Posts

तुला पाळी येत नाही

Image
शुभांगी घरात आल्या आल्या म्हणाली आई खूप भूक लागली . खायला दे पटकन. हो हो आधी हात पाय तोंड धुवून ये. उपमा केला आहे मी. आलेच म्हणत शुभांगी फ्रेश व्हायला गेली. शुभांगी इयत्ता आठवीत शिकत होती. मराठी मीडियम च्या शाळेत ती जात होती. सकाळी दहा ते पाच शाळा मग आल्यावर भूक भूक करायची. तिचे आवरून होई पर्यंत आई ने उपमा डिश मध्ये काढून ठेवला वरून बारीक शेव टाकली. बाजूला लिंबाची फोड ठेवली. शुभांगी आली डायनिंग टेबल कडे आणि उपमा खात बोलू लागली आई अग आज शाळेत एक डॉक्टर बाई आल्या होत्या. हो का ? काय सांगितले त्यांनी मग. आई त्या मॅडम वयात येणे म्हणजे काय आणि मुलींना येणारी पाळी याची माहिती त्यांनी दिली. हो छानच माहिती दिली मग त्यांनी तसे ही तुमची फक्त मुलींची शाळा. प्रत्येक घरातून या विषयावर बोलले जातेच असे नाही ना. तुला नीट समजले ना शुभा आणि काही प्रश्न असतील तर मला विचार. हो ग आई पण मला कुठे अजून पाळी सुरू झालीय तेव्हा. हो आता तू आठवीत या वर्षी किंवा पुढच्या वर्षी येईल तुला पण पाळी. शुभा ने मग उपमा संपवला आणि अभ्यासाला गेली. शुभांगी शांत आणि हुशार होती. पहिल्या पाच मध्ये कायम तिचा क्रमांक असायचा. शाळेत ...

है तुझे भी इजाजत (भाग 11)

Image
चेतन थोडा तरी हर्ट झाला हे तिने ओळखले होते पण तो समंजस आहे मला सांभाळून घेईल इतका विश्वास त्याच्या बद्दल तिला नक्कीच होता हो आणि चेतन होताच तसा केयरिंग अँड अँडरस्टँडिंग!   आज हिमांशू चा वाढदिवस होता. आर्वी ने त्याला आदल्या रात्रीच 12 ला विश केले होते. त्याला घेतलेले गिफ्ट घेऊन ती ऑफिस ला आली. आल्या आल्याच ती त्याच्या केबिन कडे गेली. मे आय कम इन सर. येस आर्वी कम इन म्हणत हिमांशू ने तीला बसायला सांगितले. तिने त्याला शेकहॅण्ड करत पुन्हा एकदा बर्थडे विश केले. त्याला गिफ्ट दिले . ओहह आर्वी हे कशाला आनलेस गिफ्ट वैगरे. असू दे सर म्हणत आर्वी ने त्याला विचारले आवडले का सर गिफ्ट? या इट्स नाइस डियर  बट यु आर द मोस्ट प्रेशियस गिफ्ट फॉर मि. तशी आर्वी त्याच्या कडे पाहून हसत होती. आर्वी आज रात्री माझ्या बर्थडे ची पार्टी आहे तू नक्की ये तसे ही मी सगळ्या स्टाफ ला आता सांगणारच आहे. ओके सर म्हणत आर्वी त्याच्या केबिन मधून बाहेर आली. संध्याकाळी पार्टी ला काय घालावे तिला समजेना खूप मोठी मोठी लोक आसणार तिथे उगाच आपण विचित्र दिसायला नको त्यात आपण असे फॅटी फॅटी . काय घालावे असा विचार करत आर्वी ने एक ...

तन्हाई (गझल)

Image
तन्हाई में अक्सर ये दिल रो पड़ा, तेरी यादों का मौसम यूँ ही खो पड़ा। चाँदनी रात भी अब साथ नहीं, साथ तेरा जो छूटा, ये मन रो पड़ा। ख़्वाब आँखों में थे, पर बिखर ही गए, कोई आकर के जैसे इन्हें छोड चला। राह तकते रहे, कोई आया नहीं, दिल की चौखट पे साया भी  ना दिखा  हमने चाहा था तुझसे गिला कीस से करे  शहर अब हमारा नहीं रहा, बसेरा कहा से करे.  ©® Author Sangieta Devkar 

हारजीत

Image
             हारजीत,,,  आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्षातील मुख्य सभासदा सोबत हजर राहणार होते. जो तो आपला पक्ष कसा आहे,चांगले काम कोण करत याच प्रेझेंटेशन करणार होता. प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता पूर्ण तयारीनिशी इथे आला होता. आमदार साहेब ,त्यांचा भाचा सुमित आणि त्यांच्या प्रवक्त्या प्रीती त्यांची सेने ची संपूर्ण टीम अगदी पूर्ण तयारीने आले होते. पण प्रीती ची बाहेर इतक्या लोकांसमोर बोलण्याची ही पहीलीच वेळ होती. त्यामुळे तिला थोडे टेन्शन आले होते. पण सुमित होता तिच्या सोबत सो ते दोघ प्रेझेंटेशन देणार होते. अकरा वाजता मिटिंग सुरु होणार होती. प्रीती नोट्स काढून ते वाचण्यात मग्न होती. तेव्हा सुमित तिला पाहून म्हणाला,प्रीती डोन्ट बी टेन्स,,रिलॅक्स ती म्हणाली,अरे इतक्या लोकांसमोर मी फर्स्ट टाइम् बोलणार ना म्हणून थोड टेन्शन आले आहे. अग,मी आहे ना का काळजी करतेस? ठेव ते पेपर बाजूला आपण काही परीक्षा द्यायला नाही आलो असं म्हणत सुमित ने तिच्या समोरचे न...

सर्व्हायविंग मेन (शोभा डे)

Image
अगदी दिलखुलास,मोकळं आणि भाषेची भीड न ठेवता लेखन करणारी एक माझी आवडती लेखिका म्हणजे" शोभा डे"!  स्पष्टवक्तेपणा,निर्भीड अस वास्तव या लेखिकेच्या लिखाणात पाहायला मिळते. आपली पुस्तके वाचून लोक काय प्रतिक्रिया देतील याची पर्वा तिला अजिबात नसते. एक दर्जेदार साहित्य निर्मिती कशी करायची याचे उदाहरण म्हणजे शोभा डे!" शोभा डे"या भारतीय लेखिका आणि स्तंभलेखिका आहेत. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते. स्टारडस्ट, सोसायटी आणि सेलेब्रिटी या संपन्न वाचकांवर्गाच्या मासिकांचे संपादन त्यांनी केले. उद्योग मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने लिहीले. १९८० पासून त्या विविध भारतीय नियतकालिकांतून सातत्याने स्तंभलेखनही करीत आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पाउस...

तिचा नकार

त्याला नकार नाही सहन होत.तू मात्र हीच एक चूक केलीस आणि हकनाक बळी गेलीस.मुलगी म्हणून जन्माला येणं खरच चुकीचे आहे का ओ? दर्शना पवार तुझी कर्म कहाणी कित्येकांना हादरून गेली.काळीज चिरत गेली.तू हुशार निपजलीस आणि उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न तू उरी बाळगले. पण या पुरुष स्त्ताक समाज व्यवस्थेत तू त्याच्या वरचढ होण त्याला थोडीच खपणार होते? सन्मानाने जगण्याचा हक्क तर मुलांना आहे,तू मुलगी म्हणून जन्माला आलीस हीच तुझी चूक झाली.उच्च शिक्षण घेवून तू या समाजात ताठ मानेने जगणार होतीस. एमपी एससी ची अवघड परीक्षा तू सहज तिसऱ्या क्रमांका ने उत्तीर्ण झालीस.आर्थिक स्वार्था पोटी तिने बाहेर पडून नोकरी करावी या बद्दल त्याचा आक्षेप नाहीच पण स्वतः च्या हिमतीवर तू पुढे गेलीस काहीतरी मिळवलेस याची चीड त्याच्या मनात होती.तू अधिकारी पदा वर बसून त्याला ऑर्डर देणार होतीस.केबिन मध्ये बसून ताठ मानेने काम करणार होतीस.मग विचार कर किती जणांचा इगो तू दुखावणार होतीस? तूच विचार कर असे किती दुखावलेले जीव त्यांचा इगो दुखावला म्हणून मनातल्या मनात तुझा किती वेळा त्यांनी   खून केला असता ! पुढे एका पुरुषाला तू लग्नाला नकार द...

आधुनिक सीता

एखादी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही. त्या बद्दल आपण तर्क वितर्क लावत बसतो. ख़ुप काही साचलेल असते ते शब्दात मांड़ावेसे वाटते.आपले विचार ही त्या प्रेशर कुकर सारखे असतात.मनात विचारांची गर्दी होते मग हे विचार शब्दा वाटे बाहेर पडू पाहतात जसे की कुकुरचा प्रेशर शिट्टीच्या रूपाने वाफ़ बनून बाहेर पडतो.तसच आज मी एक विषय तुम्हा सर्वा समोर मांडत आहे.समजा रामायणातील एखाद्या पात्राला प्रत्यक्ष भेटता आले तर  मी रामाला भेटेन आणि माझे प्रश्न त्याला विचारेन. आज ही आपण आपलं आयुष्य जगत असताना कित्येकदा रामायणातील राम आणि सीतेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागावे अस म्हणत असतो. श्री राम एक मर्यादा पुरुषोत्तम ,आज्ञाधारी मुलगा आणि कर्तृत्ववान राजा . सीता सुंदर राजकुमारी,सहनशील आणि निष्ठावान पत्नी. ही सारी गुण वैशिष्ट्ये त्या दोघा मध्ये होती. म्हणूनच रामाने विना तक्रार 14 वर्षाचा वनवास स्वीकारला आणि पती प्रेमा पोटी सीता ही वनवासात गेली. ही गोष्ट चांगलीच आहे. पती च्या सुख दुःखात पत्नीच तर साथ देते. मग जी पत्नी सगळ्या सुखसोयी सोडून पती साठी वनवासात येते . जंगलात राहते आणि अचानक एके दिवशी तिचे अपहरण होते आणि रावण तिला...

मेनोपौज आणि ती

Image
आज सकाळ पासूनच स्मिताला कसे तरी वाटत होतेखूप बैचेन अस्वस्थ काही ही काम करू नये नुसतं बसून राहावे वाटत होते  पण इशा आणि अनय चे कॉलेज आहे विक्रांत चे ऑफिस आहे मग काय इच्छा नसताना ही स्मिता उठली. एक एक काम आवरू लागली. दूध गॅसवर तापवायला ठेवले आणि लक्ष; तिचेदुसरीकडे गेले दूध उतू सगळी गॅस शेगडी खराब झाली. चरफडत तीने; दुधाचे पातेले खाली ठेवले.   आई नाष्टा झाला का ग मला लवकर जायचे आहे इशा रूम मधूनच बोलली. स्मिता माझा टिफिन पण लवकरकर जरा मला अर्जेन्ट मीटिंग आहे. विक्रांत हीबोलला. अरे मी एकटीच काम करते मला दोनच हात आहेत जरा तुम्ही पण येऊन मदत करा.  स्मिता चिडून बोलली. विक्रांत किचनमध्ये आला. स्मिता काय झाले आहे का सकाळ सकाळ चिडचीड करते आहेस. रोजच तर करतेस ना सगळं मग आज काय झाले.   का मला कंटाळा नाही येऊ शकत का? किती करायचे रे मी काम ?   स्मिता तुला बर वाटत नाही का काही होतय का प्रेमाने विक्रांत ने विचारले. नाही काही होत नाही मला. ओके आज नको काही बनवू तू मी बाहेर खाईन.   इशा आणि अनय ही आले आवरून आई तू आराम कर आम्ही खातो कँटीन ला . अरे नको थांबा मी...
https://www.momspresso.com/user/f65c4e00f8704b2a8415f9e131d0f682/series/6395e6680615ec39b95ac40a?utm_source=AD_Generic_Share&utm_medium=Share_Android
तुम्हाला ब्लॉग आवडत असल्यास, on वर क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. येथे Author Sangieta Devkar. चा ब्लॉग वाचा: "इस मोड पे.(भाग 1)" by Author Sangieta Devkar.. Read Here: https://www.momspresso.com/parenting/amit-braindd-kmyunikeshns/article/is-modd-pebhaag-1-st8612b96xp1?utm_source=SPA_Generic_Share&utm_medium=Share_Android

है तुझे भी इजाजत(भाग 12 अंतिम)

Image
आर्वी म्हणाली सर तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते तर तसे सांगायचे होते तुम्ही मला फसवलत तसे जान्हवी ला ही फसवलत. आर्वी मी कोणालाही फसवले नाही . जान्हवी आणि मी लहानपणापासून एकत्र मोठे झालो आमचे घरचे रिलेशन आहे. आणि तुला फसवले म्हणतेस तर मला सांग मी तुला कधीतरी लव यु बोललो का ? म्हणजे सर तुम्ही मला लाईक करत होता ते काय होत? आर्वी लाईक अँड लव आर टू डिफ्रंनट वर्ड्स अँड बोथ आर डिफ्रंनट मिनींग . तू गफलत करतेस आवडणे आणि प्रेम असणे या वेगवेगळ्या भावना आहेत. पण सर मी तर हे प्रेमच समजत होते. आर्वी मी तुला गोव्याला हेच बोललो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तिचा सहवास आवडतो म्हणजेच त्या व्यक्ती वर आपले प्रेम आहे अस होत नाही बस्स आवडते कोणीतरी दयाट्स इट. तेव्हा तू ही म्हणाली हो सर मला पण असच वाटत मग मला वाटले तू ही मला लाईक करतेस सो काय हरकत आहे थोडा वेळ एकत्र घालवू एन्जॉय करू त्यात इतकं मनाला का लावून घेतेस? मी आज ही तुला लाईक करतो. बास सर आता एंगेजमेंट झालीय तुमची आणि अस बोलता तुम्ही? आर्वी कुठल्या मेंटयालिटी मध्ये जगतेस तू आज चा काळ जमाना असाच आहे मस्त रहा एंजॉय करा उगाच इमोशनल फुल होऊन काही ही मिळत ...

है तुझे भी इजाजत(भाग 12 अंतिम)

Image
आर्वी म्हणाली सर तुमचे माझ्यावर प्रेम नव्हते तर तसे सांगायचे होते तुम्ही मला फसवलत तसे जान्हवी ला ही फसवलत. आर्वी मी कोणालाही फसवले नाही . जान्हवी आणि मी लहानपणापासून एकत्र मोठे झालो आमचे घरचे रिलेशन आहे. आणि तुला फसवले म्हणतेस तर मला सांग मी तुला कधीतरी लव यु बोललो का ? म्हणजे सर तुम्ही मला लाईक करत होता ते काय होत? आर्वी लाईक अँड लव आर टू डिफ्रंनट वर्ड्स अँड बोथ आर डिफ्रंनट मिनींग . तू गफलत करतेस आवडणे आणि प्रेम असणे या वेगवेगळ्या भावना आहेत. पण सर मी तर हे प्रेमच समजत होते. आर्वी मी तुला गोव्याला हेच बोललो की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तिचा सहवास आवडतो म्हणजेच त्या व्यक्ती वर आपले प्रेम आहे अस होत नाही बस्स आवडते कोणीतरी दयाट्स इट. तेव्हा तू ही म्हणाली हो सर मला पण असच वाटत मग मला वाटले तू ही मला लाईक करतेस सो काय हरकत आहे थोडा वेळ एकत्र घालवू एन्जॉय करू त्यात इतकं मनाला का लावून घेतेस? मी आज ही तुला लाईक करतो. बास सर आता एंगेजमेंट झालीय तुमची आणि अस बोलता तुम्ही? आर्वी कुठल्या मेंटयालिटी मध्ये जगतेस तू आज चा काळ जमाना असाच आहे मस्त रहा एंजॉय करा उगाच इमोशनल फुल होऊन काही ही मिळत ...

है तुझे भी इजाजत(भाग 10)

Image
हिमांशू तीच्या बाजूला शांत झोपला होता. आर्वी ने त्याला कपाळावर किस केले  तसा तो जागा झाला सर मी जाते माझ्या रुम मधये आणि आवरून येते. तसे हिमांशू ने तिला पुन्हा आपल्या जवळ ओढले आणि तिला किस केले. जा आणि स्वीमिंग पूल जवळ ये.हिमांशू म्हणाला. आर्वी स्वहताचे आवरुन लाँनवर आली.हिमांशू आला लगेच त्याने स्विमिंग ची शॉर्टस घातली होती फक्त बाथ सूट त्याने आर्वी कडे दिला ती तिथे टेबल जवळ चेयर होती तिथे बसली. हिमांशू एकदम हॉट दिसत होता. आजूबाजूला असणाऱ्या मुली त्याच्या कडे अनामिष नजरेने पहात होत्या. आर्वी सुद्धा भान हरपून त्याच्या कडे पहात होती. तो मस्त स्विमिंग करत होता आणि आर्वी ला पाहून स्माईल करत होता. मधूनच फ्लाइंग किस देत होता. त्याच स्विमिंग झाले तसे त्याने आर्वी ला बाथसुट द्यायला बोलवले आर्वी गेली त्याने पटकन तिला पाण्यात ओढले . तिला क्षणभर काही समजलेच नाही पण आपण पान्यात आहोत हे समजले तसे ती घाबरून म्हणाली,सर मला खूप भीती वाटते मला बाहेर काढा ना प्लिज. त्याने तिला घट्ट पकडले होते म्हणाला,बघ मी पकडले आहे तुला ,तुला काही ही होणार नाही चिल आर्वी. तरी ती घाबरत होती त्याला खूप हसू येत होते त्...

है तुझे भी इजाजत (भाग 9)

Image
रिया ला विसरणं त्याला अवघड होतं बिकॉज हि लव हर फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट.  रिया ही रागात घरी आली. तिला रडू आवरत नव्हते . मयंक ने तीचा अपमान केला होता. तिला राहुन राहून हेच वाटत होते की मी लेस्बियन आहे यात माझा काय दोष ? आणि मी माझ्या शरीरा च्या गरजा का पूर्ण करू नये? माज्या कडे बोट दाखवण्याचा अधिकार कोणालाच नाही. मी जशी आहे तसे स्वतःला स्वीकारले आहे  मग माझ आयुष्य कसे जगायचे हे मी ठरवणार. आणि मोठ्याने रडत ती म्हणत होती ,येस आय एम अ लेस्बियन. !! मग तिने खूप ड्रिंक घेतली आणि रसिका ला फोन लावला पण रसिका तिचा कॉल घेत नव्हती. खूप वेळा तिने कॉल लावला. मग एकदा तिने रिसिव्ह केला. बोल रिया का फोन करतेस मला. रसिका आय निड यु आय लव यु . आय कान्ट लिव्ह विदाउट यु. रिया आता सार काही संपले आहे. आपल्यात कोणतंच नात नाही. रसिका अस का म्हणतेस तू? तू माझी बेस्ट फ्रेन्ड आहेस ना? नो रिया मी तुझी कोणीही नाही.आता पर्यंत ठीक होत पण आता साऱ्या जगाला समजेल की मी लेस्बियन आहे. रसिका मग काय झाले आपण जे आहोत जसे आहोत तस स्वहताला स्वीकारने यातच भल आहे ते जगा पासून का लपवायचे? या समाजाने ही आपल्याला मानाने स्वीका...

है तुझे भी इजाजत (भाग 8)

Image
हा माणूस आई चा फ्रेन्ड आहे की अजून कोणी असा ती विचार करत होती आता ती 12 वर्षा ची होती इतकं तरी तिला समजत होते. खाण झालं तसे चेतन ने बिल पेंड केले संयु नको म्हणत होती तरी पैसे देताना अगदी हक्का ने तिचा हात बाजूला करून चेतन ने बिल दिले. मग भेटू नंतर म्हणत चेतन निघून गेला या दोघी घरी आल्या. तसे नुपूर ने संयु ला विचारले मम्मा हा चेतन कोण ग. अग बोलले ना तुला माझा मित्र आहे म्हणून. मित्र आहे  की बॉयफ्रेंड आहे? आता नुपूर ला डाऊट आलाच आहे तर सांगावे खरे असे ठरवून संयु म्हणाली हा तो माझा बॉयफ्रेंड आहे. का मम्मा,तुला काय गरज आहे बॉयफ्रेंड ची? बेटा हे बघ तू अजून लहान आहेस, तुला जसे मित्र मैत्रीणी आहेत तसे मला सुद्धा   आहेत पण कोणी एक आपला खास मित्र बनतो आपली तशी गरजच असते तुला आता या गोष्टी नाही समजणार नंतर सगळं पटेल तुला. मग काय तू त्याच्याशी लग्न करणार आहेस? अजून काही नाही ठरवले मी नुपूर पण चेतन चांगला मुलगा आहे. पण तरीही स्टेप फादर ना? हे बघ नुपूर त्या गोष्टी खूप पुढच्या आहेत सध्या आम्ही चांगले मित्र आहोत आणि तुला पटणार नाही तोपर्यंत आणि तू तयार होत नाहीस तोपर्यंत आम्ही लग्न नाही...

है तुझे भी इजाजत (भाग 7)

Image
​आर्वी मॅडम तर काय हिमांशू ला डेट करत आहेत. आणि तुझी गर्लफ्रेंड काय म्हणते रिया आर्वी ने विचारले. वुई बोथ आर व्हेरी हॅप्पी डियर. बिचारा मयंक आर्वी हसत म्हणाली. मग गप्पा मारत त्यांनी जेवण केले. सकाळी आर्वी ऑफिस ला आली . हिमांशू आता तिला कॉफी लंच ला आवर्जून बोलवू लागला . तिला खूप  छान वाटायचे. ते दोघे फोन वर सुद्धा बोलायचे चॅट करायचे. रात्री आर्वी जेवण करून अशीच फोन चेक करत बसली होती. तेव्हा हिमांशू चा कॉल आला हे बेबी व्हाट आर यु डुइंग ? काही नाही जस्ट जेवण झाले. ती म्हणाली. कॅन यु मिस मि..आय मिस यु अ लॉट डियर. तशी ती लाजत होती . येस आय अल्सो मिस यु . रियली ?हिमांशू ने विचारले. हो . मग तुझ्या रूम च्या विंडो मध्ये येऊन बघ जरा बाहेर. आर्वी विंडो पाशी आली. तिने पाहिले हिमांशू खाली रोडवर उभा होता त्याच्या कार ला टेकून आणि आर्वी ला त्याने खाली ये असा इशारा केला. आर्वी खुश झाली. तिने घरात सांगितले की बाहेर तिच्या मैत्रिणी आल्या आहेत आम्ही आईसक्रिम खाऊन येतो. ती पटकन आवरून खाली आली. सर तुम्ही या वेळेला इथे काय करताय.  तसे हिमांशू तिचा चेहरा आपल्या बोटांनी उचलून तिच्या डोळ्यात पहात म्हण...

है तुझे भी इजाजत (भाग 6)

Image
​आय आल्सो लाइक यू चँबी गर्ल. तसे ती अजुनच लाजत होती पन तिला विश्वास बसत नव्हता की याला मि खरच आवडत असेन का? मग डिनर संपवून ते निघाले .आर्वी खुश होती . हिमांशु ने कार स्टार्ट करण्या आधी आर्वी ला म्हणाला, आर्वी आता तुझ्या बद्दल मि जे काही बोललो ते बाहेर कोनाला सांगू नकोस. नाही सर मि बाहेर यातल काहिच बोलणार नाही. गुड़ गर्ल म्हणत त्याने तिच्या चेहरया वर आलेले केस तिच्या काना मागे घेतले आणि तिच्या डोळ्यात पहात तिच्या ओठां वर आपले ओठ ठेवले खुप पँशीनेटली तो तिला किस करु लागला मग ति ही त्याला प्रतिसाद देवू लागली . बराच वेळ त्यांचे किसिंग सुरु होते मग थोड्या वेळाने तो बाजूला झाला. आर्वी यू आर सो स्वीट म्हणत त्याने सीट बेल्ट लावला आणि कार सुरु केली.तिच्या घरा जवळ तिला सोडून तो निघुन गेला. आर्वी हवेत तरंगत तरंगत घरी आली . अजुन ही ती त्याच्या स्पर्शात धूंद होती. कधी हे सगळ संयु रिया सौम्या ला सांगते असे तिला झाले. रात्री मग आपल्या फ्रेंडस ना तिने हे सगळ सांगितले. पण रिया म्हणाली आर्वी जर हिमांशु ही तुला लाइक करतो तर मग या बद्दल बाहेर काही बोलू नकोस असे का म्हणाला. अग उगाच लोकां मध्ये चर्चा नको म्हण...