगर कल कहा ,,? ये जानकर भी क्यू पास आ रहे हो. भंवर में है कशती  हमारी,,क्यू आप साहिल बनना चाहते हो. हम खामोश हैं  ऐसे ही हमे रहने दो, बुझ गये है ख्वाब सभी,बस अब नया ख्वाब ना दिखावो, अश्को का क्या है,,उन्हे यू हि बहने दो...!!!! ----------संगीता..

स्पेस मूळे हरवतोय नात्यांचा श्वास

स्पेस मुळे हरवतोय नात्याचा श्वास,,        आजकाल उच्च शिक्षणा मुळे आर्थिक स्वातंत्र्या मुळे मुले आणि मुली यांच्या लग्ना बाबत आणि जोड़ीदारा बाबत च्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत,एकमेकांना त्यांच्या गुणदोषा सकट स्वीकारने किवा कोणा एका साठी तडजोड़ करने हे यांना पटत नाही.प्रेम विवाह असो किवा ठरवून केलेला विवाह असो,मूल मुलीं एकमेकांना लग्ना आधी भेटतात्,बोलतात,,त्यामुळे स्वभाव कसे आहेत हे समजते तरी देखील लग्ना नंतर मि का तडजोड़ करू? असा प्रश्न असतोच,मि आहे अशी आहे किवा मि आहे असा आहे यात बदल नाही होणार हाच दोघांन् मधील वादा चा मुद्दा असतो,मला माझी स्पेस हवी जशी लग्ना आधी होती हा मुलीं चा जास्त हट्ट असतो,पन लग्नानंतर काही जबाबदारी,कर्त्तव्य,पार पाडावे लागतात,,या कड़े दोघे ही कानाडोळा करतात,मना सारखे जगण,प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य,याला स्पेस म्हणत नाहीत,स्वातंत्र्य दोघांना हवे पण त्याला ही काही  लिमिट्स असू शकतात,पति पत्नी म्हणून वावरताना दोन्ही कढील कुटुंबाच्या संस्काराची मूल्ये जपली गेली पाहिजेत,मित्र मैत्रिणी सोबत वेळ घालवने,पार्टीज ना जाणे,,यात दोघांचा ही सहभाग हवा,माझे म...