Posts

कैसी ये तेरी प्रीत ( भाग 4)

Image
आशुचा मूड कधी चांगला तर कधी खराब असायचा. आज स्मिताला एक अर्जंट काम होते ते ती लॅपटॉपवर करत बसली होती. आशु बेडवर मोबाईलवर गेम खेळत होता. स्मिता काम बंद कर तो म्हणाला. अरे अर्जंट आहे काम उद्या सकाळी द्यायचे आहे. स्मिताने स्लीवलेस ड्रेस घातला होता. आशु उठून तिच्या मागे चेयर जवळ उभा राहिला. तिच्या गोऱ्या दंडावरून आपली बोटे फिरवत राहिला. तिला मानेला किस करत राहिला. आशु प्लिज मला काम करू दे ती बोलली. पण तो ऐकायला तयार नव्हता तसाच तिच्या सर्वांगावर आपला हात फिरवत राहिला तिने रागात त्याचा हात बाजूला केला. तसा तो चिडला मला नाही म्हणतेस असलं कसलं महत्वाचे काम आहे तुझे म्हणत त्याने लॅपटॉप बंद केला तिला ओढून बेडवर ढकलून दिले. तिचे कपडे ओरबाडून काढले आणि मनसोक्त तिला ओरबाडत स्वतःची भूक शमवत राहिला. स्मिताच्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते. रडत रडतच ती झोपी गेली. सकाळी उठली आणि कामाला लागली. आशु उठला तो नाष्टा करायला आला. तिने निमूटपणे नाष्टा त्याच्या समोर ठेवला. त्याने एक घास खाल्ला हे काय कसले बेचव बनवले आहेस मला दुसरे काहीतरी बनवून दे. आशु जे आहे ते खा मला आता वेळ नाही. ये कोणाला दम देतेस म्हणत त्यान...

कैसी ये तेरी प्रीत (भाग 3)

Image
आशु अरे आज नाहीतर उद्या सगळं चालू होईल तुझे नाटकाची तालीमही सुरू होईल. पण तोपर्यंत ते ऑनलाइन थिएटरसाठी विचारले आहे तुला ते तरी कर. ये मला अक्कल नको शिकवू आणि सल्लेही देऊ नकोस. मला समजते काय करायचे अस बोलून आशु बेडरूममध्ये गेला ड्रिंक घेतले प्यायला. त्याने आणि सोबत सिगारेट सुद्धा! हल्ली त्याच ड्रिंकही वाढले होते. स्मिताच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तिला समजेना की आशुला अचानक काय झाले असा का वागत आहे तो? ती फ्रेश होऊन आली आणि चहा घेतला. रात्रीचा स्वयंपाक केला. आशु चल जेवायला त्याला बोलवले तिने. खूप ड्रिंक केले होते त्याने कसे बसे तो जेवला. स्मिताला आशुबद्दल खूप वाईट वाटत होते हा दारूपायी स्वतःचे नुकसान तर नाही ना करून घेणार ही चिंता तिला सतावू लागली. ती खूप दमली होती ऑफिसमध्ये काम खूप होते. ती बेडवर आली तसे आशुने तिला जवळ ओढले आशु मी दमलेय रे खूप प्लिज मला झोपू दे. उगाच नखरे करू नकोस तू दमतेस अस काय काम करतेस ऑफिसमध्ये? मी मूर्ख आहे का घरी बसून तुझ्या जिवावर खातो. आशु मी बोलले का तस काही. बोलायला कशाला पाहिजे दिसते तुझ्या वागण्यातून आता मी तुला जवळ पण नको आहे कारण मी बेरोजगार आहे. आशु त...

कैसी ये तेरी प्रीत (भाग 2)

Image
स्मिता बोलली की आशुच नाव सुद्धा घेऊ नकोस म्हणजे आशुने हे केले सगळे ? हॉंऊ ईट इज पॉसीबल? स्मिताला छान झोप लागली होती. संध्याकाळी स्मिता उठली गोळी घेतल्याने तिला जरा बरे वाटत होते. विक्रांतने तिच्यासाठी पोहे बनवले होते. अरे पोहे कशाला केलेस विक ती कधीकधी त्याला विक असे शॉर्ट नावाने बोलवत असे. दुपारी काही नाही खाल्ले तू असू दे खा मी मस्त चहा बनवतो विक्रांत बोलला. स्मिताने पोहे खाल्ले वा विक्रांत छान झालेत पोहे. विक्रांतनेही पोहे घेतले चहा घेतला. स्मिता जवळ विक्रांत बसला म्हणाला, बोल स्मितु काय झाले आशुने मारले तुला खरे ना? हु स्मिता बोलली. व्हाट रबिश आशु अस कस वागू शकतो? कशावरून भांडण झाले तुमचे. विक गेल्या वर्षापासून म्हणजे जसा हा कोरोना काळ सुरू झाला तस आशुच्या वागण्यात फरक पडू लागला. गेल्या वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊन या शब्दांनी जणू काय दहशतच निर्माण केली बघ. कोरोनामुळे नाटक सिनेमा सगळ काही बंदच झाले. आशुची कितीतरी नवीन नाटकं पेंडिंग आहेत. चार सहा महिन्यांपूर्वी परत शुटिंग नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. एक दोन नाटकं आशुची चांगली झाली. पण आता परत हे लॉकडाऊन लागले आणि आशु घरातच बसून आहे...

कैसी ये तेरी प्रीत (भाग 1)

Image
हॅलो विक्रांत कुठे आहेस तू?  ऑफिसला आहे ग काही काम होत का स्मिता? आय निड युवर हेल्फ अस बोलून स्मिता फोनवर रडू लागली. स्मिता रडतेस का काय झाले. तू कुठे आहेस मी लगेच येतो तिकडे. स्मिताने विक्रांतला पत्ता सांगितला. दहा मिनिटात विक्रांत स्मिताकडे आला. एका मंदीराबाहेर स्मिता उभी होती. कार तिच्या जवळ विक्रांतने उभी केली. स्मिताला बघून झटकन बाहेर आला. स्मिता अरे काय झाले तुला तिच्या डोक्याला जखम झाली होती त्यातून रक्त येत होते. मानेवर काळे वळ दिसत होते. त्याला बघून स्मिताने घट्ट मिठी मारली रडू लागली. काय झाले सांग तरी अपघात झाला का तू पडली कुठे बोल ना स्मिता. विक्रांत कारमध्ये जाऊ चल ती बोलली. विक्रांतने तिला कारमध्ये बसवले. स्वतःही बसला आणि बॉटल मधले पाणी तिला दिले. स्वतःचा रुमाल कपाळावर बांधला. स्मिता दवाखान्यात जाऊया आपण. नको विक्रांत तुझ्या घरी जाऊ. ओके पण आशुतोषला माहित आहे का तुझ्याबद्दल. हे काय झाले ते. विक्रांत त्याच नाव सुद्धा घेऊ नकोस. म्हणजे? तू चल घरी मी सांगते. दोघे विक्रांतच्या घरी आले. त्याचा फ्लॅट होता एकटा राहत होता तो. स्मिता तो आणि आशु कॉलेजमेट होते. विक्रांतचे पहिल्याप...

आम्ही आजच्या दुर्गा

Image
सर्व मंगल मांगल्ये,शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते,!!       नवरात्री हा नऊ दिवस आणि नऊ रात्रींचा उत्सव आहे,जो आश्विन शुद्ध प्रतिपदे पासून सुरु होतो.दुर्गा देवी ची नऊ रुपे आणि या नऊ रूपांची पूजा म्हणजे नवरात्र होय,हिन्दू धर्मात् साडे तीन मुहूर्ताला खुप महत्त्व आहे,त्याच प्रमाणे साडे तीन पीठे ही महत्वाची आहेत,त्यातील पहिले तूळजापुर ची अम्बाभवानी माता,दूसरे कोल्हापुर ची अंबाबाई,आणि तीसरे माहुरगड ची माता रेणुका,व अर्धे शक्तिपीठ म्हणजे वणी गडाची सप्तश्रृंगी माता होय.नवरात्री च्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते,जेथे घटाची स्थापना करायची ती जागा स्वच्छ करुन् त्यावर रांगोळी काढली जाते,एक दुरडी घेऊन त्यात काळी माती भरली जाते,त्या मातीत सात प्रकार चे धान्य पेरले जाते,त्यावर माती च्या किवा धातु च्या कलशा ची स्थापना केली जाते,त्यातील पाणया मध्ये चंदन,गंध,अक्षता,दूर्वा,दक्षिणा टाकतात.तसेच विडयाची पाने आम्बयाची पाने खोचली जातात,त्यावर नारळ ठेवला जातो,कलशा च्या बाजूला देवी च्या मूर्ति ची स्थापना केली जाते,यालाच "घट बसने" असे म्हणतात,नऊ दिवस घट...

21 मार्च जागतिक कविता दिन

कविता म्हणजे काय कविता का लिहिली जाते याच एका शब्दात उत्तर नाही देता येणार कविता कागदावर लिहून काय समाधान मिळते हे ज्याचे त्यालाच माहीत कविता म्हणजे आपले विचार आपल्या भावना मग त्या प्रेम भावना असोत नाहीतर मनातला उद्रेक असो काही सामाजिक घटना असो ते ते आपल्या परीने शब्दात मांडण्याचा प्रयत्न म्हणजे कविता. प्रत्येका साठी वेगवेगळा असा कवितेचा अर्थ असू शकतो जे मनात दडलेले असते जे पटकन बोलता येत नाही असे काहीसे भाव कागदावर नकळतपणे उमटले जातात मग त्या ओळीं मधून कविता जन्माला येते . प्रेम रस कारुण्य रस शृंगार रस,रौद्र रस,भक्ती रस अशा अनेक भावनेतून कविता जन्माला येते जे आव्यक्त आहे ते व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे कविता .जसे उत्तम लेखक होण्यासाठी चांगले लिखाण जमणे गरजेचे असते तसेच कविता समजने ही सुद्धा एक कला आहे  कवितेतील शब्द वाचून अंगावर शहारे येत नाहीत  तो पर्यंत ती कविता समजली नाही .त्यातला भाव मनाला भिडायला हवा तर कविता समजते . कविता जगता आली पाहिजे . कविता लिहिली  जात नाही तर ती आपोआप कागदावर मांडली जाते. आज 21 मार्च हा दिवस जागतिक कविता दिवस म्हणून साजरा केला जातो त्या निमि...

आर यु वर्जिन ??

Image
  विशाखा च्या घरी आज सगळे खुश होते आनंदात होते एका मोठ्या खानदानी घरातून तिला लग्नासाठी होकार आला होता. 15 दिवसा पूर्वी पाहुणे तिला बघून गेले होते आणि आज निरोप आला मुलगी पसंद आहे. मुलगा राजदीप त्याचे जेमतेम शिक्षण बी कॉम झालेले त्याचे वडील गावचे सरपंच आजोबा जिल्हाध्यक्ष,काका पण राजकारणात सक्रिय गावात खूप मान होता या कुटुंबाला. राजदीप दिसायला स्मार्ट त्याचा बिझनेस होता. विशाखा साधारण मध्यम वर्गीय कुटुंबातील बी.ए झालेली मुलगी नाकेडोळी छान आणि स्वभावाने शांत. लवकरच चांगला मुहूर्त बघून लग्न ठरवले होते. राजदीप गावात रुबाबात फिरायचा त्याच्या मागे मागे अनेक रिकामटेकडी मूल सतत असायची. राजदीप चे लग्न ठरले चे त्याच्या मित्रांना समजले तसे सगळे बोलू लागले त्याला राज ही मुलगी शहरात राहणारी तिचे काही अफेयर वैगरे असेल तर आणि ती अजून ही कोरीच असेल कशावरून? म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला राज ने विचारले. आज काल च्या मुली खूप फॉरवर्ड असतात, लग्नासाठी कुमारी म्हणजेच वर्जीन मुलगी मिळणं कठीणच . तसा राज म्हणाला,नाही विशाखा तशी वाटत नाही . बघ बाबा चांगली चौकशी कर नाहीतर तिलाच विचारून घे. असे काहीसे विचित्र ...